Horoscope Today 14 July 2025: आज सोमवारी 'या' 6 राशींवर प्रसन्न होणार भोलेनाथ! मागाल ते मिळेल वरदान, आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 14 July 2025: आजचा सोमवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 14 July 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 14 जुलै 2025, आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण आज काही ग्रहांचे संक्रमण होणार आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज डोळ्याच्या विकारांमध्ये विशेषतः उजव्या डोळ्याला जरा जास्त त्रास होईल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो कौटुंबिक सुखात थोडी कमतरता निर्माण होईल, मनस्ताप होण्याची शक्यता
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज जोडीदाराचे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, महिलांना एकटेपणा जाणवेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज गोंधळ घालणारे आणि निर्णय पटकन न घेणाऱ्या माणसांशी जमणार नाही.
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज कामाच्या वेळी कामच करावे हा दृष्टिकोन तुमचा राहील, त्यामुळे उत्तम नेतृत्वाचा नमुना म्हणून लोक तुमच्याकडे बघतील.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज मनाच्या कल्पना जरा टोकदार होतीलच, परंतु थोडा अहंकारही वाढणार आहे
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज अंतर्मुख होऊन विचार करायला हवा, नाहीतर पोकळ डाम डौलकडे लवकर आकर्षित व्हाल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज व्यवसाय नोकरी स्वतः काम करण्यापेक्षा दुसऱ्याकडून काम करून घेण्याची वृत्ती वाढेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज धरसोड वृत्तीमुळे कोणतेही काम पूर्णत्वाला जाणार नाही, जवळ असलेला पैसा खर्च कराल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो मला अनेक गोष्टींची सुरुवात मोठ्या उत्साहाने करतील, परंतु आपल्या कामांमध्ये इतरांना केलेली ढवळाढवळ तुम्हाला अजिबात चालणार नाही
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज आज तुमच्या मनाची बैठक चांगली ठेवा, अति भावनाप्रधान होऊन कोणतेही निर्णय घेऊ नका
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज जवळच्या लोकांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे, थोड्या अव्यवहारी निर्णयामुळे तोटा जास्त होऊ शकतो.
हेही वाचा :
Weekly Lucky Zodiac Sign: जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात 'बुधादित्य राजयोग' बनतोय, ‘या’ 5 राशींची चांदीच चांदी! तुमची रास कोणती?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















