एक्स्प्लोर

Horoscope Today 03 October 2024 : आज नवरात्रीची पहिली माळ, आजचा दिवस सर्व राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 03 October 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 03 October 2024 : आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. आज देवीच्या घटस्थापनेचा दिवस आहे. हा दिवस अनेक राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे.  तसेच, आजच्या दिवसाचे काही राशींना चांगले तर काही राशींना वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

नोकरी (Job) - आज तुम्ही कामाच्या ठिकाणी पूर्णपणे सक्रिय होऊन काम कराल. तुमच्या कामाप्रती असलेल्या उत्साहाला पाहून तुमचा बॉस तुमच्यावर खुश होईल.

व्यापार (Business) - आज तुमच्या कामाचा तुम्ही जास्त प्रचार करायला हवा. तरच, तुमचा व्यवसाय जोमाने पुढे नेता येईल. 

तरूण (Youth) - जे तरूण युवक आहेत ते आपलं कार्य पुढे नेण्यासाठी सक्षम असतील. तरच, तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती करू शकता. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या शरीरात लोहाची कमतरता भासू शकते. यासाठी हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करा.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

नोकरी (Job) - आजच्या दिवशी असं कोणतंच काम करू नका ज्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. 

व्यापार (Business) - आज तुमची रखडलेली जी काही कामं असतील तर ती वेळीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

तरूण (Youth) - आज तुमचे भरपूर पैसे खर्च होऊ शकतात. तुमच्या पार्टनरवर तुम्ही जास्त पैसे खर्च करू शकता. यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवा. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला एसिडीटीचा त्रास होऊ शकतो. यासाठी बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाऊ नका. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

नोकरी (Job) - आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी फार आळस आणि थकवा येऊ शकतो. यामुळे तुमची कामं कदाचित पूर्ण होणार नाहीत. 

व्यापार (Business) - आज व्यापाराच्या ठिकाणी कोणाबरोबरच उधारीचा व्यवहार करू नका. तुमचे पैसे काढून घेण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल.

तरूण (Youth) - आज भावा-बहिणीबरोबर तुमचे चांगले सलोख्याचे संबंध राहतील. यावेळी चुकूनही चिडचिड करू नका.

आरोग्य (Health) - आज तुम्ही डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असू शकता. सर्दी, खोकला, ताप येण्याची शक्यता आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त कामाचा ताण जाणवेल. त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवेल. 

व्यापार (Business) - व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. फक्त तुम्हाला जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. 

तरूण (Youth) - शिक्षणासाठी तुम्हाला बाहेर अभ्यासासाठी जावं लागू शकतं. पण, एडमिशनसाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल.

आरोग्य (Health) - तुमचे आरोग्य एकदम सामान्य असणार आहे. कोणत्याच प्रकारे तुम्हाला शारीरिक कष्ट करावे लागणार नाही. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस सर्वसामान्य असणार आहे. तुमची कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल.

व्यापार (Business) - तुमच्या व्यवसायात कोणताच नवीन बदल करू नका. तुमच्यासाठी ते चांगलं असेल. 

तरूण (Youth) - तुमचं मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारे प्रयत्न करू पाहाल. पण मन सतत चलबिचल राहील. 

आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं असेल फक्त बाहेरच्या पदार्थांचं सेवन करू नका. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

नोकरी (Job) - तुम्हाला नोकरीत प्रमोशन हवं असल्यास तुमच्या बॉसशी संवाद साधा. तसेज, कामात जास्त मेहनत घ्या. 

व्यापार (Business) - जर तुमच्या कामासंबंधित तुम्ही कोणत्या नवीन योजना आखत असाल तर तुम्ही त्यात यशस्वी व्हाल. 

तरूण (Youth) - तरूणांनी आज आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवलं तर बरं होईल. तसेच, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदरा करा. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबाबत तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे. कोणत्याच प्रकारचा निष्काजीपणा करू नका. 

तूळ रास (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - कंपनीच्या मालकाने सर्व कर्मचाऱ्यांकडे समान आदराने पाहिलं पाहिजे, तरच तुमचे कर्मचारी देखील तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील.

व्यवसाय (Business) - आज व्यवसाय वाढवण्यासाठी व्यावसायिकांना पैशांची गरज भासू शकते. तुमची गरज लक्षात घेऊन तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता.

विद्यार्थी (Student) - आज आपल्या भावंडांसोबत कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये, अन्यथा परिस्थिती आणखी बिघडू शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि कोणाशीही कठोरपणे बोलू नका. 

