(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 04 October 2024 : आज नवरात्रीची दुसरी माळ, सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा जाईल? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 04 October 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 04 October 2024 : शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. आज नवरात्रीची दुसरी माळ आहे. आजच्या दिवशी देवी ब्रह्मचारीणीची पूजा केली जाते.हा दिवस अनेक राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. तसेच, आजच्या दिवसाचे काही राशींना चांगले तर काही राशींना वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Today Horoscope)
आज तुम्हाला सुट्टी नसेल तर ऑफिसमध्ये कोणाशी तरी वाद होऊ शकतो. पण तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर या वादातून बाहेर पडू शकता.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांसाठी आजचा काळ चांगला असेल. आज तुम्हाला व्यवसायात नफा मिळू शकतो.
विद्यार्थी (Student) - आज तुम्हाला एकटं वाटू शकतं, तुम्हाला एकटेपणा जाणवू नये म्हणून आज तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आरोग्य (Health) - आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, तुम्हाला काही गंभीर आजारांमुळे खूप त्रास सहन करावा लागू शकतो, त्यामुळे तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये संतुलन ठेवा.
वृषभ रास(Taurus Today Horoscope)
नोकरी (Job) - तुमच्या नोकरीत यश मिळवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत केली पाहिजे, तरच तुम्हाला यश मिळेल आणि तुमचा पगारही वाढू शकेल.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी नियमांचं पालन करुन काम करावं, सर्व कायदे लक्षात घेऊन व्यवसाय वाढवावा.
विद्यार्थी (Student) - तरुणांना सोशल मीडियावर त्यांचे जुने मित्र भेटू शकतात, अचानक हे मित्र तुमच्या नजरेत आल्याने तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्ही त्यांच्याशी बोलाल.
आरोग्य (Health) - तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा एक छोटीशी चूक देखील तुम्हाला महागात पडू शकते. तुम्हाला कानाशी संबंधित समस्या जाणवू शकतात.
मिथुन रास (Gemini Today Horoscope)
नोकरी (Job) - जे लोक महत्त्वाचा डेटा हाताळतात त्यांना आज काळजी घ्यावी लागेल, तुम्हाला तुमचा सर्व डेटा सुरक्षितपणे ठेवावा लागेल.
व्यवसाय (Business) - जर व्यावसायिकांचं एखादं काम ठप्प झालं असेल तर ते खूप चिंतेत असतील.
विद्यार्थी (Student) - तरुणांनी आज गरजूंच्या मदतीसाठी पुढे आलं पाहिजे, तुम्हाला त्यांचे खूप आशीर्वाद लाभतील.
आरोग्य (Health) - तुम्ही रात्री उशिरा जेऊ नये, अन्यथा तुमचं पोट खराब होऊ शकतं आणि तुमचा त्रास आणखी वाढू शकतो.
कर्क रास (Cancer Today Horoscope)
नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी मरगळ किंवा कंटाळा आणून चालणार नाही. कामात उत्साह आणि एकाग्रता ठेवा. तरच तुम्हाला नोकरीत यशाची संधी मिळेल.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी कामाच्या ठिकाणी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. पैशांचा व्यवहार करताना फायदे-तोटेही लक्षात ठेवा. जेणेकरून भविष्यात तुम्हाला या गोष्टीची कल्पना असणं आवश्यक आहे.
तरूण (Youth) - युवकांंच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, खचून जाऊ नका. आव्हानांना सामोरं जा. देव तुमची परीक्षा पाहतोय. या परीक्षेला धैर्याने सामोरं जा. यश तुमचंच आहे.
आरोग्य (Health) - तुम्हाला किडनीच्या संबंधित त्रास होऊ शकतो. अशा वेळी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.
सिंह रास (Leo Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मनासारखं काम झाल्यामुळे उत्साह जाणवेल.
व्यवसाय (Business) - तुमच्या कामात प्रगती तर आहे. पण, तुम्ही अजूनही समाधानी नाही आहात. तुम्हाला अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल. व्यवसायाशी संबंधित तुम्हाला प्रवास देखील करावा लागू शकतो.
तरूण (Youth) - जे तरूण सैन्यात भरती होऊ इच्छितात त्यांना शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्याचीही काळजी घेणं गरजेचंच आहे.
आरोग्य (Health) - जर तुमच्या एखाद्या आजारासंदर्भात गोळ्या सुरु असतील तर त्या वेळेत घेण्याचा प्रयत्न करा. अन्यथा, तुमच्या तब्येतीवर येऊ शकतं.
कन्या रास (Virgo Today Horoscope)
नोकरी (Job) - एखाद्या प्रोजेक्टवर काम करताना सहकाऱ्यांच्या गैरहजेरी, कामात लक्ष न देणं, योग्य पाठिंबा न मिळाल्याने मन नाराज होऊ शकतं. मनाची समजूत घाला.
व्यवसाय (Busiess) - व्यावसायिकांसाठी आजचा दिवस तसा पाहता चांगला आहे. पण कोणतीही डील फिक्स झाल्याशिवाय निर्णय घेऊ नका.
विद्यार्थी (Student) - तरूणांसाठी परदेशी जाण्याची उत्त्म संधी आहे. अनेक दिवसांपासून पाहात आलेलं स्वप्न लवकरच साकार होण्याची चिन्हं आहेत.
आरोग्य (Health) - ज्या लोकांची नुकतीच सर्जरी झाली आहे. अशा व्यक्तींनी आपल्या आरोग्याबाबत अधिक निष्काळजीपणा करू नये.
तूळ रास (Libra Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरदार लोकांची आज वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये बदली होऊ शकते, जिथे तुम्हाला आधीपेक्षा जास्त पगार मिळेल. ही बदली तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
व्यवसाय (Business) - जर व्यावसायिकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना सर्व योजना बनवावी लागेल. सर्व प्लॅनिंग केल्यानंतरच तुम्हाला पुढे पाऊल टाकावं लागेल.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. तुम्ही चांगला अभ्यास केला तर परीक्षेत तुम्हाला चांगले गुण मिळतील. आज तुम्हाला तुमच्या करिअरची काळजी वाटू शकते.
आरोग्य (Health) - तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यायला हवी. जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुम्ही हातातलं काम सोडून आधी विश्रांती घ्यावी आणि मगच कोणतंही काम करावं. तुम्ही आज डोळ्यांची विशेष काळजी घ्या.
वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)
नोकरी (Job) - आज अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करायला मिळेल, तुम्ही कामात अत्यंत चांगली कामगिरी बजावाल, ज्यामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील.
व्यवसाय (Business) - उत्पादनांची आयात-निर्यात करणाऱ्या व्यावसायिकांना नफा मिळण्याची दाट शक्यता आहे, मनाप्रमाणे नफा मिळाल्याने तुमचं मन आनंदी राहील.
विद्यार्थी (Student) - आज तुम्ही चांगला अभ्यास केला पाहिजे, तरच तुम्ही करिअरमध्ये प्रगती करू शकता.
आरोग्य (Health) - आज तुम्हाला तुमच्या कानाचं दुखणं खूप त्रास देऊ शकतं, म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आवश्यक औषधं घ्यावीत.
धनु रास (Sagittarius Today Horoscope)
नोकरी (Job) - तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेली मेहनत तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकते. तुमचा बॉस तुमच्या कामाची खूप प्रशंसा करेल.
व्यवसाय (Business) - आज व्यावसायिकांनी खूप मेहनत घ्यावी. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचे प्रयत्न करावे, यामुळे भविष्यात तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
विद्यार्थी (Student) - त्यांनी गणित आणि विज्ञान यासारख्या कठीण विषयांकडे खूप लक्ष दिलं पाहिजे.काही अडचण आल्यास शाळेतील शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या, तरच तुम्हाला तुमच्या वर्गात चांगले गुण मिळू शकतात.
आरोग्य (Health) - थंडीमुळे तुमची पाणी पिण्याची मात्री कमी होईल. तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नका, जास्त पाणी प्या आणि शरीरातील द्रव टिकवून ठेवा.
मकर रास (Aquarius Horoscope Today)
नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांना इग्नोर करण्याचा प्रयत्न करा. आणि तुमचा हेतू साध्य करा.
व्यापार (Business) - तुम्हाला तुमच्या व्यवसायामुळे नवीन ओळख मिळेल. नातेवाईकांबरोबरच आजूबाजूच्या लोकांकडून तुम्हाला मान-सन्मान मिळेल. आजूबाजूच्या लोकांकडून तुम्हाला मान-सन्मान मिळेल.
तरूण (Youth) - आज अचानक तुम्ही भूतकाळात हरवून जाल. त्यामुळे तुम्ही थोडे भावूक व्हाल.
आरोग्य (Health) - तुम्हाला आज बदलत्या वातावरणाचा त्रास होऊ शकतो. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
कुंभ रास (Pisces Horoscope Today)
नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी भावनिक राहून चालणार नाही तर प्रॅक्टिकल होऊन निर्णय घ्या.
व्यापार (Business) - तुमचे विरोधक तुमचं मन वळविण्याचा प्रयत्न करतील. पण त्याला न जुमानता तुमचं ध्येय लक्षात ठेवा.
तरूण (Youth) - तरूणांना उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी चांगली संधी आहे. वेळेचा सदुपयोग करा.
आरोग्य (Health) - आज तुमचं कोणतं काम झालं नाही तर तुम्हाला प्रचंड राग येईल. त्यामुळे तुम्हाला शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
मीन रास (Pisces Horoscope Today)
नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी काही आव्हानात्मक निर्णय तुम्हाला घ्यावे लागू शकतात. ज्याचा तुम्हाला नंतर अभिमानच वाटेल.
व्यापार (Business) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही खुश राहू शकता.
तरूण (Youth) - आज कुटुंबाकडे ओढा तुमचा जास्त असेल. त्यामुळे घरच्यांशी संबंध अधिक चांगले होतील.
आरोग्य (Health) - आज तुमची तब्येत एकदम ठणठणीत असणार आहे. कोणत्याही प्रकारचा ताण वाया जाऊ देऊ नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :