Horoscope Today 20 May 2025: आजचा मंगळवारचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! श्रीगणेशाची कृपा कोणावर असेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 20 May 2025: आजचा मंगळवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 20 May 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 20 मे 2025, आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या दृष्टीने शिक्षण घेण्यासाठी वेगळ्या वाटा शोधाव्या लागतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज महिलांना घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल, बरेच दिवसांपासून घरामध्ये चर्चिला जाणारा एखादा प्रश्न सामोपचराने सुटेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज घरामध्ये उंची वस्तूंची खरेदी होईल, कुटुंबीयांच्या आग्रहाखातर कर्मणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वादही घ्याल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज घरातील एखाद्या अहंकारी व्यक्तीच्या सहवासामुळे मानसिक स्वास्थ बिघडेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायामध्ये अचानक बदल संभवतात, त्या बदलाशी जमवून घेणे थोडे अवघड जाईल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज प्रकृती स्वास्थ्य सांभाळावे, ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे, त्यांनी पथ्य सांभाळावे
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज पाय दुखण्यासारख्या किरकोळ गोष्टींचाही विचार आवश्यक करा, धंद्यामध्ये भरपूर स्पर्धा असली तरी सर्वांना पुरून उराल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज महिलांना घरचे आणि बाहेरचे सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज अति भावनेच्या आहारी जाऊन, एखाद्या वेळी चुकीची पावलेली तुमच्याकडून उचलली जाऊ शकतात.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज सत्य परिस्थितीचा विचार करून मार्ग आखा, विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून दुसरेच काहीतरी करावेसे वाटेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायामध्ये कामात बदल होऊ शकतो, जी कामे ठरवाल ती कामे लवकर होण्यासाठी वेगळा पर्याय निवडाल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज महत्त्वाची बोलणी आज करू नये, आज लहान मुलं प्रचंड लहरी आणि हेकट बनतील.
हेही वाचा :




















