Horoscope Today 2 December 2025: डिसेंबरचा दुसरा दिवस 6 राशींचे भाग्य घेऊन आला! श्रीगणेशाच्या कृपेने संकट टळणार, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 2 December 2025: डिसेंबरचा दुसरा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 2 December 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 2 डिसेंबर 2025, आजचा वार मंगळवार आहे. डिसेंबर महिन्याचा दुसरा दिवस असल्याने ज्योतिषशास्त्राच्या (Astrology) दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज भरपूर कष्ट करावे लागत असल्यामुळे तुमच्या स्वभावात थोडी निराशा येऊ शकते
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज स्वतःला प्रकाशात आणायचे असेल तर, कोणा मध्यस्थचा आधार घ्यावा लागेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज लवकर कामे होतील, तुमची ध्येय धोरणे अव्यवहारी नाहीत ना, हे सुद्धा तपासून पाहणे गरजेचे ठरेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज गुप्त शत्रूंपासून सावध राहा, ज्या गोष्टी तुमच्या कक्षाच्या बाहेर आहेत, त्याचा विचार करू नका
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज महिलांनी भावनेचा अतिरेक, अंधविश्वास आणि अविवेकी प्रेम करू नये
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज असुरक्षितपणाची भावना तुम्हाला त्रास देईल, त्यामुळे थोडे अस्थिर बनाल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज भाग्याची साथ कमी मिळाली तरी, व्यवसायात एखादी ठरवलेली गोष्ट करण्यासाठी खूप प्रयत्न कराल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज प्रकृतीला जपावे लागेल, सभोवतालच्या माणसांशी चांगले हितसंबंध ठेवाल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज वडिलोपार्जित इस्टेट विषयी कामे मार्गी लागतील, तुमच्या कल्पकतेला लोक दाद देतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज दूरदृष्टी ठेवून काम करालस महिला तडफदार बनतील, लोक तुम्हाला स्वार्थी म्हणण्याची शक्यता आहे
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज आत्मविश्वास वाढेल, स्वतःमध्ये सुधारणा कराल, त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला सहज मिळणार आहेत.
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज वाहने जपून चालवणे गरजेचे, नको ते धाडस अजिबात करू नये
हेही वाचा
Shani Transit 2025: वर्ष संपायच्या आधीच 5 राशींची पाचही बोटं तुपात! शनि महाराज प्रसन्न, 2027 पर्यंत मोठी भरभराट, इच्छा पूर्ण करणार..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















