Horoscope Today 09 December 2024 : आठवड्यातील पहिला सोमवार सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 09 December 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 09 December 2024 : पंचांगानुसार, आज 09 डिसेंबर 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
विजेच्या संपर्कात काम करणाऱ्यांना काळजी घेणे आवश्यक राहील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
विवाहासाठी आयुष्याचा जोडीदार निवडता येईल कलाकार लोकांना आपली कला दाखवण्याची संधी मिळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
तुमची मते मुलांच्या गळी उतरवण्यासाठी जरा जास्त शक्ती खर्च करावी लागेल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आज महिला घरातच जास्त रमतील. बोलण्यात कडवटपणा नको.
सिंह रास (Leo Horoscope Today)
गतिशील परंतु स्व केंद्रित असे व्यक्तिमत्व आज राहणार आहे. महिलांनी आपले निर्णय बदलू नयेत.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
संघर्ष आणि प्रतिकाराचा भाग जरा जास्त राहिल्यामुळे तापटपणा वाढेल.
तुळ रास (Libra Horoscope Today)
दुसऱ्याला समजून घेण्यात थोडे कमी पडाल. एखादा निर्णय घेताना प्रचंड धाडस दाखवाल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
दुसऱ्यावर कुरघोडी करण्या अगोदर दहा वेळा विचार करा. स्वतःच्या मताबरोबर इतरांच्याही मताचा विचार करावा लागेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
स्वाभिमान आणि अहंकार यामधील पुसटशी लक्ष्मण रेषा ओळखा.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मानसिक अस्थिरता आणि चंचलतेमुळे कामाची गती मंदावेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
घरामध्ये काही बदल करण्याचा विचार कराल. ईट का जवाब पत्थर से देऊन दुसऱ्यांवर राग धराल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
आज काही गोष्टींचा त्रास होईल त्यासाठी सर्व गोष्टींचा अगोदरच विचार करावा.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: