Horoscope Today 02 October 2024 : तूळ राशीने भांडणं टाळा; वृश्चिक, धनु राशीला उद्भवणार आरोग्य समस्या, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 02 October 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीचा आजचा दिवस कसा जाईल? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...
Horoscope Today 02 October 2024: आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...
तूळ (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र असणार आहे. काही वाद असेल तर त्यापासून दूर राहा. तुमच्या कामात काही नुकसान होऊ शकतं. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून आराम मिळेल. तुमच्या मनात काही गुंतागुंत निर्माण होईल, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. तुमच्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा, काहीही चुकीचं खाऊ नका. तुमच्या घरी पूजा आयोजित केली जाऊ शकते.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने कमकुवत असणार आहे. तुम्हाला जास्त टेन्शन येईल. तुमच्या जोडीदारासोबत काही मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला थोडं लक्ष द्यावं लागेल. तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन करून पुढे जा. तुमच्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. मुलाला काही पुरस्कार मिळू शकतो.
धनु (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनी थोडं डोक्याने काम करावं, व्यवसायात कोणाशीही भागीदारी करू नका, कारण तो तुमची फसवणूक करू शकतो. तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. तुमच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यांवरून मतभेद होतील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याने तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे विचारपूर्वक गुंतवणूक करा. तुमचा कोणताही जुना व्यवहार तुम्हाला त्रास देऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :