Horoscope Today 5 May 2024 : आज कन्या, वृश्चिक राशीचा पाण्यासारखा पैसा खर्च होणार; तर 'या' राशींचं होणार सर्वत्र कौतुक, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 5 May 2024 : आजचा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व 12 राशीच्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 5 May 2024 : पंचांगानुसार, आज 5 मे 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांचा पाडाव कराल. स्वतःची मतं इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.
वृषभ (Taurus Horoscope Today)
कुटुंबात तुमचा शब्द पाळला जाईल, त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. महिलांचा काम करण्याचा उत्साह आज वाढेल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
कोणाच्याही गोड बोलण्याला भुलू नका. नातेवाईकांपासून दोन हात लांब राहिलेलंच बरं पडेल, नाहीतर मनस्ताप होईल.
कर्क (Cancer Horoscope Today)
कोणाला उसने पैसे देऊ नका, नाहीतर ते लवकर मिळणार नाहीत. मुलांविषयी अचानक काही चांगल्या वाईट बातम्या कानावर येतील.
सिंह (Leo Horoscope Today)
आपल्या बोलण्यामुळे कोणाची मनं दुखावली जात नाही ना याचा खूपदा विचार करा. नंतर विचार करून फायदा होणार नाही.
कन्या (Virgo Horoscope Today)
अचानक पैशाचा अपव्यय होण्याची शक्यता आहे. संशोधन क्षेत्रात असणाऱ्या लोकांचा दिवस फारसा लाभदायक नाही.
तूळ (Libra Horoscope Today)
तुमचा तर्क आणि कृती यामध्ये तफावत राहण्याची शक्यता आहे. महिलांना घरातील व्यक्तींच्या तालावर नाचावं लागेल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
घरामध्ये काही आरामदायी गोष्टी तयार करून घ्याल, त्यासाठी भरपूर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.
धनु (Sagittarius Horoscope Today)
कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या हातून जगावेगळ्या कलाकृती घडतील आणि त्याचं सर्वांकडून कौतुकही होईल.
मकर (Capricorn Horoscope Today)
वरिष्ठांची मर्जी राखण्यात नोकरदार यशस्वी होतील. घरात पेल्यातील वादळं निर्माण झाली तरी तडजोडीचे धोरण स्वीकारा.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
जोडीदाराला समजावून घ्यावं लागेल. आजचा दिवस सुखी आणि संपन्न करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील.
मीन (Pisces Horoscope Today)
तुमच्या रसिकतेला आज बहर येईल. काहीतरी नवीन चांगली गोष्ट करण्याकडे कल राहील. आजचा दिवस चांगला जाईल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: