(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 17 May 2024 : कामात त्रास, वाढतं आजारपण आणि मानसिक खच्चीकरण तूळ, वृश्चिक, धनु राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; राशीभविष्य
Horoscope Today 17 May 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....
Horoscope Today 17 May 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....
आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....
तूळ (Libra Today Horoscope)
नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुम्ही जरा सावधच राहा. तुमचे विरोधक तुमच्यावर नजर ठेवून असतील आणि तुम्हाला चुकीच्या गोष्टीत गुंतवू शकतील.
आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य एकदम चांगलं असणार आहे. फक्त मनाच्या शांतीसाठी तुम्ही मंदिरात जाऊन येऊ शकता.
व्यापार (Business) - पार्टनरशिपमधून सुरु केलेल्या व्यवसायाला चांगलं यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स मिळतील.
तरूण (Youth) - आज तुमची एका खास व्यक्तीशी ओळख होऊ शकते. जिच्याकडून तुम्हाला खूप काही शिकता येईल.
वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)
नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला वरिष्ठांच्या वागणुकीचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी खचून जाऊ नका.
आरोग्य (Health) - आज डोळ्यांवर तणाव येईस अशी कामं करू नका. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरवर जास्त वेळ घालवू नका.
व्यापार (Business) - आळस आणि थकव्यामुळे आज कामात तुमचं मन रमणार नाही.
प्रेमसंबंध (Relationship) - तुमच्या जोडीदाराबरोबर छान वेळ घालवता येईल. अनेक नवीन वस्तूंची खरेदी कराल.
धनु रास (Sagittarius Today Horoscope)
नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. कामात प्रामाणिक राहा.
आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं असेल पण आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका. वेळोवेळी आरोग्य तपासणी करा.
व्यापार (Business) - व्यापारात विश्वास ठेवताना जरा जपून ठेवा. कोणालाही पैसे देताना सावधानता बाळगा.
कुटुंब (Family) - कुटुंबाची परिस्थिती चांगली असणार आहे. नातेवाईकांशी भेटीगाठी होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: