Weekly Panchang 2023: दसरा ते कोजागिरी पौर्णिमा पर्यंत सात दिवसांचे मुहूर्त, राहुकाळ, आठवड्याचे पंचांग जाणून घ्या
Weekly Panchang 2023: ऑक्टोबरचा चौथा आठवडा 23-29 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालेल. या काळात दसरा, कोजागिरी पौर्णिमा, पाशांकुशा एकादशीचे व्रत असतील. 7 दिवसांचा शुभ काळ, योग आणि राहुकाळ जाणून घ्या
Weekly Panchang 2023: ऑक्टोबरचा (October-2023) चौथा आणि शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 ही शारदीय नवरात्रीचा (Shardiya Navratri 2023) नववा दिवस आहे. या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते, हा नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. तर नोव्हेंबरच्या 14 तारखेपासून कार्तिक महिना सुरू होईल. कार्तिक महिना श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे.
पंचांगाद्वारे वेळ आणि काळाची गणना
हिंदू पंचांगला वैदिक पंचांग देखील म्हणतात. पंचांगाद्वारे वेळ आणि काळाची गणना केली जाते. पंचांग हे 5 भागांचे बनलेले आहे जे खूप महत्वाचे आहेत, भारतांतील राज्याराज्यांत वेगवेगळी हिंदू पंचांगे चालत असली तरी त्यांत काही समान गोष्टी आहेत. या सर्व पंचांगांत दैनंदिन कालगणनेची पाच अंगे आहेत. ती म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग व करण. या पाच अंगांची माहिती यात असते म्हणून या कोष्टकाला पंचांग म्हणतात.या माध्यमातून शुभ, अशुभ काळ, योग आणि नक्षत्राची माहिती मिळतेया सप्ताहात दुर्गा विसर्जन, दसरा, पाशांकुशा एकादशी, कोजागिरी पौर्णिमा, मीराबाई जयंती आणि वाल्मिकी जयंती साजरी केली जाणार आहे. 7 दिवस कोणते सण, व्रत, ग्रह बदल आणि शुभ योग असतील ते जाणून घेऊया.
साप्ताहिक पंचांग 23 ऑक्टोबर - 29 ऑक्टोबर 2023, शुभ काळ, राहुकाळ
23 ऑक्टोबर 2023
उपवास आणि सण - दुर्गा नवमी, आयुधा पूजा,
तिथी - नवमी
पक्ष - शुक्ल
वार - सोमवार
नक्षत्र - श्रवण
योग - शूल, रवि, सर्वार्थ सिद्धी
राहुकाल - सकाळी 7.51 ते सकाळी 9.16
24 ऑक्टोबर 2023
उपवास आणि सण - दसरा, दुर्गा विसर्जन,
तिथी-दशमी
पक्ष - शुक्ल
वार - मंगळवार
नक्षत्र - धनिष्ठा
योग - रवि, गंड
राहुकाल - दुपारी 02.54 - 04.19
25 ऑक्टोबर 2023
व्रत आणि उत्सव - पाशांकुशा एकादशी, पद्मनाभ एकादशी
तिथी - एकादशी
पक्ष - शुक्ल
वार - बुधवार
नक्षत्र - शततारका
योग - वृद्धि, रवी
राहुकाल - दुपारी 12.05 - 01.39
26 ऑक्टोबर 2023
व्रत आणि सण - गुरु प्रदोष व्रत
तिथी - द्वादशी
पक्ष - शुक्ल
वार - गुरुवार
नक्षत्र - पूर्वा भाद्रपद
योग - ध्रुव, व्याघात
राहुकाल - दुपारी 01.29 - दुपारी 02.53
27 ऑक्टोबर 2023
तिथी - त्रयोदशी
पक्ष - शुक्ल
शनिवार - शुक्रवार
नक्षत्र - उत्तर भाद्रपद
योग - हर्षण, सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी, रवि योग
राहुकाल - सकाळी 10.41 ते दुपारी 12.05 पर्यंत
28 ऑक्टोबर 2023
व्रत आणि सण – कोजागिरी पौर्णिमा, महर्षी वाल्मिकी जयंती, मीराबाई जयंती
तिथी - पौर्णिमा
पक्ष - शुक्ल
शनिवार - शनिवार
नक्षत्र - रेवती, अश्विनी
योग - वज्र, रवि
राहुकाल – सकाळी 9.17 ते सकाळी 10.41
खंडग्रास चंद्रग्रहण
29 ऑक्टोबर 2023
ग्रहण करिदिन
पक्ष - शुक्ल
वार - रविवार
नक्षत्र - भरणी
योग - सिद्धी, त्रिपुष्कर
राहुकाल - 04.15 - 05.39
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
Numerology Weekly Horoscope: नवीन आठवड्यात 'या' जन्मतारखेच्या लोकांचे नशीब चमकणार! नोकरीच्या संधी, नातेसंबंध मजबूत होतील.