एक्स्प्लोर

Dasara 2023: दसऱ्याच्या दिवशी केलं जातं शस्त्र पूजन; कोणता आहे शुभ मुहूर्त? जाणून घ्या

Vijayadashami 2023: दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करून युद्ध जिंकलं होतं. यावेळी दसऱ्याच्या दिवशी अनेक शुभ मुहूर्त आले आहेत, याबद्दल अधिक जाणून घेऊया.

Dasara 2023: हिंदू धर्मात दसरा (Dasara) या सणाला विशेष महत्त्व आहे. यावेळी दसरा आज, म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी साजरा होत आहे. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध केला, जो अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो. या दिवशी माता दुर्गेनेही महिषासुराचा वध केला होता. 

दसऱ्याच्या दिवशी 'या' वस्तूंची खरेदी करणं शुभ

दसऱ्याच्या दिवशी देशभरात विविध ठिकाणी रावण दहन केलं जातं. या दिवशी शस्त्रांचीही पूजा केली जाते. या दिवशी वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने, दागिने, नवीन कपडे इत्यादी खरेदी करणं शुभ मानलं जातं. दसरा हा सण सामाजिक ऐक्य, सहकार्य आणि सौहार्दाचं प्रतीक मानला जातो.

शस्त्रपूजनासाठी शुभ मुहूर्त

दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी विजय मुहूर्तावर शस्त्रपूजन केलं जातं. यंदा दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच, 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 01:58 ते 02:43 पर्यंत शस्त्रपूजेचा शुभ मुहूर्त असेल. तर, अभिजीत मुहूर्त हा 24 ऑक्टोबर 2023 ला सकाळी 11:43 ते दुपारी 12:28 पर्यंत आहे.

रावण दहनाचा मुहूर्त

दसऱ्याच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं. यंदा रावण दहनाची वेळ 24 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी सुरू होणार आहे. रात्री 8 वाजून 54 मिनिटांपर्यंत रावण दहन केलं जाऊ शकतं.

दसऱ्याच्या दिवशी ही कामं करणं मानलं जातं शुभ 

ज्योतिषांनी सांगितल्यानुसार, दसरा किंवा विजयादशमी ही तिथी मानली जाते जी सर्व सिद्धी देते. त्यामुळे या दिवशी केलेलं प्रत्येक शुभ कार्य फलदायी मानलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार, दसऱ्याच्या दिवशी लहान मुलांचे अक्षरलेखन, घर किंवा दुकानाचं बांधकाम, घरकाम, जावळ भरणं, नामकरण सोहळा, कान टोचणं, यज्ञोपवीत संस्कार आणि भूमिपूजन यासारखे उपक्रम करणं शुभ मानलं जातं. या दिवशी विवाह विधी केले जात नाहीत, ते निषेधपर मानले जातात.

दसऱ्याचं महत्त्व

हिंदू मान्यतेनुसार, दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीरामांनी लंकेचा राजा रावणाचा वध करून माता सीतेला त्यांच्या तावडीतून मुक्त केलं, अशाप्रकारे रावणाच्या दुष्टकर्मांचा अंत करत त्यांनी विजय मिळवला. या कारणास्तव या दिवशी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचं दहन केलं जातं. या अभूतपूर्व विजयामुळे या सणाला विजयादशमी असंही म्हटलं जातं.

हेही वाचा:

Weekly Panchang 2023: दसरा ते कोजागिरी पौर्णिमा पर्यंत सात दिवसांचे मुहूर्त, राहुकाळ, आठवड्याचे पंचांग जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Guru Purnima 2026: गुरूपौर्णिमेपासून भाग्याचे दार उघडतील, तुमच्या राशीनुसार 'हे' उपाय करा, गुरू ग्रहाचा भक्कम पाठिंबा लाभेल, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
गुरूपौर्णिमेपासून भाग्याचे दार उघडतील, तुमच्या राशीनुसार 'हे' उपाय करा, गुरू ग्रहाचा भक्कम पाठिंबा लाभेल, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
Career Astrology : नोकरीत यश हवंय? पैशांची कमतरता भासतेय? तुमच्या कुंडलीत 'हे' ग्रह मजबूत असायला हवेत, जाणून घ्या ज्योतिषशास्त्र...
नोकरीत यश हवंय? पैशांची कमतरता भासतेय? तुमच्या कुंडलीत 'हे' ग्रह मजबूत असायला हवेत, जाणून घ्या ज्योतिषशास्त्र...
Ashadh Purnima 2026 : आज आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सूर्य-चंद्र आणि गुरु ग्रहांचा जुळून आला 'समसप्तक योग'; 30 जुलैपासून 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु
आज आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सूर्य-चंद्र आणि गुरु ग्रहांचा जुळून आला 'समसप्तक योग'; 30 जुलैपासून 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु
Horoscope Today 29 July 2026 : आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Priyanka Gandhi and Pralhad Joshi: प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
India CWG 2026 : कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
Embed widget