Jyeshtha Purnima 2024 : ज्येष्ठ पौर्णिमेला 'या' राशींना मिळणार कुबेराचा लाभ, देवी लक्ष्मीसह चंद्राचीही असणार विशेष कृपा
Jyeshtha Purnima 2024 : हिंदू पंचांगानुसार, कोणत्याही महिन्याची शेवटची तिथी पूर्णिमा तिथी असते.

Jyeshtha Purnima 2024 : हिंदू पंचांगानुसार, वर्षातला तिसरा महिना हा ज्येष्ठ महिना असतो. या महिन्या भगवान विष्णूची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जून महिना अने अर्थांनी शुभ महिना आहे. माहितीनुसार, ज्येष्ठ महिन्याची सुरुवात ही 24 मे पासून झाली ती 22 जूनपर्यंत असणार आहे.
हिंदू पंचांगानुसार, कोणत्याही महिन्याची शेवटची तिथी पूर्णिमा तिथी असते. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा या वेळेस 22 जून रोजी येणार आहे. या दिवशी देवी लक्ष्मीसह चंद्र देवाची विशेष कृपा पडणार आहे. या दरम्यान कोणत्या राशींचे चांगले दिवस असतील ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
ज्योतिष शास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी ज्येष्ठ पौर्णिमा विशेष असणार आहे. माहितीनुसार, या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमेचा स्वामी चंद्रदेवाची विशेष कृपा असणार आहे. या दरम्यान वृषभ राशीच्या लोकांची मानसिक ताणतणावापासून मुक्ती होईल. तसेच, तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येईल. तुमचं शारीरिक आरोग्य चांगलं राहणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच, उत्पन्नाचे अनेक स्त्रोत तुमच्यासमोर उघडे होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला जोडीदाराचाही पूर्ण पाठिंबा मिळेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी ज्येष्ठ महिना हा फार लाभदायक असणार आहे. या दरम्यान तुमचे कुटुंबीयांबरोबर असलेले वादविवाद दूर होतील. तसेच, या काळात कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याचा देखील योग आहे. तुम्ही एखाद्या तीर्थस्थळाला देखील भेट देऊ शकता. तुमचं वैवाहिक जीवन अधिक सुरळीत चालेल. नातं अधिक घट्ट होईल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
ज्योतिष शास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांसाठी ज्येष्ठ पौर्णिमेचा काळ हा फार अनुकूल ठरणार आहे. ज्येष्ठ पौर्णिमेचा चंद्र धनु राशीसाठी फार शुभदायी ठरणार आहे. तसेच, या काळात तुम्हाला अचानक धनप्राप्ती होऊ शकते. या दरम्यान तुमची कर्जमुक्तीपासून सुटका होऊ शकते. व्यापारी वर्गासाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Surya Gochar 2024 : अवघ्या दोन दिवसांत 'या' राशींचा सुरु होतोय सुवर्णकाळ; सूर्याच्या संक्रमणाने 5 राशी होतील मालामाल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
