Hindu Religion: महिलांनी हनुमान चालिसाचे पठण करावे की नाही? 99% महिला करतात 'या' चुका, अनेकांना माहित नाहीत 'या' खास गोष्टी
Lord Hanuman: हिंदू धर्मात भगवान हनुमानाचे विशेष स्थान आहे. विशेषत: महिलांनी हनुमानाची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घ्या..
Lord Hanuman: हिंदू धर्मात भगवान हनुमानाचे विशेष स्थान आहे. हनुमानजींना बाल ब्रह्मचारी म्हटले जाते, याचा अर्थ त्यांनी आपले जीवन पूर्णपणे ब्रह्मचर्यामध्ये व्यतीत केले. त्यांच्या पूजेसाठी वेगवेगळे नियम पाळले जातात. विशेषत: महिलांनी हनुमानाची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. काही धार्मिक मान्यतांनुसार, महिला हनुमानजीच्या पूजेमध्ये काही मर्यादा पाळल्या जातात. असे म्हटले जाते की, हनुमानजींचे ब्रह्मचर्य इतके पवित्र होते की स्त्रिया त्यांना स्पर्श करू शकत नाहीत. या श्रद्धेमागे कोणताही ठोस पुरावा नसला, तरी हा विश्वास बहुतेक परंपरांवर आधारित आहे. जाणून घेऊया हनुमानजींच्या पूजेदरम्यान महिलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
महिलांना हनुमानाचे व्रत करता येत नाही?
धार्मिक मान्यतांनुसार, महिलांना हनुमानजीचे व्रत पाळण्यास मनाई आहे, विशेषत: जर एखाद्या स्त्रीने हनुमानजीचे 9 दिवस उपवास केले आणि त्यादरम्यान तिला मासिक पाळी आली तर हे व्रत मोडते. धर्मग्रंथानुसार, उपवास करताना पावित्र्य राखणे आवश्यक आहे आणि पीरियड्स दरम्यान ते राखणे कठीण होऊ शकते. त्यामुळे महिलांना हनुमानजीचे व्रत करण्यास मनाई आहे.
मासिक पाळी दरम्यान हनुमान चालीसा वाचता येत नाही?
धार्मिक मान्यतांनुसार, मासिक पाळी दरम्यान महिलांना हनुमान चालिसाचा पाठ करण्यास मनाई आहे. असे म्हणतात की या काळात हनुमानजींचे स्मरण केल्याने त्यांचा राग येऊ शकतो. जरी, यामागे कोणतेही स्पष्ट धार्मिक पुरावे नाहीत, परंतु ही परंपरा अनेक लोक पाळतात.
हनुमानजीसमोर महिलांनी डोकं टेकवू नये?
धार्मिक मान्यतांनुसार, हनुमानजीसमोर स्त्रिया डोके टेकवू शकत नाहीत अशी आणखी एक समजूत आहे. हनुमानजी माता सीतेला आपली माता मानत होते, म्हणून ते प्रत्येक स्त्रीला आपली आई मानतात. त्यामुळे महिलांनी कधीही हनुमानजीसमोर डोके टेकवू नये.
हनुमानजींना महिलांनी आंघोळ घालू नये? आणि त्यांना कपडे घालू नये?
पारंपारिक मान्यतेनुसार महिलांनी हनुमानजींच्या मूर्तीला पाणी अर्पण करू नये किंवा त्यांना वस्त्रही देऊ नये. असे करणे हनुमानजींच्या ब्रह्मचर्याचा अपमान मानले जाते. मात्र, महिला हनुमान वगळता सर्व देवी-देवतांना जल अर्पण करू शकतात.
हेही वाचा>>>
Garud Puran: 'महिलांवर वाईट नजर टाकाल तर याद राखा...तुमचाही हिशोब होतोय!' महिलांवरील विविध अत्याचारासाठी गरुडपुराणात 'या' भयानक शिक्षा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )