(Source: ECI | ABP NEWS)
Shani Dev Sade Sati : 2030 पर्यंत 'या' 4 राशी असतील शनीच्या कात्रीत; साडेसातीचं वादळ सतत घोंगावणार, 'असं' कराल शनीदेवाला प्रसन्न
Shani Dev Sade Sati : सध्या कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. मात्र, 2030 पर्यंत कोणत्या राशींच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचं वादळ असणार आहे ते जाणून घेऊयात.

Shani Dev Sade Sati : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीदेवाला (Shani Dev) कर्मफळदाता म्हणतात. कारण जे लोक चांगलं कर्म करतात त्यांना शनी (Lord Shani) चांगलं फळ देतो. तसेच, जे लोक वाईट कर्म करतात त्यांना शनी दंड देतो. मात्र, एकदा जर शनीची वक्री नजर वडली तर त्या राशींच्या लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. शनीच्या ढैय्या आणि साडेसाती दरम्यान राशींना अनेक कष्ट सोसावे लागतात.
ज्योतिष शास्त्रानुसार, सध्या मेष, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु आहे. मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. तर, मीन राशीवर दुसरा टप्पा सुरु आहे. तर, कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. मात्र, 2030 पर्यंत कोणत्या राशींच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचं वादळ असणार आहे हे तुम्हाला माहीत आहे?
शनी राशी संक्रमण 2025
सध्या शनी मीन राशीत विराजमान आहे. या राशीत शनी अडीच वर्षांपर्यंत असणार आहे. त्यानंतर शनी राशी परिवर्तन करणार आहे. अडीच वर्षांनंतर शनी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. तर, 2027 मध्ये शनी दोनदा आपल्या चालीत बदल करणार आहे. त्यानंतर 2028 मध्ये शनी पुन्हा मेष राशीत संक्रमण करणार आहे. 2029 मध्ये शनी पुन्हा दोनदा राशी परिवर्तन करणार आहे.
शनीची साडेसाती
- मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. मेष राशीला 31 मे 2032 पर्यंत शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल.
- वृषभ राशीवर शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा 3 जून 2027 मध्ये सुरु होणार आहे. या राशीच्या लोकांना 13 जुलै 2034 पर्यंत शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळणार आहे.
त्यामुळे 2030 मध्ये शनीची साडेसाती असणार आहे. - कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु आहे. या राशीच्या लोकांना 3 जून 2027 पर्यंत शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल.
- मीन राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु आहे. या राशीच्या लोकांना 8 ऑगस्ट 2029 रोजी शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल.
साडेसातीवर उपाय
शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी आणि शनिवारी भगवान शिवची पूजा करा. तसेच, पूजेच्या वेळी गंगाजलमध्ये काळे तीळ मिसळून भगवान शंकराला अभिषेक करा. त्याचबरोबर, शनिवारच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू दान करा. हे उपाय केल्याने शनीदेव प्रसन्न होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















