Gemini Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : मिथुन राशीसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे; फायदा होणार की तोटा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Gemini Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : मिथुन राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा मिथुन राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Gemini Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली आहे. ऑक्टोबरचा दुसरा आठवडा मिथुन राशीसाठी नेमका कसा असणार? मिथुन राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा मिथुन राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी मिथुन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मिथुन राशीची लव्ह लाईफ (Gemini Love Horoscope)
या आठवड्यात तुमच्या नात्यात काही दुरावा येईल. अहंकारामुळे नात्यात अडचणी वाढतील. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. महिलांना त्यांच्या प्रेम जीवनात तणाव जाणवू शकतो, त्यामुळे अडचणी वाढतील. या आठवड्यात तुमच्या प्रेमप्रकरणाला तुमच्या पालकांकडून मान्यता मिळू शकते. काही लोकांच्या प्रेम जीवनात आधीचा प्रियकर परत येऊ शकतो. तथापि, विवाहित पुरुषांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे, यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी वाढू शकतात.
मिथुन राशीचे करिअर (Gemini Career Horoscope)
या आठवड्यात ऑफिस मिटींगमध्ये किरकोळ अडचणी येतील, परंतु कामात निष्ठा ठेवल्यास सर्व अडचणी दूर होतील. तुम्ही नवीन नोकरी जॉईन करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला थोडा त्रास जाणवू शकतो. वरिष्ठांना तक्रार करण्याची संधी देऊ नका. कायदा, मीडिया, राजकारण किंवा आरोग्य सेवेत असलेल्यांसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येईल.
मिथुन राशीची आर्थिक स्थिती (Gemini Wealth Horoscope)
या आठवड्यात आर्थिक स्थिती चांगली राहील, ज्यामुळे नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्यात मदत होईल. या आठवड्यात तुम्ही शेअर बाजार आणि व्यापारासह इतर सोयीस्कर पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. जर तुम्ही भागीदारीत व्यवसायात असाल, तर या आठवड्यात तुम्हाला आणि तुमच्या व्यवसायातील भागीदाराला पैसे मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील, त्यामुळे उत्पन्न दुप्पट होऊ शकतं.
मिथुन राशीचे आरोग्य (Gemini Health Horoscope)
आरोग्यासंबंधी किरकोळ समस्या उद्भवू शकतात. ज्या लोकांना यकृत किंवा फुफ्फुसाशी संबंधित समस्या आहेत त्यांना या आठवड्यात समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. सकस आहार घ्या. चांगली जीवनशैली अंगीकारा. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. तुम्ही तंबाखू आणि अल्कोहोलचे सेवन बंद केलं पाहिजे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :