एक्स्प्लोर

Horoscope Today, September 5, 2022 : वृषभ, कर्कसह ‘या’ राशींसाठी दिवस असणार फलदायी! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, September 5, 2022 : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असेल. वृषभ राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

Horoscope Today, September 5, 2022 : आज चंद्र सूर्योदयाच्या वेळी मूल नक्षत्रात आणि धनु राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे आणि सूर्य सिंह राशीत आहे. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असेल. वृषभ राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. तुम्ही तुमच्या व्यवसायातील गोंधळ सोडवण्यात व्यस्त राहू शकता. आर्थिक परिस्थिती देखील तुमच्या चिंतेचे कारण बनू शकते. अनावश्यक गोष्टींवर अधिक पैसे खर्च होतील. अधिकाऱ्यांसोबत किंवा काम करणाऱ्या लोकांसोबतच्या मतभेदांमुळे काही नवीन समस्या उद्भवू शकतात. शांत राहण्याचा प्रयत्न करा.

वृषभ (Taurus Horoscope) : व्यवसायात प्रतिष्ठा वाढेल. सर्जनशील कार्यात यश मिळेल. नोकरीच्या क्षेत्रात प्रगती होईल. चांगला प्रवास घडू शकतो. आरोग्य चांगले राहील. नोकरीत बढती मिळू शकते. विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. ऑफिसमध्येही तुम्हाला मान-सन्मान मिळेल. शत्रूचा पराभव होईल. नशिबावर अवलंबून राहू नका आणि कठोर परिश्रम करा.

मिथुन (Gemini Horoscope) : आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायात सावध राहा. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणाव तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. आज व्यवसाय करणार्‍या लोकांना लाभाच्या संधी मिळत राहतील, त्या ओळखून त्यांच्यावर अंमलबजावणी करावी लागेल, तरच नफा मिळवू शकेल. ज्यांना नोकरीत बदल हवा आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. माध्यमांशी संबंधित लोकांना आज काही चांगली बातमी मिळेल. कामानिमित्त एखाद्या प्रवासाला जाण्याची संधी मिळाली तर नक्की जा.

सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस खूप व्यस्ततेचा असेल. कठोर परिश्रमानंतर त्याचे फळ मिळेल. जोडीदारासोबत संध्याकाळचा खास कार्यक्रम फसू शकतो. प्रतिष्ठा वाढेल आणि अचानक काही फायदा होऊ शकतो. आज कुणाशीही वाद घालण्याच्या फंदात पडू नका. बहुप्रतिक्षित कामे पूर्ण झाल्याने आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल.

कन्या (Virgo Horoscope) :  आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. नोकरी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. आधीच सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वादग्रस्त प्रसंगांपासून दूर राहा. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. मित्रांच्या भेटीगाठी संभवतात. तुमचे आरोग्य सामान्य राहील.

तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चाने भरलेला असेल. कोणताही निर्णय घाईघाईने न घेता अत्यंत सावधगिरीने घ्यावा, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा थोडी कमजोर होईल. आज तुमचे खर्चही वाढू शकतात. तुमचे काही शत्रू आज तुमचे नुकसान करतील. कामाच्या ठिकाणी चुकीच्या व्यक्तीला पाठिंबा देणे टाळावे लागेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस फलदायी आहे. थोडी मेहनत केली, तर मान-सन्मान मिळेल. चांगल्या वागण्याने नवीन मित्र बनतील आणि नवीन प्रोजेक्टवर काम देखील सुरू होईल. कौटुंबिक जीवनात जोडीदार आणि मुलांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्रात विशेष बदल होतील आणि कामही पूर्ण होताना दिसेल. कामात प्रगती होईल. धन, मान-सन्मान, कीर्ती वाढेल.

धनु (Sagittarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. सासरच्या लोकांकडून तुम्हाला आर्थिक लाभ होताना दिसत आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना उच्च अधिकार्‍यांच्या कृपेने चांगले पद मिळू शकते, ज्यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढेल. पालकांच्या आशीर्वादाने तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज चांगली संधी मिळू शकते.

मकर (Capricorn Horoscope) : किरकोळ वाद उद्भवू शकतात. वाढत्या खर्चाला आळा घालता येईल. जर तुम्ही कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम केले आणि तुमचे वर्तन सुधारले तर फायदा होईल. वरिष्ठ सदस्य आणि ज्येष्ठ मंडळी काही कारणाने चिंतेत राहतील. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. भेटवस्तू किंवा सन्मानाचा लाभ मिळेल. सहकाऱ्यांकडून मदतीचा हात मिळेल.

कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी असणार आहे. भविष्यातील काही योजनांचा विचार करून जर तुम्ही व्यवसायात पैसे गुंतवलेत, तर ते तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकतात. परंतु, व्यवसाय करणाऱ्या लोकांना क्षेत्रात काही अडचणी येऊ शकतात, ज्या ते त्यांच्या भावांच्या मदतीने दूर करण्यात यशस्वी होतील. दैनंदिन कामात काही अडथळे येतील.

मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळत राहतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. नोकरी करणारे लोक जर व्यवसायाचे नियोजन करत असतील तर, ते यशस्वी होतील. ज्यांना वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत, त्यांच्या अडचणी दूर होतील आणि त्यांना काही चांगली बातमी मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या

Name Astrology: 'O' अक्षराच्या नावाचे लोक असतात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित, सहजासहजी हार मानत नाहीत

Astrology : आयुष्यात प्रगती आणि आनंद हवा असेल, तर रविवारी करा हे 6 सोपे उपाय 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akola Crime News: समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
मोठी बातमी! 29 नक्षल पीडित कुटुंबांना मिळाली शासकीय नोकरी; नियुक्तीपत्रही दिलं, कुठल्या पदावर संधी?
मोठी बातमी! 29 नक्षल पीडित कुटुंबांना मिळाली शासकीय नोकरी; नियुक्तीपत्रही दिलं, कुठल्या पदावर संधी?
Nashik News: भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्याचा आरोप, नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा
भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्याचा आरोप, नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा
सहकार्य करायचं नसेल, तर सुरक्षा मिळणार नाही, जाँईंट सीपी यांना सुरक्षा का दिलीय? आताच्या आता सुरक्षा काढा, मुंबईत आहेत; संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांच्या धमकीचा व्हिडिओच समोर आणला
सहकार्य करायचं नसेल, तर सुरक्षा मिळणार नाही, जाँईंट सीपी यांना सुरक्षा का दिलीय? आताच्या आता सुरक्षा काढा, मुंबईत आहेत; संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांच्या धमकीचा व्हिडिओच समोर आणला

व्हिडीओ

Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report
Nagpur Mahapalika Husban Wife : पतीची बंडखोरी, पत्नी गेली माहेरी; राजकारणातला रुसवा.. कुटुंबात रुसवाफुगवा! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola Crime News: समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
मोठी बातमी! 29 नक्षल पीडित कुटुंबांना मिळाली शासकीय नोकरी; नियुक्तीपत्रही दिलं, कुठल्या पदावर संधी?
मोठी बातमी! 29 नक्षल पीडित कुटुंबांना मिळाली शासकीय नोकरी; नियुक्तीपत्रही दिलं, कुठल्या पदावर संधी?
Nashik News: भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्याचा आरोप, नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा
भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्याचा आरोप, नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा
सहकार्य करायचं नसेल, तर सुरक्षा मिळणार नाही, जाँईंट सीपी यांना सुरक्षा का दिलीय? आताच्या आता सुरक्षा काढा, मुंबईत आहेत; संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांच्या धमकीचा व्हिडिओच समोर आणला
सहकार्य करायचं नसेल, तर सुरक्षा मिळणार नाही, जाँईंट सीपी यांना सुरक्षा का दिलीय? आताच्या आता सुरक्षा काढा, मुंबईत आहेत; संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांच्या धमकीचा व्हिडिओच समोर आणला
Governor Acharya Devvrat: राज्यपाल येती घरा... शेतकऱ्याच्या सारवलेल्या घरात महामहिमांनी खाली बसून केलं जेवण; साधेपणाचे फोटो व्हायरल
राज्यपाल येती घरा... शेतकऱ्याच्या सारवलेल्या घरात महामहिमांनी खाली बसून केलं जेवण; साधेपणाचे फोटो व्हायरल
Thane Municipal Corporation Election 2026: ठाण्यात ठाकरे बंधूंना मोठा धक्का; शिंदेंच्या शिवसेनेनं पहिलं खातं उघडलं, तीन उमेदवार बिनविरोध विजयी!
ठाण्यात ठाकरे बंधूंना मोठा धक्का; शिंदेंच्या शिवसेनेनं पहिलं खातं उघडलं, तीन उमेदवार बिनविरोध विजयी!
Dhananjay Mahadik: आमदारकी धोक्यात, सतेज पाटील विधानपरिषदेलाही उभा राहणार नाहीत; धनंजय महाडिकांचा दावा, काँग्रेसचा धुरळा उडवण्याचा निर्धार
आमदारकी धोक्यात, सतेज पाटील विधानपरिषदेलाही उभा राहणार नाहीत; धनंजय महाडिकांचा दावा, काँग्रेसचा धुरळा उडवण्याचा निर्धार
कल्याण डोंबिवलीत भाजपचे 8 बिनविरोध, मनसेचा अर्ज मागे; बहुतमताच्या आकड्यापासून केवळ एवढ्या जागा दूर
कल्याण डोंबिवलीत भाजपचे 8 बिनविरोध, मनसेचा अर्ज मागे; बहुतमताच्या आकड्यापासून केवळ एवढ्या जागा दूर
Embed widget