एक्स्प्लोर

Dasara 2023: दसऱ्याच्या दिवशी करा 'हे' उपाय; आर्थिक समस्या होतील दूर, समृद्धीही नांदेल

Dasara 2023: देशभरात नवरात्रीच्या समाप्तीनंतर दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस शुभ मानला जात असून या दिवशी काही उपाय केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारु शकते.

Dasara 2023: आज देशभरात दसरा (Dasara) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे, त्यात दसऱ्याचा दिवस समृद्धी घेऊन येतो असंही म्हणतात. दसऱ्याच्या दिवशी काही उपाय केल्यास तुमची आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते, पैशांशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. दसऱ्याच्या दिवशी हे काही उपाय केल्यास सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळेल.

गुप्त दान केल्यास मिळेल आर्थिक लाभ

दसऱ्याला संध्याकाळी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर गुप्तपणे गरीब लोकांना दान केल्यास घरातील दारिद्र्य नाहीसं होतं. घरात गरिबी राहत नाही, तसेच आर्थिक लाभ मिळतो. गरिबांना गुप्तपणे अन्न, झाडू आणि कपडे दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घराची भरभराट होते.

अपराजिताची फुलं तिजोरीत ठेवा

दसऱ्याच्या दिवशी पूजा करताना लक्ष्मी देवीला अपराजिताची फुलं अर्पण करावी, यानंतर ही फुलं तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी, पैशाच्या पाकिटात ठेवा, असं केल्याने तिजोरी कधीच रिकामी राहत नाही. दसऱ्याच्या दिवशी चंद्राला अपराजिताची फुलं अर्पण केल्याने जीवनात सुख-शांती कायम राहते.

शस्त्र पूजन

विजयादशमीला शस्त्रांची पूजा केल्याने सर्व कार्य सिद्धी होतात असे म्हणतात. विजयाचे वरदान मिळते. या दिवशी लोक वाहने, यंत्रे, वाद्ये, सर्व उपकरणे यांची पूजा करतात जे त्यांच्या दैनंदिन दिनचर्याचा भाग आहेत. त्यांची पूजा करून दसऱ्याला अर्पण केल्याने प्रगती होते असे मानले जाते.

व्यवसायात प्रगतीसाठी

दसऱ्याच्या दिवशी पिवळ्या कपड्यात नारळ गुंडाळून, मिठाई आणि पवित्र धागा राम मंदिरात दान केल्याने व्यवसायात फायदा होत असल्याचं मानलं जातं. असं केल्यास व्यवसाय दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट वाढतो, असंही मानलं जातं.

सर्व क्षेत्रात यश मिळवण्यासाठी

दसऱ्याच्या दिवशी अपराजिता देवीची पूजा केल्यास देखील प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं. तुम्ही कोणत्याही कार्यात मागे पडत नाहीत.

नोकरीसाठी उपाय

नोकरी आणि व्यवसायात ज्या व्यक्तीला अडचणी येत आहेत, त्याने दसऱ्याच्या दिवशी दुर्गा देवीची पूजा करावी. देवीला 10 फळं अर्पण करावी. फळं अर्पण करताना ओम विजयाय नमः या मंत्राचा जप करावा, यामुळे तुमच्या नोकरीबाबतच्या अडचणी दूर होतील.

सर्व रोगांपासून मिळेल मुक्ती

दसऱ्याच्या दिवशी हवन करण्याची परंपरा आहे. यासोबतच घरातील एखादा सदस्य दररोज आजारी पडत असल्यास दसऱ्याच्या दिवशी त्याच्या डोक्यावरुन एक नारळ 7 वेळा ओवाळावा आणि रावण दहनाच्या आगीत टाकावा. 

शनिच्या महादशापासून सुटका

दसऱ्याच्या दिवशी शमीचं झाड लावल्यास किंवा संध्याकाळी शमीच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शनीची साडेसाती कमी होऊ शकते.

नकारात्मक ऊर्जा निघून जाईल

दसऱ्याच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात एका भांड्यात अपराजिताची फुलं ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहील. घरगुती त्रासातूनही सुटका होईल.

10 प्रकारच्या वाईट वृत्तींपासून मुक्ती

दसऱ्याच्या दिवशी दहामुखी रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं. या 10 तोंडांचा संबंध माणसाच्या आत वाढणारा राग, लोभ, माया, मत्सर, स्वार्थ, अमानुषता, नशा, अन्याय आणि अहंकार यांच्याशी जोडलेला दिसतो. रावणाच्या पुतळ्याचं दहन करताना या दुष्कृत्यांना मुळापासून नष्ट करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे, यामुळे जीवनात सुख-समृद्धी येते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Dasara 2023: दसऱ्याच्या दिवशी केलं जातं शस्त्र पूजन; कोणता आहे शुभ मुहूर्त? जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Capricorn August Monthly Horoscope 2026: मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
Virgo August Monthly Horoscope 2026 : कन्या राशीसाठी ऑगस्टचा महिना धनलाभाचा! नोकरीत पगारवाढ, प्रमोशनची शक्यता; वाचा मासिक राशीभविष्य
कन्या राशीसाठी ऑगस्टचा महिना धनलाभाचा! नोकरीत पगारवाढ, प्रमोशनची शक्यता; वाचा मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Embed widget