एक्स्प्लोर

Horoscope Today 06 September 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? कोणाला मिळणार लाभ तर कोणाचा होईल तोटा? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 06 September 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 06 September 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुम्ही ऑफिसमध्ये परिस्थिती पाहून सर्वांशी वागा. उगाच गंभीर परिस्थितीत तुमच्या वागणुकीने तुम्हाला बोलणी खावी लागू शकतात. त्यामुळे जरा सावध व्हा.

व्यवसाय (Business) - जे व्यावसायिक चांदीचा व्यापार करतायत त्यांचा व्यवसाय आज चांगला चालेल. आठवड्याची सुरुवात चांगली आहे. 

विद्यार्थी (Student) - जे विद्यार्थी परीक्षेचा मनापासून अभ्यास करतायत त्यांच्या आयुष्यात लवकरच मोठा बदल दिसून येणार आहे. तुमची आवड जपत राहा. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला अॅसिडीटी त्रास होऊ शकतो. वातावरणातील बदलामुळे पोट देखील बिघडू शकतं. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)  

नोकरी (Job) - आज तुम्हाला शासनाच्या एका प्रोजेक्टच्या संदर्भात विचारणा केली जाऊ शकते. तुम्ही सर्व काम नीट समजून प्रामाणिकपणे करा. 

व्यवसाय (Business) - व्यापाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांबरोबरचं वर्तन चांगलं ठेवावं. उगाच अरेरावीची  भाषा करू नये. 

तरूण (Youth) - तुमच्या आयुष्यात आता जे काही घडतंय त्याचा दोष इतरांना देऊ नका. अशा वेळी संयम बाळगा. हेही दिवस निघून जातील हा विश्वास मनात ठेवा.  

आरोग्य (Health) - आज तुम्हाला जास्त उन्हाचा त्रास सहन करावा लागू शकतो. काही कारणास्तव तुम्हाला आज बाहेरचं काम करावं लागेल. अशा वेळी आरोग्याची योग्य काळजी घ्या. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुम्ही वेळेचा सदुपयोग कराल. सर्व कामे जबाबदारीने पार पाडाल. त्यामुळे बॉसही तुमच्यावर खुश असतील.   

व्यवसाय (Business) - हार्डवेयरचा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस येतील. 

युवक (Youth) - आज तुमचे तुमच्या भावा-बहिणीबरोबर काही शाब्दिक वाद होऊ शकतात. अशा वेळी वाणीवय नियंत्रण ठेवा. 

आरोग्य (Health) - ज्यांना फीट्स येण्याचा त्रास आहे त्यांनी जास्त काळजी घ्यावी. हा त्रास पुन्हा येण्याची शक्यता आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस चांगला जाईल. फक्त आपल्या कामाशी काम ठेवा. इतरांच्या भानगडीत पडू नका. 

व्यापार (Business) - व्यवसायात तुमची प्रगती चांगली असेल. अनेकजण तुमच्या व्यवसायाने प्रभावित होतील. त्यामुळे तुम्हाला अधिक उत्साहित वाटेल. 

तरूण (Youth) - आजचा दिवस तुमचा कुटुंबियांबरोबर आनंदात जाईल. धार्मिक स्थळाला भेट ज्या. मानसिक शांती लाभेल.

आरोग्य (Health) - आज तुमचे आरोग्य चांगले असेल. फक्त अॅसिडीटीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा.

सिंह रास (Leo Horoscope Today)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी जास्त भावनिक होऊ नका. सर्व निर्णय प्रॅक्टिकल होऊनच घ्या. आयुष्यात पुढे जाल.

व्यापार (Business) - आज तुमच्या व्यवसायातील लोकांशी सामंजस्याने वागा. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवलं तरच योग्य व्यवसाय होईल.

तरूण (Youth) - स्पर्धा परीक्षेला बसलेले तरूण आज मनापासून अभ्यास करतील. आपलं ध्येय लक्षात ठेवून अभ्यास केला तर स्वप्न लवकर साकार होईल. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला लो बीपीच्या कारणाने अशक्तपणा जाणवू शकतो. जास्त कामाचा ताण घेऊ नका. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीत तुमच्या सहकाऱ्यांचा सपोर्ट घ्यायला कोणताच संकोच करू नका. तुम्हाला याचा फायदाच होईल. 

व्यापार (Business) - आज व्यापाराशी संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. घाईगडबडीत निर्णय घेतल्यास तुम्हाला नुकसान भोगावं लागू शकतं. 

तरूण (Youth) - आज तुमचा स्वभाव फारच मूडी असेल. एका क्षणात आनंदी तर दुसऱ्या क्षणाला दु:खी असाल. 

आरोग्य (Health) - तुमचे आरोग्य चांगले राहील. कोणत्याच प्रकारचा ताण स्वत:वर ओढून घेऊ नका. 

तूळ रास (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - जे लोक कामाच्या ठिकाणी प्रेझेंटेशन देणार आहेत त्यांनी बॉसचे मार्गदर्शन घ्यावं. काम करणाऱ्या व्यक्तीने डेटा सुरक्षिततेवर देखील लक्ष दिलं पाहिजे, कारण डेटा चोरी होण्याची शक्यता असते.

व्यवसाय (Business) - वैद्यकीय, फार्मसी आणि सर्जिकल व्यवसायाशी संबंधित लोकांना वस्तूंचा पुरवठा करणं किंवा पैसे घेणं यासारख्या कामांसाठी दुसऱ्या शहरात जावं लागू शकतं.

विद्यार्थी (Student) - नवीन पिढीला आपल्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल.तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करून तुमच्या अपेक्षा पूर्ण कराल.

आरोग्य (Health) - मानसिक आजारी रुग्णांनी डॉक्टरांच्या संपर्कात राहून त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं.

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे तुमचं करिअर पुढे जाण्यास मदत होईल. कंपनीचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी कामसू व्यक्तीची निवड केली जाऊ शकते, अशा परिस्थितीत तुमचं काम चांगलं ठेवा.

व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसायातील भागीदारासोबत काही वाद चालू असतील तर ते मिटलेले दिसते, तुम्ही व्यवसाय हाताळण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा एकत्र येऊ शकता.

विद्यार्थी (Student) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. नवीन पिढी करिअरची काळजी करेल. आवडीचे काम करण्यासाठी वेळ मिळेल. खूप दिवसांनी तुम्हाला जुने मित्र आणि नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल.

आरोग्य (Health) - किरकोळ आजार देखील गांभीर्याने घ्या आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. निष्काळजीपणामुळे हा आजार मोठा व्हायला वेळ लागणार नाही.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - नवीन करिअर सुरू करणाऱ्या लोकांनी कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली काम करावं आणि इतरांकडून मिळालेल्या धड्यांचं पालन करावं.

व्यवसाय (Business) - औद्योगिक व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी हिशेबाच्या बाबतीत थोडे गोंधळलेले दिसू शकतात.

विद्यार्थी (Student) - नवीन पिढीने जाणकार लोकांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करा, चांगल्या सल्लागारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती रागावली असेल तर त्याला शांत करण्यासाठी दिवस चांगला आहे.

आरोग्य (Health) - आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस सामान्य आहे. तुम्हाला सध्याच्या आजारांपासून लवकरच आराम मिळेल.

मकर रास (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवलं जाईल. कामात चपळता दाखवा. 

व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसायाशी संबंधित विरोधक आज तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊ शकतात. यासाठी कामाच्या ठिकाणी थोडी सतर्कता दाखवा. 

युवक (Youth) - जर काही कारणास्तव तुमच्या अभ्यासात ब्रेक लागला असेल तर तुम्ही अभ्यास पुन्हा सुरु करू शकता. 

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका. अन्यथा दिर्घकालीन आजार पुन्हा उद्भवू शकतो. 

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमच्या पगारातील काही हिस्सा भौतिक वस्तूंमध्ये खर्च करण्यात जाईल. पण, त्यातही तुम्हाला आनंद मिळेल. 

व्यापार (Business) - जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु करणार असाल तर तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. ही वेळ योग्य आहे. 

लव्ह लाईफ (Relationship) - आज तुमचे तुमच्या पार्टनरबरोबर काही कारणास्तव खटके उडू शकतात. सामंजस्याने निर्णय घ्या. 

आरोग्य (Health) - महिला चेहऱ्याशी संबंधित समस्याने त्रस्त असू शकतात. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. 

मीन रास (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - ग्रहांची स्थिती पाहिल्यास तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. 

व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाने आपल्या सर्व ग्राहकांना एकाच मापात मापणे बंद करावे. सर्व ग्राहकांना समान वागणूक द्या. ग्राहकांना छोटं समजण्याची चूक करू नका. 

युवक (Youth) - आज तुम्हाला नियमांचं पालन करावं लागेल. मग ते शाळेच्या संदर्भात असो, महाविद्यालय किंवा अगदी घरी. कडक शिस्त पाळा. 

आरोग्य (Health) - आज कोणतीही जड वस्तू उचलताना काळजी घ्या. वातावरणातील बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणा होऊ शकतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 06 September 2024 : आज हरितालिकेचा दिवस सर्व 12 राशींच्या लोकांसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
India Vs Australia : राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Athawale : आरोपीवर कठोर कारवाई व्हावी - रामदास आठवलेParbhani Protest : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जParbhani Protest : परभणी जिल्हा बंदला हिंसक वळण; आंदोलकांनी पेटवले पाईपRahul Patil on Parbhani Protest :  परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
India Vs Australia : राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
Parbhani Band : 'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..'  परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..' परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
परभणीत आंदोलन पेटलं, हिंसक वळण; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
परभणीत आंदोलन पेटलं, हिंसक वळण; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
Embed widget