Horoscope Today 2 May 2024 : आजचा गुरुवार महिलांसाठी खास! मेष, मिथुनसह 'या' राशींकडे धावून येणार प्रगतीच्या संधी; वाचा सर्व 12 राशींचे राशीभविष्य
Horoscope Today 2 May 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा गुरुवारचा दिवस कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 2 May 2024 : पंचांगानुसार, आज 2 मे 2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा गुरुवारचा दिवस कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास
आज तुम्हाला कर्मणुकीचे कार्यक्रम बघण्याचा मोह होईल. घरात थोडे वादावादीचे प्रश्न उद्भवले तरी जास्त मनावर न घेता समजुतीचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा.
वृषभ रास
प्रसिद्धी आणि पराक्रम वाढवणारा दिवस आहे. महिलांना मनाप्रमाणे वागण्यास सुखद काळ आहे.
मिथुन रास
आज प्रेम आणि सौंदर्य याचे चाहते व्हाल. भरपूर सुख आणि आराम मिळेल. महिलांचा आज खर्च जास्त होईल.
कर्क रास
प्रेम प्रकरणांमध्ये आपली बाजू मांडायला हरकत नाही. त्यामध्ये धाडस दाखवणार आहात. आज पैशाला कमी पडणार नाही.
सिंह रास
उगीचच केलेल्या रडत राऊ पणामुळे प्रगती खुंटण्याची शक्यता आहे. ज्यांना मणक्याचा आणि हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी वेळीच उपचार घ्यावेत.
कन्या रास
काम करताना काही अंगलट येणार नाही ना म्हणून बराच चिकित्सकपणा कराल. मनाचा दिलदारपणा दाखवलात तर सौख्याची दारे खुली होतील.
तूळ रास
तुमच्या बुद्धीला आव्हान देणारी क्षेत्रे तुम्हाला खुणावतील. यश कष्टानेच मिळेल पण त्यात स्थैर्य असेल.
वृश्चिक रास
घरासाठी काही पैसा खर्च करावा लागेल पण त्याचा त्रास वाटणार नाही. जोडीदाराचे उत्तम सहकार्य तुमचा उत्साह वाढवेल.
धनु रास
वैवाहिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. जोडीदाराच्या मनाप्रमाणे वागाल त्यामुळे घरातील वातावरण हे आनंदी उत्साही राहील.
मकर रास
पैसा मिळेल परंतु त्याला अनेक वाटा फुटतील तेव्हा तज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करायला हरकत नाही. मोहाचे अनेक क्षण येतील.
कुंभ रास
स्वच्छंदी ऐशारामी जीवन जगावेसे वाटेल परंतु त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी दाखवणार नाही. महिलांचा स्वाभिमान सुखावेल अशा घटना घडतील.
मीन रास
नोकरी व्यवसायात थोडी चिकाटी आणि निग्रही वृत्ती दाखवली तर बरीच कामे मार्गी लागतील. आपल्याला कोणी फसवत नाही ना याची काळजी घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: