Horoscope Today 25 January 2025 : आज 'या' 3 राशींना शनी देणार भरभरून आशीर्वाद; वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 25 January 2025 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...
Horoscope Today 25 January 2025 : पंचांगानुसार, आज 25 जानेवारी 2025, शनिवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आज तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये धोरणी आणि व्यवहारिकपणा ठेवायला लागेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
इतरांशी जुळवून घेण्यातच तुमचा स्वार्थ आहे त्यात कमीपणा न मानता त्यांच्याकडून काम करून घ्या.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
महिलांनी आज तटस्थ भूमिका ठेवणे चांगले. आज कोणत्याही ऐहिक सुखाची अपेक्षा करू नका.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
जरुरीपेक्षा जास्त स्वतंत्र वृत्तीमुळे लोकांशी तुमचे फार काळ जमू शकणार नाही.
सिंह रास (Leo Horoscope Today)
तुमच्या चंचल स्वभावाला इतरांना तोंड द्यावे लागेल. तुमच्याच मताला चिकटून राहाल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
आज लोकांचे विचार तुम्हाला पटणार नाहीत. आत्मविश्वास वाढवण्यासाठी थोडी ध्यानधारणा करावी लागेल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
व्यवसाय स्पर्धा तीव्र झाल्यामुळे गिऱ्हाईकाला आकर्षित करण्यासाठी तुम्हाला इतर सुविधा पुरवावे लागतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
खर्च खूप होणार आहेत. महिला कला जोपासतील.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
नोकरीमध्ये नवीन पद्धतीच्या प्रशिक्षणाकरिता तुमची निवड होण्याची शक्यता आहे.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
व्यवसायात नफ्याचे प्रमाण कमी होईल कोणत्याही नियोजनामध्ये थोडे कमी पडाल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा राहणार आहेत त्यासाठी प्रयत्न करावा लागेल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
नोकरी व्यवसायात आत्तापर्यंत जे अडथळे आले होते ते पार करण्याचे धाडस तुम्हाला मिळेल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: