Hartalika 2022: हरतालिकेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान करा, महादेव-माता पार्वतीच्या आशीर्वादाचा होईल वर्षाव
Hartalika 2022: हरतालिका साजरी करण्यामागे अशी अख्यायिका आहे की, भगवान शंकरासाठी देवी पार्वतीने सर्वात आधी हरतालिकेचं व्रत केलं होतं.
Hartalika 2022: हरतालिका व्रत आज 30 ऑगस्ट 2022 रोजी आहे. देशातील अनेक भागांत आज हरतालिका साजरी करण्यात येते. हरतालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करतात. यादिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते.हरतालिका तृतीया दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरी केली जाते. महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा व्रत करतात. यादिवशी महिला दिवसभर काहीच खात नाहीत. त्यामुळे हरतालिकेचा उपवास सर्वात कठिण उपवासांपैकी एक मानला जातो. महिलांनी या दिवशी 5 वस्तूंचे दान करावे. असे म्हणतात की यामुळे भाग्यवान होण्याचे वरदान मिळते.
पूजेचा मुहूर्त
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 29 ऑगस्ट 2022 ला दुपारी 03:20 ते 30 ऑगस्ट 2022 ला दुपारी 03:33 पर्यंत असेल. 30 ऑगस्टला सकाळी 06:05 ते 08:38 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल.
देवी पार्वतीने केलं होतं कठीण व्रत
हरतालिका साजरी करण्यामागे अशी अख्यायिका आहे की, भगवान शंकरासाठी देवी पार्वतीने सर्वात आधी हरतालिकेचं व्रत केलं होतं. एक हरत आणि दुसरं आलिका. यामध्ये हरत चा अर्थ होतो अपहरण आणि आलिका चा अर्थ होतो सहेली. हे दोन शब्द एकत्र येऊन हरतालिका हा शब्द तयार झाला आहे.हरतालिका दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द आहे.
पौराणिक कथा अशी की...
हरतालिकेची एक पौराणिक कथा आहे. यानुसार, पार्वतीच्या मैत्रिणी तिचं अपहरण करून तिला जंगलात घेऊन गेली होती. पार्वतीच्या इच्छेव्यतिरिक्त भगवान विष्णुने तिच्याशी विवाह करू नये म्हणून तिच्या मैत्रिणी तिला जंगलात घेऊन जातात. तिथे देवी पार्वतीने भगवान शंकराची आराधना केली आणि भाद्रपद शुल्क तृतीयेच्या दिवशी मातीचं शिवलिंग तयार करून त्याची पुजा केली. पार्वतीच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान शंकराने देवी पार्वतीचा पत्नी म्हणून स्विकार केला.
फळे- विवाहित महिलांसाठी हरतालिका तीज (हरतालिका तीज 2022) या व्रताचे खूप महत्त्व आहे. मंदिरात मधाच्या वस्तूंसोबत फळांचे दान केल्याने या दिवशी सुख-समृद्धी येते, असे मानले जाते.
गहू- गहू आणि जवाचे दान सोने दान करण्यासारखे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार तीज व्रताच्या वेळी गहू दान केल्यास शुभ फळ मिळते. जर गहू नसेल तर तुम्ही गरजूंना पीठही दान करू शकता.
वस्त्र - हरतालिका व्रताच्या दिवशी कोणत्याही ब्राह्मण महिला किंवा गरीब लोकांना कपडे दान करा. असे मानले जाते की महादेव आणि देवी पार्वती प्रसन्न होतात आणि अखंड सौभाग्याचे वरदान देतात.
तांदूळ - तांदूळ दान करणे खूप शुभ मानले जाते. हरतालिका तीजला तांदूळ दान केल्याने शुक्र ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात असे म्हणतात. कुटुंबात सुख-शांती नांदते.
गूळ - हरतालिका तीजचे व्रत मंगळवारी पडत आहे. या दिवशी गुळाचे दान केल्यास चांगले फळ मिळते. गोरगरिबांना गुळाचे दान केल्याने महिलांना आरोग्य लाभ होतो असे मानले जाते.
संबंधित बातम्या
Hartalika Pujan 2022 : हरतालिका व्रताची उपासना का करावी? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व