एक्स्प्लोर

Horoscope Today 17 August 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 17 August 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 17 August 2024 : आज शनिवारचा दिवस. ज्योतिष शास्त्रानुसार आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे.आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. 

व्यापार (Business) - व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमचा व्यवसाय पुढे कसा नेता येईल. याचा सतत तुम्ही विचार कराल. 

कुटुंब (Family) - तुमच्या कुटुंबात आज आनंदाचं वातावरण असेल. कुटुंबासाठी काहीतरी करण्याचा विचार तुमच्या मनात येईल. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला डोळ्यांचा त्रास जाणवेल. त्यामुळे तुम्ही तुमचा स्क्रिन टाईम कमी करावा. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप ताण असेल. त्यामुळे तुम्हाला मानसिक थकवा जाणवेल.

आरोग्य (Health) - आज तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. त्यामुळे वेळेनुसार आराम करा. 

व्यवसाय (Business) - आज तुमची व्यवसायातील आर्थिक स्थिती आधीपेक्षा फार चांगली असणार आहे. काम करण्यास उत्साह असेल.

युवक (Youth) - तरूणांनी मेहनत करत राहणं गरजेचं आहे. एक ना एक दिवस यश नक्की तुम्हाला मिळेल. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आज ऑफिसमध्ये सगळे तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुम्हाला प्रोत्साहन, मार्गदर्शन देतील. तसेच, नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपविण्यात येईल. 

आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य सामान्य असणार आहे. फक्त कोणत्याच प्रकारचा तणाव घेऊ नका. मानसिक शांतता राखा.

व्यापार (Business) - आज महिला व्यापाऱ्यांनी आपल्या कामात सावध राहणं गरजेचं आहे. कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकतं. 

तरूण (Youth) - मित्रांच्या सहकार्याने आज तुमची अनेक कामं सहज साध्य करता येईल. मित्रांचं ऋण तुम्ही आयुष्यभर फेडाल. 

कर्क रास (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आज ऑफिसमध्ये घमंड किंवा रागात येऊन कोणतंही कार्य करू नका. ते तुमच्याच आंगलट येऊ शकतं. 

आरोग्य (Health) - जे हृदयरोगी आहेत त्यांनी आज आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. तुमची औषधं वेळेवर घ्या. गोळ्या अजिबात चुकवू नका. 

व्यापार (Business) - जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरवर देखील आंधळेपणाने विश्वास ठेवला पाहिजे. तरच तुमची व्यवसायात प्रगती होईल. 

कुटुंब (Family) - आज तुम्ही गरजूंना पांढऱ्या रंगाचे पदार्थ दान करा. कुटुंबासाठी हे पुण्य काम ठरणार आहे. तसेच, धन-धान्यातही वाढ होईल असा संकेत आहे. 

सिंह रास (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजच्या दिवशी तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. यासाठी कामात लक्षपूर्वक काम करा. 

आरोग्य (Health) - जर तुम्हाला ब्लड प्रेशरची समस्या असेल तर तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला त्रास होईल अशी कोणतीही कामं करू नका. वेळेवर औषधं घ्या. 

युवक (Youth) - जे युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. त्यांच्या मेहनतीला नक्कीच यश मिळेल. फक्त प्रामाणिकपणे आणि मन लावून अभ्यास करा. 

वैवाहिक जीवन (Married Life) - तुमच्या नात्यातील जे जुने वाद आहेत ते वारंवार तुमच्या बोलण्यात आणू नका. यामुळे तुमचे नातेसंबंध आणखी बिघडतील. 

कन्या रास (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळू शकतं. एकंदरीत तुम्ही खुश असाल. 

आरोग्य (Health) - तुम्ही त्वचेशी संबंधित समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही जे ब्युटी प्रोडक्ट्स वापरत आहात ते वापरण्याआधी चांगला रिसर्च करा. मगच ते वापरा. 

युवक (Youth) - तरूणांनी आपल्या भविष्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. फालतू कामांकडे लक्ष न देता भविष्यावर लक्ष केंद्रित करा. वरिष्ठांचं सहकार्य घ्या. 

कुटुंब (Family) - आज दूरचे नातेवाईक तुम्हाला भेटायला येऊ शकतात. अशा वेळी आलेल्या पाहुण्यांशी नीट संवाद साधा. त्रागा करू नका. 

तूळ रास (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - नोकरदार वर्गाबद्दल बोलायचे झाल्यास, आजचा दिवस तुमच्यासाठी सावधानतेचा असणार आहे. ऑफिसमध्ये कामाच्या बाबतीत नवीन प्रयोग करू नका. गोंधळात पडू शकता. 

व्यापार (Business) - व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. व्यापारी फार विचारपूर्वक आपला व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करतील. 

प्रेमसंबंध (Relationship) - तुमचे प्रेमसंबंध पूर्वीपेक्षा अधिक चाांगले होतील. नात्यात जोडीदाराकडून समजूतदारपणा जास्त वाढताना दिसेल. 

आरोग्य (Health) - तुमची तब्येत चांगली असेल फक्त बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळा. त्यामुळे तुमचं पोट बिघडू शकतं. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी आज तुमचं मन रमणार नाही. अनेक गोष्टींचा विचार तुमच्या मनात सतत तुम्हाला त्रास देत राहील.

तरूण (Youth) - तरूणांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही अडथळे येऊ शकतात. ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ राहील. नात्याला वेळ द्या. सर्व गोष्टी सुरळीत होतील. 

कुटुंब (Family) - कुटुंबातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कामाच्या व्यापातून कुटुंबियांनाही थोडा वेळ द्या.

आरोग्य (Health) - आज आहार चांगला घ्या. हेल्दी खाण्यावर लक्ष द्या. बाहेरच्या खाण्यामुळे तुमचं पोटही बिघडू शकतं त्यामुळे सावध राहा. 

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल.

व्यापार (Business) - व्यापारी वर्गातील लोकांना लवकरच नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं. मित्राच्या मदतीने तुमचं काम अधिक सोपं होणार आहे. 

कुटुंब (Family) - आज कुटुंबियांबरोबर धार्मिक स्थळी जाण्याचा योग येणार आहे. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. मन प्रसन्न राहील. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबरोबरच तुमच्या केसांचीही योग्य काळजी घ्या. वेळीच उपचार न केल्यास समस्या अधिक वाढू शकते. 

मकर रास (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणं आवश्यक आहे, तुमच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो. 

व्यवसाय (Business) - गुंतवणूकदार तुमच्या व्यवसायात रस दाखवू शकतात, परंतु तुम्ही विचार करूनच भागीदारीत व्यवसाय करावा. 

विद्यार्थी (Student) - आज तुम्हाला काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यात तुम्ही उत्साहाने सहभागी व्हाल. 

आरोग्य (Health) - आज तुमची तब्येत बिघडू शकते. तब्येत बिघडल्यामुळे तुमचा स्वभाव खूप चिडचिडा होईल, यामुळे तुमचे कुटुंबीय तुमच्यावर रागवतील.

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरीत बढती किंवा बदली होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, परंतु यावेळी तुम्ही तुमचं कौशल्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.

व्यवसाय (Business) - व्यवसायातील मालमत्तेत वाढ होईल आणि तुम्ही योग्य नियोजन करून प्रत्येक काम करू शकाल. व्यावसायिकांसाठी काळ चांगला ठरणार आहे. 

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, तरच ते यश मिळवू शकतात. 

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. फक्त खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या.

मीन रास (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमचा बॉस तुमच्या कामाने प्रभावित होऊन तुमचा पगार वाढवू शकतो. तुमच्या कामात तुम्हाला मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसाय आज चांगला चालेल, ज्यामुळे तुमची कमाई वाढेल. तुमच्यासाठी हा जुन्या गोष्टी सोडून व्यवसायात पुढे जाण्याचा दिवस आहे. 

विद्यार्थी (Student) - तुम्ही अभ्यासात जास्त लक्ष दिलं पाहिजे. नवीन पिढीला नकारात्मक गोष्टींपासून दूर राहावं लागेल, त्यांचे मन त्यांना भविष्यात नुकसान होईल अशा गोष्टी करायला सांगेल. 

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम मोडू नका, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 17 August 2024 : आज 'या' राशींवर असणार शनीची कृपा; मनातील इच्छा सहज होतील पूर्ण, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Jalgaon | जळगाव अपघात प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 5 लाखाची मदतABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra NewsJalgaon Railway Accident | जळगावात भीषण अपघात, अनेक जणांनी गमावला जीव ABP MajhaPushpak Express Accident : अपघात नेमका कसा झाला? पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांची EXCLUSIVE माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
Embed widget