(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ganesh Chaturthi 2024 Date : बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर; मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीपासून सुरू होतो आणि चतुर्दशी तिथीला संपतो. त्यानुसार 2024 मध्ये बाप्पांचं आगमन नेमकं कधी? शास्त्रानुसार अचूक तिथी आणि स्थापना मुहूर्त जाणून घ्या
Ganesh Chaturthi 2024 Date : बाप्पांच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अगदी कोकणी माणसापासून ते मुंबईकरांपर्यंत प्रत्येकालाच सध्या बाप्पाच्या आगमनाची आस लागली आहे. गल्लोगल्ली ढोल-ताशा पथकांची तयारी, आगमन सोहळे, मंडप सजावटी पाहून मनातील आतुरता आणखी वाढत जाते. गणपती बाप्पा 10 दिवस येतात आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय करुन जातात. अशात यंदा गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2024 Date) नेमकी कधी? मूर्ती स्थापनेसाठी शुभ मुहूर्त कोणता? पूजा पद्धत आणि विसर्जनाबाबत (Ganpati Visarjan 2024 Date) सविस्तर जाणून घेऊया.
यंदा गणेशोत्सव कधीपासून? (Ganeshotsav 2024 Date)
हिंदू कॅलेंडरनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. या दिवसापासून गणेशोत्सव सण सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा आपल्यासोबत राहतात.
यंदाचा गणेशोत्सव 7 सप्टेंबर 2024 रोजी सुरू होणार आहे. तर 17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्दशीला गणेशोत्सव संपेल. 17 सप्टेंबरला गणेश विसर्जन होईल.
गणेश चतुर्थी 2024 शुभ मुहूर्त (Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurta)
पंचांगानुसार, गणेश चतुर्थी शनिवारी, 7 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3:01 वाजता सुरू होईल आणि रविवार, 8 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:37 वाजता समाप्त होईल.
मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त : सकाळी 11:03 ते दुपारी 1:34 पर्यंत
म्हणजेच तुम्ही 7 सप्टेंबरला 2 तास 31 मिनिटांच्या शुभ मुहूर्तात केव्हाही गणपती बाप्पाची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापित करू शकता.
गणेश चतुर्थी 2024 पूजा विधी (Ganesh Chaturthi 2024 Puja Vidhi)
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सर्व प्रथम सकाळी लवकर उठणं, अंघोळ करणं, देव्हारा स्वच्छ करुन बाप्पाची पूजा करणं. यानंतर शुभ मुहूर्तावर घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक पाट स्थापित करा आणि त्यावर पिवळ्या किंवा लाल रंगाचं कापड पसरवा, त्यावर बाप्पाची मूर्ती ठेवा. त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ श्रीगणेशाची आरती करुन बाप्पाला विविध प्रकारचा नैवेद्य दाखवावा आणि शेवटच्या दिवशी श्रद्धेने त्याचा निरोप घ्यावा आणि मूर्तीचं विसर्जन करावं.
गणेश चतुर्थी महत्त्व (Ganeshotsav Significance)
गणेशोत्सवात गणेशाची विधिवत पूजा केल्याने बाप्पा मनुष्याला प्रत्येक संकटातून मुक्त करतो. सुख-समृद्धीसोबतच बाप्पा भक्तांना संपत्तीचा आशीर्वाद देतात. श्रीगणेशाच्या पूजेमुळे घरात सुख, शांति आणि समृद्धी नांदते, घराची भरभराट होते, असं मानलं जातं. कोणत्याही शुभकार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणेशाची आराधना करतात.
हेही वाचा: