एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Horoscope Today 28 September 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 28 September 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 28 September 2024 : आज 28 सप्टेंबर 2024. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुम्ही कामाच्या ठिकाणी पूर्णपणे सक्रिय होऊन काम कराल. तुमच्या कामाप्रती असलेल्या उत्साहाला पाहून तुमचा बॉस तुमच्यावर खुश होईल.

व्यापार (Business) - आज तुमच्या कामाचा तुम्ही जास्त प्रचार करायला हवा. तरच, तुमचा व्यवसाय जोमाने पुढे नेता येईल. 

तरूण (Youth) - जे तरूण युवक आहेत ते आपलं कार्य पुढे नेण्यासाठी सक्षम असतील. तरच, तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती करू शकता. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या शरीरात लोहाची कमतरता भासू शकते. यासाठी हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करा.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

नोकरी (Job) - आजच्या दिवशी असं कोणतंच काम करू नका ज्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. 

व्यापार (Business) - आज तुमची रखडलेली जी काही कामं असतील तर ती वेळीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

तरूण (Youth) - आज तुमचे भरपूर पैसे खर्च होऊ शकतात. तुमच्या पार्टनरवर तुम्ही जास्त पैसे खर्च करू शकता. यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवा. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला एसिडीटीचा त्रास होऊ शकतो. यासाठी बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाऊ नका. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

नोकरी (Job) - आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी फार आळस आणि थकवा येऊ शकतो. यामुळे तुमची कामं कदाचित पूर्ण होणार नाहीत. 

व्यापार (Business) - आज व्यापाराच्या ठिकाणी कोणाबरोबरच उधारीचा व्यवहार करू नका. तुमचे पैसे काढून घेण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल.

तरूण (Youth) - आज भावा-बहिणीबरोबर तुमचे चांगले सलोख्याचे संबंध राहतील. यावेळी चुकूनही चिडचिड करू नका.

आरोग्य (Health) - आज तुम्ही डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असू शकता. सर्दी, खोकला, ताप येण्याची शक्यता आहे. 

कर्क रास (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - जे लोक कामाच्या ठिकाणी टार्गेट आधारित काम करतात, त्यांना फोनद्वारे त्यांचं नेटवर्क सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. 

व्यवसाय (Business) - तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला तुमची मार्केटिंग टीम वाढवावी लागेल. व्यापारी आणि व्यावसायिकांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे विषय सोपे करण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षक किंवा वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्यावा. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आज जास्त ताण घेऊ नका.

सिंह रास (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आज तुम्हाला संघाचं नेतृत्व करण्यास सांगितलं जाऊ शकतं. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी दिलेल्या जबाबदाऱ्यांबाबत गांभीर्य ठेवावं लागेल.

व्यवसाय (Business) - व्यवसायात उत्पन्नाच्या अतिरिक्त स्रोतातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना आपलं काम पूर्ण करण्यासाठी त्यांचं नेटवर्क स्ट्राँग ठेवावं लागेल.

विद्यार्थी (Student) - एमबीए आणि मॅनेजमेंटचे विद्यार्थी वेळेवर त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देतील, तरच ते त्यांचं भविष्य चांगले घडवू शकतात. अभ्यासातील आव्हानांना घाबरू नका, त्यांना सामोरे जा.

आरोग्य (Health) - आरोग्याच्या दृष्टिकोनातून, मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही ध्यान, योग, ध्यान इत्यादींमध्ये वेळ घालवला पाहिजे.

कन्या रास (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद आणि चर्चेपासून स्वतःला दूर राहा आणि फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा, अन्यथा नुकसान सहन करावं लागेल.

व्यवसाय (Business) - व्यवसायातील स्पर्धेमुळे तुम्हाला तुमच्या उत्पादनांच्या किमती कमी कराव्या लागतील. ग्रहांची हालचाल लक्षात घेता, प्रतिकूल परिस्थितीमुळे व्यावसायिक सौदे रखडू शकतात.

विद्यार्थी (Student) - तुमचा मूड चांगला असेल आणि तुम्हाला सर्वांचा पाठिंबा असेल, तुम्ही कुटुंबासोबत बाहेर जेवायला जाण्याचा विचार करू शकता. विद्यार्थ्यांची इच्छित कामं पूर्ण होऊ शकतात.

आरोग्य (Health) - डिहायड्रेशनच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल, यावेळी जास्त पाणी प्या.

तूळ रास (Libra Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार लोकांची आज वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये बदली होऊ शकते, जिथे तुम्हाला आधीपेक्षा जास्त पगार मिळेल.  ही बदली तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

व्यवसाय (Business) - जर व्यावसायिकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना सर्व योजना बनवावी लागेल. सर्व प्लॅनिंग केल्यानंतरच तुम्हाला पुढे पाऊल टाकावं लागेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. तुम्ही चांगला अभ्यास केला तर परीक्षेत तुम्हाला चांगले गुण मिळतील. आज तुम्हाला तुमच्या करिअरची काळजी वाटू शकते.

आरोग्य (Health) - तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यायला हवी. जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुम्ही हातातलं काम सोडून आधी विश्रांती घ्यावी आणि मगच कोणतंही काम करावं. तुम्ही आज डोळ्यांची विशेष काळजी घ्या.

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)

नोकरी (Job) - आज अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करायला मिळेल, तुम्ही कामात अत्यंत चांगली कामगिरी बजावाल, ज्यामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील.

व्यवसाय (Business) - उत्पादनांची आयात-निर्यात करणाऱ्या व्यावसायिकांना नफा मिळण्याची दाट शक्यता आहे, मनाप्रमाणे नफा मिळाल्याने तुमचं मन आनंदी राहील.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही चांगला अभ्यास केला पाहिजे, तरच तुम्ही करिअरमध्ये प्रगती करू शकता.

आरोग्य (Health) - आज तुम्हाला तुमच्या कानाचं दुखणं खूप त्रास देऊ शकतं, म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आवश्यक औषधं घ्यावीत.

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेली मेहनत तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकते. तुमचा बॉस तुमच्या कामाची खूप प्रशंसा करेल.

व्यवसाय (Business) - आज व्यावसायिकांनी खूप मेहनत घ्यावी. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचे प्रयत्न करावे, यामुळे भविष्यात तुम्हाला चांगला लाभ मिळेल.

विद्यार्थी (Student) - त्यांनी गणित आणि विज्ञान यासारख्या कठीण विषयांकडे खूप लक्ष दिलं पाहिजे.काही अडचण आल्यास शाळेतील शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या, तरच तुम्हाला तुमच्या वर्गात चांगले गुण मिळू शकतात.

आरोग्य (Health) - थंडीमुळे तुमची पाणी पिण्याची मात्री कमी होईल. तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नका, जास्त पाणी प्या. 

मकर रास (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आज ऑफिसचं काम करताना घाई करू नका, कारण घाईत केलेलं काम बिघडू शकतं आणि त्यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्याशी भांडू शकतात.

व्यवसाय (Business) - आज व्यवसायासाठी तुमचं नशीब चांगलं आहे, तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नये, अन्यथा तो तुमचा विश्वासघातही करू शकतो.

आरोग्य (Health) - तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक करा आणि तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी योगा करून पाहिल्यास चांगलं होईल. 

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आज टेक्नोलॉजीचा वापर करुन ऑफिसचं काम पूर्ण करा, असं केल्याने तुमच्या कामाचा दर्जा सुधारेल. आज वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील, ज्यामुळे तुमचं मन आनंदी होईल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकाला चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्याशी नवीन ग्राहक जोडले जातील.

विद्यार्थी (Student) -  विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांचा सल्ला घ्यावा. त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल, जे त्यांच्या भविष्यात उपयोगी पडेल.

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. आज तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल.

मीन रास (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुमचे ज्युनिअर आणि सिनीअर तुम्हाला कामात मदत करतील, आज तुमचं मन कामात गुंतलेलं असेल.

व्यवसाय (Business) - जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्ही आधी चर्चा करा आणि मगच नवीन प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवा, कारण तुमचा पार्टनर तुम्हाला पुढे फसवू शकतो. हा निर्णय तुमच्या व्यवसायासाठी चांगला असेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी आज त्यांच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावं, आज तुम्ही तुमचा शाळेचा गृहपाठ पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून ओरडा पडेल.

आरोग्य (Health) - तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 28 September 2024 : आज 'या' 3 राशींवर असणार शनिदेवाची कृपा; हाती घेतलेल्या कामात मिळेल यश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला  कसा बनला सत्ताकेंद्र?भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाचSpecial Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget