एक्स्प्लोर

Dasara 2023: दसर्‍याला आपट्याची पानं सोनं म्हणून का देतात? 'हे' आहे आपट्याच्या पानांचं महत्त्व

Dasara 2023: दसऱ्याला सोन्याचं प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पानं लुटण्याची प्रथा बरीच जुनी आहे. विजयादशमी म्हणजेच दसऱ्याला आपट्याचीच पानं सोनं म्हणून का वाटली जातात? जाणून घेऊया.

Dasara 2023: शारदीय नवरात्रीच्या समाप्तीनंतर दुसऱ्या दिवशी दसऱ्याचा (Dasara) सण मोठ्या थाटात साजरा केला जातो, याला विजयादशमी असंही म्हणतात. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या या दिवसाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता, त्यामुळे या दिवशी रावण दहनही केलं जातं, यासोबत या दिवशी शस्त्रांची पूजाही केली जाते. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून वाटली जातात. 

या दिवशी धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते, त्याचं प्रतीक म्हणून सोनं म्हणजेच आपट्याची पानं, पाटी-पुस्तक अर्थात सरस्वती देवी आणि शस्त्रास्त्रांचं पूजन केलं जातं. पण या सर्वात तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का, की दसऱ्याला आपट्याचीच पानं सोनं म्हणून का दिली जातात? जाणून घेऊया.

दसऱ्याला का वाटली जातात आपट्याची पानं?

पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रं शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती. त्यापैकी धनुष्य आणि काही बाण अर्जुनाने विराटाच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही दसऱ्याच्याच दिवशी.

धार्मिक शास्त्रात म्हटलं गेलं आहे की, शमीच्या झाडामध्ये कुबेर देव, वृक्षात धनाची देवता वास करते. त्यामुळे शमीच्या झाडाची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. तसंच उत्पन्न, आनंद आणि वय वाढतं. यासाठी लोक दर शनिवारी शमीच्या झाडाची पूजा करतात. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची पानं म्हणजेच शमीच्या पानांचं वाटप केल्याने सुख, समृद्धी वाढते. या दिवशी सीमोल्लंघन, शमी पूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्र पूजा ही चार कृत्यं करायची असतात.

आपट्याच्या पानांचं धार्मिक महत्त्व

आपटयाला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा (Bauhinia racemosa) आहे. दसर्‍याच्या दिवशी शमीची पानं आपल्या घरात ठेवावीत. यामुळे घरातील हवा शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. या आपट्याच्या पानांची देवाणघेवाण होते, त्या वेळी हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जिवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होतात.

आयुर्वेदातही आपट्याचा उल्लेख आहे. आपट्याच्या सालीचा रस पचनसंस्थेच्या रोगांवर वापरला जातो. मुतखडा विकारात औषधामध्ये आपट्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. याची पानं कफ आणि पित्त दोषांवर देखील गुणकारी असल्याचं सांगितलं जातं.

हेही वाचा:

Dasara 2023: दसऱ्याच्या दिवशी करा 'हे' उपाय; आर्थिक समस्या होतील दूर, समृद्धीही नांदेल

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 11 July 2026: आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Lucky Zodiac Signs : 11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार! जुलैचा नवा आठवडा कसा असेल? पैसा, प्रेम, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार! जुलैचा नवा आठवडा कसा असेल? पैसा, प्रेम, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Shani Vakri 2026 : जून 2027 पर्यंत 3 राशींवर असणार शनिदेवाची कृपा; नोकरी, करिअर, पैसा आणि लव्ह लाईफमध्येही दिसणार सकारात्मक बदल
जून 2027 पर्यंत 3 राशींवर असणार शनिदेवाची कृपा; नोकरी, करिअर, पैसा आणि लव्ह लाईफमध्येही दिसणार सकारात्मक बदल

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget