एक्स्प्लोर

Horoscope Today 12 September 2024 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा जाणार? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 12 September 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 12 September 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. काही कामांमध्ये आळस देखील दिसून येईल. 

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, दुग्धजन्य पदार्थांचा आणि दैनंदिन गरजा असलेल्या गोष्टींचा व्यवसाय असणाऱ्या व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी आपली पुस्तकं, नोट्स आणि इतर साहित्य अतिशय काळजीपूर्वक जपून ठेवावं, हरवण्याची शक्यता संभवते.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे त्यांनी सावध राहून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमितपणे औषधं घेणं आवश्यक आहे.

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - जोपर्यंत तुम्ही कामाला सुरुवात करत नाही तोपर्यंत कामावर कोणाचा सल्ला घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही. 

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज तुमची एखादी डील फायनल होऊ शकते.

विद्यार्थी (Student) - तुमची इच्छा नसतानाही आज तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंटचा भाग बनू शकणार नाहीत.

आरोग्य (Health) - हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - बँकिंग क्षेत्राशी संबंधित नोकरदार वर्गासाठी दिवस चांगला असेल. नोकरदारांना नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे.

व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसायात नवीन ग्राहक जोडण्यासाठी तुम्ही डिजिटल जाहिरातींची मदत घ्याल. कामात तुमची कार्यक्षमता तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल.

विद्यार्थी (Student) - उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील असलेल्यांना चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे.

आरोग्य (Health) - आज काही कामामुळे तुम्हाला इतका थकवा जाणवेल की तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल.

कर्क रास (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - तुमच्या कामावर तुम्हाला अपेक्षित यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. जर तुम्ही आत्मविश्वासाने काम केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमचं उत्पन्न वाढू शकतं.

व्यवसाय (Business) - जे त्यांचे वडिलोपार्जित व्यवसाय चालवतात त्यांना अधिक फायदा होऊ शकतो.

विद्यार्थी (Student) - तुम्ही तुमची अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता.

आरोग्य (Health) - तुम्हाला तुमच्या तब्येतीत काही चढउतार जाणवू शकतात. किरकोळ समस्यांमुळेही तुम्ही चिंतेत पडू शकता. डॉक्टरांकडून स्वतःवर योग्य उपचार करुन घ्या.

सिंह रास (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आज तुम्हाला काही समस्यांनी घेरलं जाऊ शकतं. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, आज तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामाकडे नीट लक्ष द्या. आज तुमच्या हातून काही चूक घडू शकते.

व्यवसाय (Business) - काम करताना व्यावसायिकांनी त्यांच्या ग्राहकांकडून त्यांच्या सेवेचा फीडबॅक घेणं आवश्यक आहे, फीडबॅकनुसार तुम्ही तुमच्या कामात बदल करू शकता.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल. तरुणांनी आपला वेळ भगवान शंकराच्या पूजेसाठी द्यावा, यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

आरोग्य (Health) - आज तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, टेन्शन फ्री होण्यासाठी मॉर्निंग वॉक, योगा करा, यामुळे तुम्हाला नक्कीच फायदे होतील.

कन्या रास (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - तुम्ही जर सॉफ्टवेअर इंजिनियर असाल तर तुमच्यावर आज कामाचा बोजा खूप असू शकतो, ज्यामुळे तुम्हाला खूप थकवा जाणवेल.

व्यवसाय (Business) - जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर काही गैरसमजामुळे तुमच्या व्यवसायातील भागीदाराशी तुमचं नातं बिघडू शकतं.

विद्यार्थी (Student) - तरुणांना आज विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार होत नाही. तुमच्या सभ्यतेचा आणि तुमच्या चांगल्या वागणुकीचा कोणीही फायदा घेऊ शकतं.

आरोग्य (Health) - झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवेल. डोकेदुखीची समस्या देखील तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करा.

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - काम करणाऱ्या व्यक्तीला इतर दिवसांपेक्षा जास्त काम करावं लागू शकतं, म्हणून स्वतःला अधिक परिश्रमासाठी तयार करा.

व्यवसाय (Business) - जर व्यावसायिकांचं एखादं काम ठप्प झालं असेल तर ते खूप चिंतेत असतील. परंतु थोडे हात-पाय हलवले तर तुमचं काम पुन्हा सुरू होऊ शकतं, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.

विद्यार्थी (Student) - आज एखाद्याला असं कोणतंही वचन देऊ नका, जे तुम्ही पूर्ण करू शकणार नाही, नाहीतर तुमच्या वचनामुळे सगळे तुमच्यावर हसतील.

आरोग्य (Health) - हृदयरोगींना स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. योग्य आहार घ्या आणि औषधं नियमित घ्या.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे निभावाल, कारण काम चुकलं तर तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. 

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांसाठी काळ चांगला आहे, कामात नवीन संधी निर्माण होतील आणि तुमचं नियोजनही यशस्वी होईल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना आपलं करिअर घडवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, तरच ते यश मिळवू शकतात. 

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलचा त्रास असलेल्यांनी त्यांच्या डाएट चार्टमधून चरबीयुक्त पदार्थ काढून टाकावेत

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी धावपळ करण्याऐवजी स्मार्ट वर्कवर लक्ष केंद्रित करा. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला क्षणिक रागाच्या सवयीवर नियंत्रण ठेवावं लागेल.

व्यवसाय (Business) - व्यवसायातील कोणतंही काम पुढे ढकलत राहिल्यास ते भविष्यात तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. कर्मचाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास ते चांगलं काम करतील आणि तुमचा व्यवसाय नफ्यात राहील.

विद्यार्थी (Student) - तुम्ही अभ्यासात जास्त लक्ष दिलं पाहिजे. तुमच्या मनात काही नवीन कल्पना येऊ शकतात, ज्यामुळे तुमचं करिअर अधिक चांगलं होऊ शकतं, नवीन कल्पना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.

आरोग्य (Health) - आज तुम्हाला शारीरिक समस्यांमुळे त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका, अन्यथा तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्ही खूप चिंतेत असाल.

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरीत तुमची प्रलंबित कामं पूर्ण करण्यावर भर द्यावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला काही जबाबदारी मिळू शकते. 

व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसायात यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी आज प्रतिकूल परिस्थितीसाठी स्वतःला तयार केलं पाहिजे, कारण जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार होत नाही. तुमच्या सभ्यतेचा आणि तुमच्या चांगल्या वागणुकीचा कोणीही फायदा घेऊ शकतं.

आरोग्य (Health) - तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. तणावपूर्ण गोष्टींपासून दूर राहा. 

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस ऑफिसमध्ये तुमच्यासाठी अनुकूल असेल, नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. 

व्यवसाय (Business) - आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल. प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा काळ चांगला असेल. 

कौटुंबिक (Family) - जर तुम्ही कुटुंबात मोठे असाल तर कुटुंबातील लहानांना अवैध कामांपासून दूर राहण्याचा सल्ला देणं तुमचं कर्तव्य आहे.

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. आज तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुमचे ज्युनिअर आणि सिनीअर तुम्हाला कामात मदत करतील, आज तुमचं मन कामात गुंतलेलं असेल.

व्यवसाय (Business) - शोभन योग, बुधादित्य योग तयार झाल्यामुळे व्यवसायात लाभ होईल. व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे.

विद्यार्थी (Student) - सीएस आणि आयटीच्या विद्यार्थ्यांनी महत्त्वाची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचं नियोजन करावं.

आरोग्य (Health) - तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Horoscope Today 12 September 2024 : आज 'या' राशींवर असणार दत्तगुरुंची कृपा, अडकलेली कामं लागणार मार्गी; वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 6 मार्चचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनलाभाचे संकेत, वाचा लकी राशी
6 मार्चचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनलाभाचे संकेत, वाचा लकी राशी
Vastu Shashtra: मंडळींनो..तुम्ही पोळ्या मोजून बनवत असाल, तर सावधान! परिणाम जाणून व्हाल थक्क, वास्तुशास्त्र म्हणते...
मंडळींनो..तुम्ही पोळ्या मोजून बनवत असाल, तर सावधान! परिणाम जाणून व्हाल थक्क, वास्तुशास्त्र म्हणते...
March Month Born Zodiac Personality : मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो? वाचा लकी नंबर आणि स्वभाव वैशिष्ट्ये
मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो? वाचा लकी नंबर आणि स्वभाव वैशिष्ट्ये
Weekly Horoscope: मार्चचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ संकेत, 7 राशींची भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य
मार्चचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ संकेत, 7 राशींची भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर 
सोने चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Nitish Kumar: नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
Embed widget