एक्स्प्लोर

Horoscope Today 23 August 2024 : आज शुक्रवारचा दिवस मेष ते मीन राशींच्या लोकांसाठी कसा असेल? वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 23 August 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 23 August 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - जर तुम्ही आज नोकरी संदर्भात मुलाखत देणार असाल तर नीट तयारी करून जा. ओव्हर कॉन्फिडन्स तुमच्या कामात अडथळा आणू शकतो. 

व्यापार (Business) - आज कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा तर्क वितर्क करू नका.

कुटुंब (Family) - कौटुंबिक समस्यांमध्ये मत व्यक्त करताना विचार विनिमय करून द्या. तुमच्या वक्तव्यामुळे समोरची व्यक्ती नाराज होऊ शकते.

आरोग्य (Health) - आज प्रवास करताना सावधगिरीने करा. कारण मध्ये येणारे अडथळे फार आहेत. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - शिक्षकी पेशात जे नोकरदार नोकरी करतायत त्यांच्यासाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. 

कुटुंब (Family) - कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. 

व्यापार (Business) - आज व्यवसायाशी संबंधित कोणतीही चिंता तुम्हाला नसणार. तुमचा व्यवसाय चांगला चालतोय. तुम्हाला त्यातून चांगला नफा मिळतोय. 

आरोग्य (Health) - तुमच्या छोट्यातल्या छोट्या आजारांची कल्पना डॉक्टरांना द्या. कोणताही त्रास लपवून ठेवू नका. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य असणार आहे. तुमच्या जवळच्या नातेवाईकांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. 

आरोग्य (Health) - जर तुम्ही अनेक दिवसांपासून आजारी असाल तर हळूहळू तुमच्या प्रकृतीत सुधारणा होईल. 

व्यापार (Business) - व्यवसायात तुम्ही जो लोकांना विश्वास दिला आहे. त्यावर ठाम राहा. अन्यथा मार्केटमध्ये तुमचं नाव खराब होऊ शकतं.  

विद्यार्थी (Students) - आज एखाद्या कारणावरून तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता. जास्त विचार करणे टाळा. 

कर्क रास (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आज ऑफिसमध्ये घमंड किंवा रागात येऊन कोणतंही कार्य करू नका. ते तुमच्याच आंगलट येऊ शकतं. 

आरोग्य (Health) - जे हृदयरोगी आहेत त्यांनी आज आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. तुमची औषधं वेळेवर घ्या. गोळ्या अजिबात चुकवू नका. 

व्यापार (Business) - जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरवर देखील आंधळेपणाने विश्वास ठेवला पाहिजे. तरच तुमची व्यवसायात प्रगती होईल. 

कुटुंब (Family) - आज तुम्ही गरजूंना पांढऱ्या रंगाचे पदार्थ दान करा. कुटुंबासाठी हे पुण्य काम ठरणार आहे. तसेच, धन-धान्यातही वाढ होईल असा संकेत आहे. 

सिंह रास (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजच्या दिवशी तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. यासाठी कामात लक्षपूर्वक काम करा. 

आरोग्य (Health) - जर तुम्हाला ब्लड प्रेशरची समस्या असेल तर तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला त्रास होईल अशी कोणतीही कामं करू नका. वेळेवर औषधं घ्या. 

युवक (Youth) - जे युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. त्यांच्या मेहनतीला नक्कीच यश मिळेल. फक्त प्रामाणिकपणे आणि मन लावून अभ्यास करा. 

वैवाहिक जीवन (Married Life) - तुमच्या नात्यातील जे जुने वाद आहेत ते वारंवार तुमच्या बोलण्यात आणू नका. यामुळे तुमचे नातेसंबंध आणखी बिघडतील. 

कन्या रास (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळू शकतं. एकंदरीत तुम्ही खुश असाल. 

आरोग्य (Health) - तुम्ही त्वचेशी संबंधित समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही जे ब्युटी प्रोडक्ट्स वापरत आहात ते वापरण्याआधी चांगला रिसर्च करा. मगच ते वापरा. 

युवक (Youth) - तरूणांनी आपल्या भविष्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. फालतू कामांकडे लक्ष न देता भविष्यावर लक्ष केंद्रित करा. वरिष्ठांचं सहकार्य घ्या. 

कुटुंब (Family) - आज दूरचे नातेवाईक तुम्हाला भेटायला येऊ शकतात. अशा वेळी आलेल्या पाहुण्यांशी नीट संवाद साधा. त्रागा करू नका. 

तूळ रास (Scorpio Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात अधिक मन लावून काम करण्याची गरज आहे. 

व्यापार (Business) - तुम्हाला कामाच्या निमित्ताने तुम्हाला बाहेरगावी जावं लागू शकतं. तसेच, तुम्ही व्यवसायाला पुढे नेण्यासाठी सोशल मीडियाचा वापर देखील करू शकता. 

तरूण (Youth) - तुम्ही करिअरवर जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. उज्ज्वल भविष्यासाठी ध्येयवादी राहा. 

आरोग्य (Health) - आज तुमचे आरोग्य सामान्य असणार आहे. अति थंड पदार्थांचं सेवन करू नका. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. अधिकारी तुमच्या प्रमोशनबद्दल चर्चा करू शकतात. 

व्यापार (Business) - आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात जास्त लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुमच्या पार्टनरची साथ तुम्हाला मिळेल. 

तरूण (Youth) - तरूणांनी सामाजिक कार्यात जास्त सक्रिय राहण्याची गरज आहे. 

आरोग्य (Health) - तुमची तब्येत चांगली असणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शारीरिक कष्ट करावं लागणार नाही. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमचं काम पाहून तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमचा बॉस तुमच्या कामाला घेऊन प्रभावित असेल. 

व्यापार (Business) - व्यावसायिक लोकांना आज व्यवसायात चांगला नफा मिळेल. त्यामुळे तुमचा उत्साह आणखी वाढेल. 

तरूण (Youth) - जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांना चांगलं यश मिळू शकतं. लक्षात घ्या तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. 

आरोग्य (Health) - आज तुम्ही तुमच्या आरोग्याची चांगली काळजी घ्या. बाहेरच्या खाण्याने तुमचं पोट दुखू शकतं. 

मकर रास (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - तुम्ही कामाच्या ठिकाणी एम्प्लॉयी ऑफ द मंथच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असाल. नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला आहे.

व्यवसाय (Business) - व्यावसायिक आज सर्व समस्यांवर मात करून पुढे जातील. व्यावसायिक लोकांना आज एखादा नवीन भागीदार मिळू शकतो.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आळशीपणाने भरलेला असेल. तुम्हाला तुमच्या करिअरची काळजी वाटू शकते, त्यामुळे तुम्हालाही अडकल्यासारखं वाटू शकतं.

आरोग्य (Health) - तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक करा आणि तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी योगा करून पाहिल्यास चांगलं होईल. 

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुमच्यावरील जबाबदाऱ्या वाढू शकतात. नोकरदार लोकांनी बॉसच्या इशाऱ्यावर काम करण्यास तयार रहावं, तुमचा संपूर्ण दिवस बॉसच्या इशाऱ्यावर नाचण्यात जाणार आहे.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकाला चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्याशी नवीन ग्राहक जोडले जातील.

कौटुंबिक (Family) - आज तुमच्या घरात पाहुण्यांची ये-जा असेल. तुम्ही सर्वांनी एकत्र बसून वेळ घालवा.

आरोग्य (Health) - तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी, फूड पॉयझनिंगची समस्या तुम्हाला भेडसावू शकते, त्यामुळे तुम्हाला खूप त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. अगदी थोडीशी समस्या असल्यास डॉक्टरांकडे जा, तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. 

मीन रास (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ, बॉस आणि टीम मॅनेजमेंटकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आज ऑफिसमध्ये मीटिंग अटेंड करावी लागेल.

व्यवसाय (Business) - आज व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात, पण तुम्ही त्या सहज सोडवाल. तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता. आज तुम्हाला पैशाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांचा सल्ला घ्यावा. त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल, जे त्यांच्या भविष्यात उपयोगी पडेल.

आरोग्य (Health) - आज तुम्हाला कोणतीच समस्या जाणवणार नाही. आरोग्य सुधारल्याने कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाला गती मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 23 August 2024 : आजचा दिवस खास! 'या' राशींना मिळणार मेहनतीचं फळ, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12  डिसेंबर 2024 : ABP MajhaAtul Subhash Special Story : सासरच्या छळाला कंटाळून तरूणानं जीव दिलाABP Majha Headlines :   7 AM :  12 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Embed widget