Horoscope Today 29 February 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशींवर आज लक्ष्मीची कृपा! करिअर, आर्थिक स्थिती कशी? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Horoscope Today 29 February 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 29 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 29 फेब्रुवारी 2024, गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....
तूळ (Libra Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा दिवस चांगला जाईल. तुमच्यावर जास्त कामाचा बोजा राहणार नाही, ज्यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज व्यवसायात नुकसान सहन करावं लागू शकतं, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचाही सामना करावा लागू शकतो.
विद्यार्थी (Student) - तरुणांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं, रागाच्या भरात कोणाशीही वाईट बोलू नये.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुमच्या डोळ्यांसंबंधित किंवा दातांच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. थंड पदार्थ खाणं टाळा.
वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगतीचे मार्ग सापडतील. तुम्ही तुमच्या कामात मेहनत घेतली तर तुमचा बॉस तुमच्यावर खूश असेल.
व्यवसाय (Business) - आज तुमचा व्यवसाय मध्यम असेल, तुम्हाला जास्त नफा होणार नाही आणि तुमचं नुकसानही होणार नाही.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं तर, आज विद्यार्थी त्यांच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी एकाग्रतेने अभ्यास करतील, ज्यामुळे त्यांना परीक्षेत यश मिळू शकेल.
आरोग्य (Health) - आज आरोग्याच्या बाबतीत थोडं सावध राहावं लागेल. डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते, त्यामुळे तुम्ही कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर काम करताना चष्मा लावलाच पाहिजे.
धनु (Sagittarius Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये मेहनतीने काम केल्यास तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं आणि तुमचा पगारही वाढू शकतो.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात आळशीपणा करू नका. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी कठोर परिश्रम केले तर तुम्हाला प्रगती करता येईल.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाकडे खूप लक्ष देणं आवश्यक आहे.
कौटुंबिक (Family) - आज तुम्ही खरेदीसाठी बाजारात जाऊ शकता, परंतु तुम्ही खूप जास्त पैसे खर्च करू शकता, त्यामुळे तुम्ही हात आखडते घेतले तर बरं होईल, अन्यथा भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :