Guru-Shukra Yuti 2024 : गुरू आणि शुक्राच्या युतीमुळे 'या' राशींना बसणार आर्थिक फटका; 'या' गोष्टींची काळजी घ्या
Guru-Shukra Yuti 2024 : गुरू आणि शुक्राचा संयोग बुधवार, 12 जून 2024 पर्यंत राहील. गुरू आणि शुक्र यांच्या संयोगामुळे या राशींनी सावध राहणं गरजेचं आहे.
Guru-Shukra Yuti 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, ज्ञानाचा कारक गुरु देव बृहस्पति आणि संपत्ती आणि विलासाचा कारक शुक्र हे लवकरच एकाच राशीत (Horoscope) एकत्र दिसणार आहेत. शुक्र (Shukra) 19 मे 2024 रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरु ग्रह आधीच वृषभ राशीत आहे. गुरू आणि शुक्राचा संयोग बुधवार, 12 जून 2024 पर्यंत राहील. गुरू आणि शुक्र यांच्या संयोगामुळे या राशींनी सावध राहणं गरजेचं आहे.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांना गुरु आणि शुक्रच्या युतीमुळे सतर्क राहण्याची गरज आहे. या दरम्यान तुमची ठरवलेली कामे देखील अपूर्ण राहण्याची किंवा बिघडण्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये अचानक तुमचं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला जर नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी योग्य नाही. त्यामुळे काळजी घ्या असा सल्ला देण्यात आला आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
गुरु आणि शुक्रच्या युतीचा मिथुन राशीच्या लोकांना देखील त्रास होणार आहे. या दरम्यान जे तुमच्या समर्थनात असणारे लोक देखील तुमच्या विरोधात उभे राहण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणामुळे तुम्ही चिंतेत असाल. याचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होईल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी गुरु आणि शुक्रची युती फार नुकसानकारक ठरू शकते. तुमच्या जवळचे नातेवाईक तुमच्यापासून दूर होऊ शकतात. तुमच्या खर्चात गरजेपेक्षा जास्त वाढ झाल्याने तुम्हाला टेन्शन येईल. तर तु्म्हाला दुसऱ्या ठिकाणी नोकरी करायची असेल तर ही वेळ तुमच्यासाठी योग्य नाही.
तूळ रास (Libra Horoscope)
गुरु आणि शुक्रची युती तूळ राशीच्या लोकांसाठी अनेक अडचणी निर्माण करणारी असू शकते. या दरम्यान तुम्ही कोणत्याही नवीन कार्याला सुरुवात करू नका. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगली वागणूक मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला तो मानसिक तणाव असेल. या दरम्यान फक्त तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा आणि सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: