Hindu Religion: लग्नानंतर गृहप्रवेश करताना नवरी तांदळाने भरलेले माप का ओलांडते? विधीमागील कारण जाणून घ्या
Hindu Religion: लग्नानंतर नवीन सुनेच्या गृहप्रवेशाच्या वेळी तांदळाने भरलेले माप का ओलांडते? या एका खास विधीबद्दल बोलणार आहोत.
Hindu Religion: एखाद्या तरुणीसाठी लग्न झाल्यानंतर तिचे विश्वच बदलून जाते असे म्हणतात. नवं घर, नवी नाती गोती, सारं काही नवं नवं..लग्नानंतर घरात येणाऱ्या नव्या नवरीला देवी लक्ष्मीचे स्वरुप मानले जाते. लग्नानंतर अशा अनेक विधी असतात, ज्या तिला कराव्या लागतात. हिंदू धर्मामध्ये विवाह हा 16 विधींपैकी एक आहे, जो अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो. या काळात लग्नाआधी आणि नंतर काही खास विधी केले जातात. या सर्व विधींमागे काहीतरी कारण आणि महत्त्व दडलेले आहे. आज आपण लग्नानंतर नवीन सुनेच्या गृहप्रवेशाच्या वेळी तांदळाने भरलेले माप का ओलांडले जाते? या एका खास विधीबद्दल बोलणार आहोत.
नवीन सुनेचा गृहप्रवेश सोहळा का खास असतो?
जेव्हा एखादी मुलगी लग्न करून दुसऱ्या घरी येते, तेव्हा तिचे गृहप्रवेशाचे विधी केले जाते. हा विधी खूप शुभ मानला जातो आणि असे म्हटले जाते की घराच्या गृहप्रवेशासह कुटुंबात नवीन सदस्य सामील होतो. गृहप्रवेश सोहळ्या दरम्यान एक विशेष विधी केला जातो. भारतीय संस्कृतीत नववधू लग्नानंतर पहिल्यांदाच सासरच्या घरी प्रवेश करते तेव्हा तिच्या स्वागतासाठी एक विशेष विधी असतो. या विधीमध्ये वधू उजव्या पायाने दाराजवळ ठेवलेले तांदळाने भरलेले माप ओलांडते. पण हा विधी का केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का?
तांदळाने भरलेले माप ओलांडण्याच्या परंपरेचे महत्त्व काय?
सामान्यतः अन्नाला पायाने स्पर्श करणे अशुभ मानले जाते, परंतु घरातील गृहप्रवेशाच्या वेळी हा विधी पूर्ण विधीपूर्वक केला जातो. या वेळी, तांदळाने भरलेले माप घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवला जाते आणि नंतर नवरी आपल्या उजव्या पायाने तांदळाने भरलेल्या मापाला पायाने धक्का देऊन पाडते
असे म्हणतात की, या काळात कलशातील तांदूळ घरामध्ये विखुरले की घरात सुख, समृद्धी आणि समृद्धी येते. हिंदू धर्मात महिलांना देवीचा दर्जा देण्यात आला असून, सुनेच्या शुभ पावलामुळे घरात सदैव समृद्धी राहते, असे मानले जाते.
हेही वाचा>>>
Garud Puran: महिलांना मासिक पाळी म्हणजे पापांचे भोग? गरुड पुराणात याबद्दल काय म्हटलंय? जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )