Rahu Transit 2025: अखेर तो क्षण आलाच! राहूने शनीच्या राशीत प्रवेश केलाच, 'या' 3 राशींना श्रीमंत होण्यापासून कोणी अडवू शकत नाही, तुमची रास कोणती?
Rahu Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, रविवार 18 मे 2025 रोजी मायावी ग्रह राहूने आपली राशी बदलली आहे. या संक्रमणामुळे कोणत्या 3 राशीं मालामाल होणार? जाणून घेऊया.

Rahu Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार 2025 हे वर्ष अनेकांसाठी खास असणार आहे. अनेक ग्रहांचे संक्रमण, राशीबदल, नक्षत्र बदल होणार आहेत. यामुळे काही राशींच्या आयुष्यात मोठं वळण येण्याची शक्यता आहे. मे महिना देखील ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून खास आहे. कारण या महिन्यात शनि, राहू सह विविध ग्रहांच्या मोठ्या हालचाली होणार आहेत, त्यापैकी राहू हा एक मायावी आणि छाया ग्रह मानला जातो. हा एक अशुभ ग्रह आहे जो अनपेक्षित घटना, लोभ, धूर्तपणा, सांसारिक इच्छा, परदेश प्रवास, नाव आणि पैशाशी संबंधित आहे. जेव्हा जेव्हा हा ग्रह संक्रमण करतो म्हणजचे एखादी राशी किंवा नक्षत्र बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम जगातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होतो. वैदिक दिनदर्शिकेच्या गणनेनुसार, राहू सुमारे 18 महिन्यांनी आपली राशी बदलतो. या संक्रमणाचा परिणाम देश-विदेश तसेच 12 राशींवर होताना पाहायला मिळतो.
राहूचे हे संक्रमण कोणासाठी फायदेशीर ठरणार?
ज्योतिषशास्त्रानुसार, रविवारी 18 मे 2025 रोजी, दुपारी 4:30 वाजता, राहूने मीन राशीतून कुंभ राशीत संक्रमण केले आहे. तसं पाहायला गेलं तर राहू उलट दिशेने भ्रमण करतो. म्हणूनच, पुढे जाण्याऐवजी, राहूने उलट दिशेने म्हणजेच मीन राशीतून कुंभ राशीत संक्रमण केले आहे. या संक्रमणाचा परिणाम देश-विदेश तसेच 12 राशींवर होणार असल्याचे सांगितले जाते. 12 पैकी 3 राशी अशा आहेत, ज्यांच्या जीवनात या संक्रमणामुळे आनंद वाढेल. राहूचे भ्रमण कोणत्या 3 राशींसाठी चांगले राहील? राहूचे हे संक्रमण कोणासाठी फायदेशीर ठरणार आहे? जाणून घेऊया.
धनु
ज्योतिषशास्त्रानुसार, राहूच्या या संक्रमणाचा प्रभाव धनु राशीच्या तिसऱ्या भावावर पडेल. हा भाव भाऊ-बहिणीच्या नात्याशी, प्रवासाशी आणि शौर्याशी संबंधित आहे. जर तुमचे तुमच्या भावंडांशी संबंध चांगले नसतील तर संबंध सुधारतील. त्यांच्यासोबत वेळ घालवून तुम्हाला आनंद होईल. ज्यांनी अद्याप विमानात प्रवास केलेला नाही त्यांना विमानाने प्रवास करण्याची सुवर्णसंधी मिळेल. याशिवाय, तुमचा स्वभाव मऊ होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल.
मेष
ज्योतिषशास्त्रानुसार, राहूच्या या संक्रमणाचा प्रभाव मेष राशीच्या 7 व्या घरावर पडेल. 7 वे घर भागीदारी आणि व्यवसायाशी संबंधित आहे. त्यामुळे, येत्या काळात मेष राशीच्या व्यावसायिकांना भागीदारीत केलेल्या कामाचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. काही लोकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या संधी मिळतील, तर अनेकांना परदेशातून फायदा होईल. याशिवाय, तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रत्येक कामात सहकार्य मिळेल, ज्यामुळे घरात प्रेम, आनंद आणि समृद्धी वाढेल.
मिथुन
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीव्यतिरिक्त, राहूचे हे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी देखील फायदेशीर ठरेल. या संक्रमणाचा प्रभाव तुमच्या नवव्या भावावर पडेल. हे घर नशिबाचे आणि प्रवासाचे आहे. यामुळे आता तुम्हाला प्रत्येक कामात नशीब साथ देईल, ज्यामुळे तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागणार नाही. याशिवाय, तुम्हाला प्रवास करण्याची सुवर्णसंधी मिळेल. तुमच्या कुंडलीत परदेश प्रवासाचीही शक्यता आहे.
हेही वाचा :
June 2025 Astrology: खूप सोसलं, जूनमध्ये 'या' 3 राशींनी टेन्शन सोडा! शुक्र राशी बदलणार, अमाप संपत्तीचे धनी व्हाल, कुबेराचा खजिना उघडणार?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















