Surya Gochar 2024 : अवघ्या दोन दिवसांत 'या' राशींचा सुरु होतोय सुवर्णकाळ; सूर्याच्या संक्रमणाने 5 राशी होतील मालामाल
Surya Gochar 2024 : सूर्याचं बुधाची रास मिथुनमध्ये संक्रमण सर्व राशींवर शुभ-अशुभ परिणाम देणारा आहे. त्यानुसार, काही राशींना या दरम्यान सावध राहण्याची गरज आहे.
Surya Gochar 2024 : सूर्य ग्रह प्रत्येक महिन्याला आपली रास बदलतो. त्यानुसार जून महिन्यातील सूर्याचं संक्रमण 15 जून रोजी म्हणजेच अवघ्या दोन दिवसांनी होणार आहे. 15 जून रोजी सकाळी 4 वाजून 27 मिनिटांनी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. सध्या सूर्य वृषभ राशीत स्थित आहे. सूर्याचं बुधाची रास मिथुनमध्ये संक्रमण सर्व राशींवर शुभ-अशुभ परिणाम देणारा आहे. त्यानुसार, काही राशींना या दरम्यान सावध राहण्याची गरज आहे. तर, पाच राशींवर याचा शुभ परिणाम होणार आहे. सूर्याच्या संक्रमणाने कोणत्या राशींवर शुभ परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही. या काळात तुमच्या व्यवहारात चांगली वाढ होईल. समाजात तुमचं स्थान वाढेल. तसेच, आध्यात्मिक क्षेत्रात तुमची आवड वाढणार आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फार शुभ असणार आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. या काळात तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुम्ही प्राप्त करू शकता. जे लोक सतत तुमचा अपमान करत होते तुम्हाला इतरांच्या तुलनेत कमी लेखत होते त्यांचा व्यवहार तुमच्याप्रती बदललेला दिसेल. तुम्हाला धनलाभ होईल. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
सूर्याचं संक्रमण कन्या राशीसाठी फार शुभ ठरणार आहे. तुमची चांगली प्रगती होईल. सरकारी योजनांचा पूर्ण लाभ तुम्हाला घेता येईल. तसेच, तुमच्या नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती पाहायला मिळेल. वाहन खरेदी करण्यासाठी हा काळ चांगला आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. या काळात एखादं काम करण्यासाठी तुम्हाला काही काळ लागेल पण त्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुम्हाला नोकरीसाठी चांगली संधी मिळू शकते. तुमच्या करिअरमध्ये चांगले बदल तुम्हाला दिसतील. तसेच, तुमची आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
सूर्याचं संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळता तुमचं प्रमोशन होऊन तुमच्या पगारात वाढ होऊ शकते. या काळात बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. अन्यथा तुम्हाला त्याची एलर्जी होऊ शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :