(Source: Poll of Polls)
Horoscope Today 30 June 2024 : महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' राशींना धनलाभाचे योग, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 30 June 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 30 June 2024 : पंचांगानुसार, आज 30 जून 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
एरवी पेक्षा जरा जास्तच व्यवहारी बनाल. जवळच्या प्रवासाचे योग येतील.
वृषभ (Taurus Horoscope Today)
नोकरी व्यवसायात आवश्यक त्या व्यक्तींच्या गाठीभेटी पडून बरेच प्रश्न मार्गी लागतील. दुसऱ्यांना मदतीचा हात द्याल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
आज दुसऱ्यांसाठी स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च कराल. पैशाचे प्रश्न सुटतील.
कर्क (Cancer Horoscope Today)
कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त काम ओळखण्याच्या प्रयत्नांचा शॉर्टकट ग्रहांना पसंत पडणार नाही.
सिंह (Leo Horoscope Today)
आज कामे लवकर होणार नाहीत. चिकाटी कमी पडून धरसोड वृत्ती वाढेल.
कन्या (Virgo Horoscope Today)
महिलांनी मेंदूला फार ताण देणे हितावह नाही. भावांशी थोडे मतभेद होण्याचा संभव आहे.
तूळ (Libra Horoscope Today)
घशाच्या विकाराला तोंड द्यावे लागेल. प्रवासामध्ये मौल्यवान वस्तू सांभाळा.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या स्वतःला सावरायला लागणार आहे. कोणतेही धाडसी निर्णय घेऊ नयेत.
धनु (Sagittarius Horoscope Today)
कोणत्याही गोष्टीने निराश न होता सकारात्मक धोरण स्वीकारा. लेखकांनी या काळात कोणतेही खळबळजनक लिखाण करायचे टाळावे.
मकर (Capricorn Horoscope Today)
आपले विचार दुसऱ्याला पटवून देण्याचे वेगळे मार्ग अवलंबावे लागतील. थोडा तिरसटपणा वाढेल.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
महिलांना इतरांशी व्यवस्थित संवाद साधला तर बरीच कामे होतील. थोडी समाधानी वृत्ती ठेवायला लागणार आहे.
मीन (Pisces Horoscope Today)
आनंदात आणि सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ नाही हे अनुभवाल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: