एक्स्प्लोर

Career Astrology : नोकरीत यश हवंय? पैशांची कमतरता भासतेय? तुमच्या कुंडलीत 'हे' ग्रह मजबूत असायला हवेत, जाणून घ्या ज्योतिषशास्त्र...

Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार, आपल्या मेहनतीनुसार आपल्या ग्रहांची स्थिती ही करियरची दिशा ठरवते. कुंडलीतील काही विशेष ग्रह आणि आपल्या भावनांचा आपल्या उपजीविकेशी आणि नोकरीतील यशाची जोडलेले असतात.

Job Success Astrology : आजच्या या धावपळीच्या युगात प्रत्येकाला कामात यशाचं शिखर गाठायचं आहे. दिवस रात्र मेहनत करून सुद्धा लोकांना हवी तशी नोकरी भेटत नाही. कामात प्रमोशन आणि बढतीची बराच काळ वाट पाहावी लागते. 

ज्योतिष शास्त्रानुसार, आपल्या मेहनतीनुसार आपल्या ग्रहांची स्थिती ही करियरची दिशा ठरवते. कुंडलीतील काही विशेष ग्रह आणि आपल्या भावनांचा आपल्या उपजीविकेशी आणि नोकरीतील यशाची जोडलेले असतात. चला जाणून घेऊयात नोकरीत मोठं यश आणि सन्मान मिळवण्यासाठी कुंडलीतील ग्रह बळकट असणं महत्त्वाचं आहे.

सूर्य स्थान आणि आदर देतो  

ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि शासकीय आदराचा एक घटक मानला जातो. जर सूर्य ग्रह बळकट स्थितीत असेल तर त्या व्यक्तिमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळतो आणि प्रमोशनची संधी निर्माण होते. सरकारी नोकरी करण्याची इच्छा ठेवणार्‍यांसाठीसुद्धा सूर्य बळकट असणं महत्त्वाचं आहे.        

शनि देतो कठोर परिश्रमाचं पूर्ण फळ 

शनिला कर्मफळदाता तसेच न्यायदेवता म्हणतात. नोकरी आणि दीर्घकालीन, करियरसाठी शनी ग्रह महत्त्वाचा मानला जातो. जर तुमच्या कुंडलीत शनी शुभ स्थितीत असेल तर ती व्यक्ती मेहनती, जबाबदार आणि धैर्यवान असते. अशा लोकांना हळुहळू पण स्थायी यश मिळण्याची शक्यता जास्त असते. 

बुध ग्रह माणसाला बुद्धिमान आणि यशस्वी बनवतो  

बुध ग्रह बुद्धी, संवाद, तर्कक्षमता आणि व्यवहारिक समज देतो. ज्या लोकांच्या कुंडलीत बुध ग्रह बळकट आहे असे लोक प्रभावशाली असतात. बुध ग्रहामुळे (मार्केटिंग), माध्यम, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान (आयटी), लेखन, बँकिंग आणि संवाद यांसारख्या क्षेत्रांमध्ये विशेष लाभ मिळतो.

गुरु ग्रह देतो सन्मान आणि प्रगती

गुरु ग्रहाला ज्ञान, भाग्य आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. बलवान गुरु ग्रह व्यक्तीला माहितीपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता देतो. अशा व्यक्तींना वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळते आणि करिअरमध्ये प्रगतीच्या अधिक संधी उपलब्ध होतात. गुरु ग्रह शिक्षण, प्रशासन, न्याय, धार्मिक बाबी आणि सल्लागार या क्षेत्रांमध्ये विशेषत फायदेशीर आणि शुभ मानला जातो.

मंगळ ग्रह धैर्य आणि नेतृत्व देतो

मंगळ ग्रह ऊर्जा, धैर्य आणि निर्णय घेण्याचे प्रतीक आहे. बलवान मंगळ ग्रह लष्कर, पोलीस, अभियांत्रिकी, तांत्रिक क्षेत्र, क्रीडा आणि प्रशासकीय सेवांमध्ये यश मिळवून देतो असे मानले जाते. तो व्यक्तींना कठीण परिस्थितीतही आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे सामर्थ्य देतो. 

नोकरीत यश हवं असेल तर काय करावं? 

ज्योतिष शास्त्रानुसार, रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करणे, आपल्या कामाशी नेहमी प्रामाणिक राहा, वेळेचं पालन करा आणि मोठ्यांचा आदर करणं करिअरसाठी शुभ मानलं जातं. गुरुवारी भगवान विष्णू आणि गुरुची पूजा करणे आणि शनिवारी गरजू लोकांना मदत करणे हे देखील शुभ मानले जाते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :         

Ashadhi Purnima 2026 : आज आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सूर्य-चंद्र आणि गुरु ग्रहांचा जुळून आला 'समसप्तक योग'; 30 जुलैपासून 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chanakya Niti : यशाची उंची गाठायची असेल तर आचार्य चाणक्यांचे 'हे' 3 बहुमूल्य नियम पाळा; एका झटक्यात आयुष्य बदलेल
यशाची उंची गाठायची असेल तर आचार्य चाणक्यांचे 'हे' 3 बहुमूल्य नियम पाळा; एका झटक्यात आयुष्य बदलेल
Shani Nakshatra Parivartan 2026 : शनिचं नक्षत्र परिवर्तन परिवर्तन अवघ्या काही दिवसांवर...12 पैकी 3 राशींना धोक्याचे संकेत, दिवसेंदिवस टेन्शन वाढणार
शनिचं नक्षत्र परिवर्तन परिवर्तन अवघ्या काही दिवसांवर...12 पैकी 3 राशींना धोक्याचे संकेत, दिवसेंदिवस टेन्शन वाढणार
Garud Puran: तुमचा पुढचा जन्म आधीच ठरलेला असतो? 84 लाख योनींचे चक्र काय आहे? गरुडपुराणातील 'हे' रहस्य कमी लोकांना माहित..
तुमचा पुढचा जन्म आधीच ठरलेला असतो? 84 लाख योनींचे चक्र काय आहे? गरुडपुराणातील 'हे' रहस्य कमी लोकांना माहित..
Raksha Bandhan 2026 : यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget