Horoscope Today 18 November 2025: आजचा मंगळवार 'या' 4 राशींसाठी भाग्यशाली! बाप्पांच्या कृपेने होणार ईच्छापूर्ती, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 18 November 2025: आजचा मंगळवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 18 November 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 18 नोव्हेंबर 2025, आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज व्यवसाय तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने काम होईल मागचा पुढचा विचार न करता फक्त काम करणे हे सगळे तुमच्यापुढे राहील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज चलाखणी दुर्तपणाने वरिष्ठांची मने जिंकाल, डोकेदुखी आणि त्वचा विकाराचे त्रास होऊ शकतात
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज लेखन कलेतून प्रेरणा मिळेल वक्तृत्व कलेतून जवळच्या माणसांना आपलेसे कराल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज फायदा तोटा क्षणभर बाजूला ठेवला तरी, धंद्यामध्ये तुमच्या बुद्धीची झलक आणि योग्य समय सूचकता दिसून येईल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज महिलांनी भावनांवर नियंत्रण ठेवावे, गरिबांची कणव येऊन त्यांना मदत कराल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज आज पदरमोड करून स्वतःचे नुकसान करून मोठेपणा मिळवाल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज कामाला आत्मविश्वासाची जोड दिलीत तर प्रत्येक गोष्ट यशस्वी कराल, थोडा तापट स्वभाव सोडावा लागेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज लोक तुम्हाला आतल्या गाठीचे म्हणून मिळवतील, परंतु त्याकडे जास्त लक्ष न देता कामाकडे लक्ष द्या
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज मी जिंकू शकतो हा सकारात्मक विचार, तुमच्या कामाला गती देणार आहे
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज सर्व उद्दिष्टे साध्य करताना घराकडे मात्र थोडे दुर्लक्ष होईल, महिलांनी उतावळेपणा करू नये
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज निरोगी विचाराच्या सानिध्यात निराशेचे मळभ दाटून येणार नाहीत, हा विश्वास ठेवा
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज तुम्हाला मोठेपणा मिळाल्यामुळे खुश व्हाल, त्यामुळे तुमच्याकडून काम करवून घेणे सहज शक्य होईल
हेही वाचा
Shani Margi 2025: शनिदेवांच्या परीक्षेतून 3 राशींची अखेर सुटका! 28 नोव्हेंबरनंतर शनि मार्गी होणार, पैसा यायला सुरूवात, कोणत्या राशी होणार मालामाल?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


















