Hanuman Jayanti 2025 : हनुमान जयंतीला जुळून येणार दुर्लभ संयोग; 'या' 3 राशींचं नशीब 24 तासांत पालटणार, चौफेर होईल धनलाभ
Hanuman Jayanti 2025 : पंचग्रही योगामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.

Hanuman Jayanti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, समारंभ असो वा एखादा सण कोणत्या ना कोणत्या ठराविक वेळेला ग्रहांचे संयोग नक्की जुळून येतात. यंदा 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती (Hanuman Jayanti) साजरी केली जाणार आहे. या दिवशी पंचग्रही राजयोग (Yog) जुळून येणार आहे. हा योग तब्बल 57 वर्षांनी मीन राशीत जुळून येणार आहे. कारण मीन राशीत बुध, शुक्र, शनी, राहू आणि सूर्य ग्रह विराजमान आहेत. त्यामुळे पंचग्रही योगामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. या लकी राशी (Zodiac Signs) कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी पंचग्रही योग लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तसेच, उत्पन्नाचे नवे स्त्रोत तुमच्यासमोर खुले होतील. त्यामुळे तुम्ही फार उत्साही असाल. कुटुंबियांबरोबर चांगला वेळ घालवाल. तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
पंचग्रही योग मिथुन राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरणार आहे. या कालावधीत तुम्ही तुमच्या नवीन कामाची सुरुवात करु शकता. हा योग तुमच्या कर्म भावाच जुळून येणार आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचं मन रमेल. तुम्ही उत्साहाने हाती घेतलेलं कार्य कराल. तसेच. तुमच्या करिअरमध्ये चांगलं यश येईल. मनासारखं काम करता आल्यामुळे समाधानी असाल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी पंचग्रही योग लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या नवव्या चरणात हा योग जुळून आला आहे. त्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. तसेच, परदेशी यात्रेला जाण्याचे योग देखील जुळून आले आहेत. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तुम्ही हाती घेतलेल्या कामात कोणताच अडथळा येणार नाही. तसेच, मित्रांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