आरोग्य (Health) - अगदी थोडीशी समस्या असल्यास, डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही डॉक्टरांच्या संपर्कात राहावं, तुम्हाला कधीही किंवा केव्हाही त्यांच्या सल्लामसलतीची आवश्यकता भासू शकते.  

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope) 

नोकरी (Job) - आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. तुम्ही तुमच्या कामावर नेहमी सत्याचं समर्थन करा.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्ती किंवा तज्ञाचा सल्ला घ्यावा, तरच त्यांना व्यवसायात नफा मिळू शकेल.

विद्यार्थी (Student) - आज तरुण खूप उत्साहाने आणि आनंदाने जगतील. आज तुमचे कामही तितक्याच सहजतेने होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून पैसे घेतले असतील तर ते लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करा.

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही.

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून काम केल्यास तुमचं काम लवकर पूर्ण होऊ शकतं.

व्यवसाय (Business) - सोने-चांदीचा व्यवसाय करणारे लोक त्यांच्या आर्थिक ताकदीने कामात यश मिळवून खूप आनंदी राहतील.

विद्यार्थी (Student) - तुम्ही आज सहलीला जाऊ शकतात, परंतु तुम्ही प्रवासादरम्यान थोडी काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला तुमच्या सामानाचे संरक्षण स्वतः करावं लागेल, अन्यथा तुमचं सामान चोरीला जाऊ शकतं.

आरोग्य (Health) - तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्ही जास्त वेळ उभं राहून काम करू नये. तुमच्या पाय आणि कंबरेला सूज येऊ शकते, ज्यामुळे तुम्ही खूप काळजीत पडू शकता.

मकर रास (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी समाधानी असाल, तुमचे अधिकारीही तुमच्या बोलण्याचं कौतुक करतील, परंतु तुमचे विरोधक तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे तुम्ही थोडं सावध राहावं.

व्यवसाय (Business) - आज व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा तुमचा व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही लांबच्या प्रवासाला जाऊ शकता, जिथे तुमच्या मनाला खूप समाधान मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होऊ शकतो.

आरोग्य (Health) - तुम्ही खूप दिवसांपासून आजारी असाल तर आजपासून तुमच्या तब्येतीला आराम मिळू शकतो.

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमच्या ऑफिसमध्ये ज्या समस्या काही दिवसांपासून सुरू होत्या, त्या आता संपू शकतात, तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील.

व्यवसाय (Business) - आज तुम्ही तुमच्या व्यवसायात खूप प्रगती करू शकता, तुमचा व्यवसाय चांगला चालेल, तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो, यामुळे तुमचं मन देखील खूप आनंदी असेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी आज भविष्याचा विचार करावा. पुढे काय करायचं याचा विचार करावा.

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य चांगलं राहील, तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घ्या आणि तळलेले पदार्थ टाळा, तरच तुम्ही निरोगी राहू शकता.

मीन रास (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप सन्मान मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल, तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील.

व्यवसाय (Business) - तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही तुमच्या बिझनेस पार्टनरची मदत घेऊ शकता, तो तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल, ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी व्हाल.

विद्यार्थी (Student) - करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी खूप मेहनत घेतली तरच तुम्ही यश मिळवू शकतात.

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्यही चांगलं राहील, कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही, परंतु तुम्ही तुमच्या डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 03 October 2024 : आज घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर 'या' 5 राशींवर असेल देवीची कृपा; मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Lanke : हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
Gold Rate Today  : सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
Ranji Trophy 2024-25 Live Streaming : रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
Beed Bank Scam: बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटवर एमपीआयडीची कारवाई; ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊल
बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटवर एमपीआयडीची कारवाई; ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dream Mall Dead Body : मुंबईतील मॉलमध्ये धक्कादायक घटना,पाण्यात तरंगताना दिसला मृतदेहHasan Mushrif : आम्ही दादांच्या कानावर सगळं घातलं, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले...?MNS Mumbai Action : बाऊंसर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेनं तासाभरात माज उतरवलाDonald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Lanke : हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
Gold Rate Today  : सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
Ranji Trophy 2024-25 Live Streaming : रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
Beed Bank Scam: बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटवर एमपीआयडीची कारवाई; ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊल
बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटवर एमपीआयडीची कारवाई; ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊल
Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
Kulhad Pizza Couple : MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
Dharashiv Crime : रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
Embed widget