(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 29 July 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीने घ्या विशेष काळजी, प्रत्येक काम जबाबदारीने करावं लागणार पूर्ण; वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 29 July 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...
Horoscope Today 29 July 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य (Horocope Today) जाणून घ्या....
तूळ (Libra Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, जे लोक कामाच्या ठिकाणी प्रेझेंटेशन देणार आहेत त्यांनी बॉसचे मार्गदर्शन घ्यावं. काम करणाऱ्या व्यक्तीने डेटा सुरक्षिततेवर देखील लक्ष दिलं पाहिजे, कारण डेटा चोरी होण्याची शक्यता असते.
व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, वैद्यकीय, फार्मसी आणि सर्जिकल व्यवसायाशी संबंधित लोकांना वस्तूंचा पुरवठा करणं किंवा पैसे घेणं यासारख्या कामांसाठी दुसऱ्या शहरात जावं लागू शकतं.
विद्यार्थी (Student) - नवीन पिढीला आपल्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल.तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करून तुमच्या अपेक्षा पूर्ण कराल.
आरोग्य (Health) - मानसिक आजारी रुग्णांनी डॉक्टरांच्या संपर्कात राहून त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं.
वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे तुमचं करिअर पुढे जाण्यास मदत होईल. कंपनीचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी कामसू व्यक्तीची निवड केली जाऊ शकते, अशा परिस्थितीत तुमचं काम चांगलं ठेवा.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तेल आणि रसायन व्यापाऱ्यांची विक्री वाढेल आणि त्यांना अपेक्षित नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या व्यवसायातील भागीदारासोबत काही वाद चालू असतील तर ते मिटलेले दिसते, तुम्ही व्यवसाय हाताळण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा एकत्र येऊ शकता.
विद्यार्थी (Student) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. नवीन पिढी करिअरची काळजी करेल. आवडीचे काम करण्यासाठी वेळ मिळेल. खूप दिवसांनी तुम्हाला जुने मित्र आणि नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, किरकोळ आजार देखील गांभीर्याने घ्या आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. निष्काळजीपणामुळे हा आजार मोठा व्हायला वेळ लागणार नाही.
धनु (Sagittarius Today Horoscope)
नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, नवीन करिअर सुरू करणाऱ्या लोकांनी कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली काम करावं आणि इतरांकडून मिळालेल्या धड्यांचं पालन करावं.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, ध्रुव योग तयार झाल्याने धातू आणि औद्योगिक व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी हिशेबाच्या बाबतीत थोडे गोंधळलेले दिसू शकतात.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, नवीन पिढीने जाणकार लोकांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करा, चांगल्या सल्लागारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती रागावली असेल तर त्याला शांत करण्यासाठी दिवस चांगला आहे.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस सामान्य आहे. तुम्हाला सध्याच्या आजारांपासून लवकरच आराम मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: