Horoscope Today 17 October 2024 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Horoscope Today 17 October 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 17 October 2024 : आज 17 ऑक्टोबरचा दिवस म्हणजेच गुरुवारचा दिवस. गुरुवारचा हा वार दत्तगुरुंचा आहे. आजच्या दिवसाबद्दल बोलायचं झाल्यास, आजच्या दिवसाचा काही लोकांना लाभ तर काही लोकांना तोटा होणार आहे. त्यानुसार, आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Today Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमचं महत्त्वाचं काम असेल तर ते पूर्ण करण्यात तुम्हाला यश येईल. तसेच, दिवाळी जवळ आली असल्यामुळे घराची साफसफाई करण्यात तुम्ही व्यस्त असाल. जे अविवाहीत आहेत त्यांना लवकरच लग्नासंबंधित शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला विशेष काही महत्त्वाचं काम करायचं असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
वृषभ रास (Taurus Today Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांबद्दल बोलायचं झाल्यास तुमचा आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज कुटुंबाची चांगली साथ तुम्हाला मिळेल. तसेच, जर तुम्ही रोजगाराच्या संबंधित गोंधळात असाल तर तुम्ही घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेऊ शकता. तसेच, एखाद्या मोठ्या प्रोजेक्टच्या बाबतीतही बातचीत होऊ शकते.
मिथुन रास (Gemini Today Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. आज तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर जास्त वेळ घालवाल. तसेच, नशिबाची चांगली साथ तुम्हाला मिळेल. तुमच्या जोडीदाराबरोबर आज तुम्ही फिरायला जाण्याचा बेत आखू शकता.
कर्क रास (Cancer Today Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार सामान्य असणार आहे. तसेच, आज कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. आज तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा तुमची ठरविलेली कामेही बिघडतील. आज तुमच्या मनातील भावना कोणाशीही शेअर करु नका.
सिंह रास (Leo Today Horoscope)
सिंह राशीच्या लोकांबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमचा जुना मित्र भेटण्याची शक्यता आहे. तसेच, ऑनलाईन शॉपिंगही तुम्ही करु शकता. आज आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडं लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे अस्वस्थ वाटल्यास वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
कन्या रास (Virgo Today Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज कला क्षेत्रात तुमची आवड वाढलेली दिसेल. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण असेल. तसेच, मित्रांबरोबर तुम्ही फिरायला जाऊ शकता. आजच्या दिवशी धनलाभाचा चांगला योग जुळून आला आहे.
तूळ रास (Libra Today Horoscope)
आजचा दिवस चांगला जाईल. नोकरीत कामाचा ताण असेल, परंतु जास्त लोड घेऊ नका. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यापारी वर्गाचा दिवस चांगला असेल. सणांचे दिवस येत असल्याने नफा होईल.तुमच्या परीक्षा सुरू असतील तर जोमाने अभ्यास करा, तरच अपेक्षित यश मिळेल.तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, ताप आणि घसादुखी तुम्हाला हैराण करू शकते.
वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)
नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचा आज कामाचा ताण खूप वाढू शकतो. बाकी लोकांना ऑफिसमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. व्यापारी वर्ग वस्तूंवर चांगली सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करू शकतो. ग्राहकांची संख्या लक्षणीय वाढेल, ज्यामुळे नफाही वाढेल. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं तर, आज तुमच्यावर अभ्यासाचं ओझं असेल. काही कामासाठी पालकांकडून पैसे घेण्याची गरज पडेल. आजार किरकोळ आजार जाणवेल, थकवा जाणवेल.
धनु रास (Sagittarius Today Horoscope)
नोकरदार लोकांना आज लाभ होईल. तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध चांगले राहतील, ते तुमच्यावर खूश होऊन काही चांगला निर्णय घेऊ शकतात.रिअल इस्टेटमधील व्यावसायिकांचा हा काळ चांगला असेल. तुम्ही जी कोणती डील कराल त्यात चांगला नफा मिळू शकेल.
तुम्ही आज अभ्यासात जास्त लक्ष द्यावं, अन्यथा परीक्षेत कमी गुण मिळतील आणि आईवडिलांचा ओरडा मिळेल.आज तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. पोटदुखी किंवा डोकेदुखी तुम्हाला खूप त्रास देऊ शकते.
मकर रास (Capricorn Today Horoscope)
आजचा दिवस तुमचाच आहे. कामात आज तुम्हाला चांगला लाभ होईल, सहकाऱ्यांचं सहकार्यही लाभेल.आज व्यवसायासाठी नशीब तुमच्या बाजूने असेल, तुम्हाला नफा मिळेल. जे काही काम हाती घ्याल त्यात नक्कीच यश मिळेल. आज कोणावरही जास्त विश्वास ठेवू नये, अन्यथा विश्वासघात होऊ शकतो. तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी जिम लावा, योग करा.
कुंभ रास (Aquarius Today Horoscope)
आजचा दिवस चांगला आहे. टेक्नोलॉजीचा मदतीने ऑफिसची कामं पूर्ण करा, वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगल्या डील मिळू शकतात. तुम्हाला चांगली नफा मिळेल, नवीन ग्राहक जोडले जातील.विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांचं ऐकावं, त्यांचा सल्ला घ्यावा, प्रगती होईल.आज तुमचं आरोग्य ठीक असेल. कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही.
मीन रास (Pisces Today Horoscope)
आज तुमचे ज्युनिअर आणि सिनीअर तुम्हाला चांगली मदत करतील, तुमच्यावर कामाचा अतिरिक्त भार असेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असील तर नवीन प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवा, हा निर्णय तुमच्या व्यवसायासाठी चांगला असेल. विद्यार्थ्यांनी आज अभ्यासाकडे लक्ष द्यावं, अन्यथा तुम्हाला शिक्षकांकडून ओरडा पडेल. शरीर फिट ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :