Horoscope Today 29 July 2025: आज नागपंचमीच्या दिवशी 'या' 6 राशी ठरणार भाग्यशाली! भोलेनाथांच्या कृपेने आयुष्य बदलणार, आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 29 July 2025: आजचा नागपंचमी आणि मंगळवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 29 July 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 29 जुलै 2025, आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. कारण आज श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमीचा दिवस आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज आजूबाजूच्या लोकांशी संबंध चांगले राहतील, तरुण व्यक्तींची पुढारलेली मते न पटल्यामुळे संबंधात ताण-तणाव निर्माण होतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज व्यवसाय हातात तोंडाशी आलेला घास दूर गेल्यामुळे जरा मानसिक त्रास होईल, परंतु चिकाटीच्या जोरावर बरेच काही साधून जाल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज स्टेटस संबंधीचे कोणतेही निर्णय आज टाळलेले बरे, या कामात सरकारी धोरणांमुळे अडथळे असतील तर ते पार करण्यास बराच वेळ जाईल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जाऊन घ्यावे लागेल, महिलांची कामे रेंगाळतील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज थोडी अस्थिरता जाणवेल, मुक्त शत्रूंचा त्रास नोकरी व्यवसायात झाल्यामुळे मानसिक त्रास होईल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज जुने दुखणे डोके वर काढतील आणि नवीन उद्भवलेल्या दुखण्यांकडे डोळे झाक करून चालणार नाही
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज तरुणांनी वाहने जपून चालवावीत, अचानक धनलाभाच्या दृष्टीने चांगली फळे मिळतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज सीमा व्यवसायात असणाऱ्या लोकांना ग्रहांची सात उत्तम मिळेल, धंदा वाढण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होईल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज ध्यानदारांना उपासना करणाऱ्यांना उत्तम दिवस, वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घेतले तर ताण कमी होतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो शक्यतो कोणालाही जामीन राहू नये, महिला विनाकारण काळजी करतील आर्थिक घडामोडी सफल होतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज कामगार वर्ग आणि साधनसामग्री यांची जुळवा जुळव करावी लागेल, यासाठी भरपूर कष्ट घ्याल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज कुटुंबातील लोकांचा असहकार मानसिक अस्वस्थता वाढवणारा ठरेल, त्यासाठी तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल.
हेही वाचा :
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमीला 1 नाही, तर 3 जबरदस्त योग बनतायत! 'या' 3 राशींचं होणार चांगभलं, वाईट दिवस संपलेच म्हणून समजा...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















