Horoscope Today 14 August 2025: आजचा गुरूवारचा दिवस 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! दत्तगुरूंच्या कृपेने संकट टळेल, आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 14 August 2025: आजचा गुरूवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 14 August 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 14 ऑगस्ट 2025, आजचा वार गुरूवार आहे. आजचा दिवस हा सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज दीर्घकालीन रेंगाळणाऱ्या व्याधीवर वेळीच इलाज करावा, संधिवात दमा या आजारांवर औषध उपचार करावे लागतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज खूप दिवसांपासून रेंगाळलेले पैसे हातात पडतील, त्यामुळे छानशी खरेदी करावीशी वाटेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज कर्ज फेडण्यासाठी आलेल्या पैशाचा उपयोग कराल, तुमच्या अंगी असलेल्या गुणदोषांचा अंतर्मुख होऊन विचार कराल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज अनेक शंका कुशंकांच्या जाळ्यात अडकल्यामुळे, कामाची गती थोडीशी मंदावेल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज व्यवसायात एखादी नवीन संधी समोर आल्यामुळे, त्याबाबतीत संशोधनात्मक पवित्रा घ्याल .
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज भावनांची थोडीशी ओढाताण झाल्यामुळे मनाला ताण जाणवेल, परंतु हे सोनेरी क्षण वेचायला तुमची बुद्धी सक्षम राहील.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज तुमच्या हजरजबाबी स्वभावामुळे जन मानसात चांगले स्थान मिळेल, संततीकडून थोड्या अपेक्षा भंगाचे दुःख होईल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज महिलांचा लहरीपणा वाढेल, ज्यांच्याकडे एखादी एजन्सी आहे त्यांनी त्या कामांमध्ये लक्ष घालावे.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज पैशाच्या संदर्भातील कामे मार्गी लागतील, त्यासाठी किती कष्ट केले याचा हिशोब करायचा नाही.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज एखाद्या साध्यापर्यंत पोहोचल्यामुळे मानसिक समाधानाचा आनंद घ्याल, मुलांच्या मार्गदर्शनासाठी थोडा वेळ राखून ठेवा.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज घरामध्ये वडीलधाऱ्या व्यक्तींच्या प्रकृती विषयी थोडी चिंता वाटेल, स्पर्धा परीक्षांसाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज स्वतःची हौस मौज पूर्ण कराल, विद्यार्थी आपल्या करिअरचा विचार करतील.
हेही वाचा :
Numerology: गरिबीत जन्म असूनही फरक पडत नाही! 'या' जन्मतारखेचे लोक 35 वयानंतर कोट्याधीशच बनतात, ज्यांचा स्वामी शनिदेव, त्यांना कशाची भीती..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















