एक्स्प्लोर

Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'

Kangana Ranaut On CJP Saurav Das: कंगनानं सौरव यांच्या पोस्टचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत त्यांना 'निरुपयोगी आणि बेरोजगार' म्हटलं आहे. तसेच, याच्या वयात असताना मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले, असंही म्हटलंय. 

Kangana Ranaut On CJP Saurav Das: जेन-झींवर (Gen-Z) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तरीसुद्धा ती तिच्यावर टीका करणाऱ्यांना तेवढ्याच तिखट शब्दांत प्रत्युत्तर देतेय. कंगनानं जेन-झींना 'जनरेशन गटार' म्हणून संबोधलं आणि सर्वत्र खळबळ माजली. अभिनयातून राजकारणात गेलेल्या कंगनानं जेन-झींबद्दल इतरही अनेक वादग्रस्त आणि आक्षेपार्ह्य वक्तव्य केलीत. इतकंच काय तर, तिनं हिंदू तरुणींवरही गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश करणाऱ्या, ड्रग्ज-दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या असं म्हणत टीका केली. यावर 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) प्रवक्ते सौरव दास (Saurav Das) यांनी कंगनावर टीकास्त्र डागलेलं. पण, आता कंगनानं सौरव दास यांच्यावर प्रत्युत्तर दिलंय. कंगनानं सौरव यांच्या पोस्टचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत त्यांना 'निरुपयोगी आणि बेरोजगार' म्हटलं आहे. तसेच, याच्या वयात असताना मला दोन राष्ट्रीय पुरस्कार (National Award) मिळालेले, असंही म्हटलंय. 

कंगना रनौतनं ANI सोबतच्या सौरव दास यांच्या मुलाखतीची एक व्हिडीओ क्लिप आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आणि त्यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. तिनं त्यांच्या विद्यार्थी असण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपल्या स्वतःच्या कामगिरीची तुलना सौरव दास यांच्या कारकिर्दीतील टप्प्यांशी करत, तिनं त्यांना 'निरुपयोगी', 'बेरोजगार' ठरवलं आहे.

कंगना रनौत कॉकरोच जनता पार्टीवर नेमकं काय म्हणाली? (Kangana Ranaut On Cockroach Janta Party)

कंगनानं जेन-झींवर केलेल्या वक्तव्यावर बोलताना कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी तिखट शब्दांत वार केलेले. अशातच आता कंगना रनौतनं सौरव दास यांच्यावर पलटवार केलाय. कंगनानं सौरव दास यांच्या वक्तव्याचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत लिहिलंय की, "मी या व्यक्तीला गूगलवर शोधलं, याचं वय 28 वर्ष आहे. तो स्वतःला विद्यार्थी कसा काय म्हणवतो? हे मला समजत नाही, मी गेल्या 2 वर्षांपासून राजकारणात असले, तरी 20 वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहे. त्याच्या वयात माझ्याकडे 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार होते..."

कंगना रनौत पुढे बोलताना म्हणाली की, "नवीन खासदार म्हणून माझ्यावर कामाचा ताण होता, कारण मी केवळ खासदार नाही, तर चित्रपट निर्माती, अभिनेत्री, स्क्रीनरायटर आणि उद्योजिका देखील आहे. पण त्याच्यासारख्या पूर्णपणे बेरोजगार व्यक्तीला इतकं काम करणं म्हणजे, काय असतं हे कधीच कळणार नाही..."

Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...

"प्रिय सौरव, तुझे प्रश्न वैयक्तिक आहेत. तू विद्यार्थी नाहीस, तू निव्वळ एक बेरोजगार, निरुपयोगी जीव आहेस. काहीतरी नवीन कौशल्य शिकण्यापासून सुरुवात कर, ती एक चांगली सुरुवात ठरेल...", असा सल्ला कंगना रनौतनं आपल्या पोस्टच्या शेवटी CJP प्रवक्ते सौरव दास यांना दिलाय. 

वादाचं कारण नेमकं काय? (Kangana Ranaut vs Saurav Das)

NEET-UG 2026 पेपरफुटींच्या आरोपांबाबत CJP च्या नेतृत्वाखालील आंदोलन संपल्यानंतर काही दिवसांनी कंगना रनौत आणि सौरव दास यांच्याशी संबंधित ही घटना घडली. जवळपास 36 दिवस चाललेलं हे आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरच संपुष्टात आलं. केंद्र सरकारनं CJP च्या अनेक मागण्या मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. पण, त्यानंतर कंगना रनौतनं जेन-झी आंदोलकांवर तिखट शब्दांत वार केले आणि तिथूनच या वादाला सुरुवात झाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'स्वतःचा पक्षच हिला गांभीर्यानं घेत नाही...';'जेन झीं'ना 'जनरेशन गटार' म्हणणाऱ्या कंगनावर कॉकरोच जनता पार्टीचे तिखट वार

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget