एक्स्प्लोर

तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर

युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात कच्च्या तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. त्यामुळे हा कायदा झाल्यास भारताच्या ऊर्जा आयातीवर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतात.

US prepares to impose additional tariffs: भारतावर आता 100 टक्के अमेरिकन शुल्काचे संकट घोंघावत आहे. अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर झालेल्या विधेयकानुसार, रशियाकडून कच्चे तेल (Crude Oil) आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर 100 टक्के अतिरिक्त आयात शुल्क (Tariff) लादले जाऊ शकते. भारत आणि चीन हे रशियाचे सर्वात मोठे ऊर्जा ग्राहक असल्याने भारताला याचा मोठा फटका बसू शकतो. या विधेयकातून रशियामधून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर 500 टक्के शुल्क आकारण्याचे व्यापक अधिकार या विधेयकाद्वारे राष्ट्राध्यक्षांना मिळतील. अमेरिकन सिनेटमध्ये हे विधेयक 86-12 अशा मोठ्या बहुमताने प्राथमिक प्रक्रियेत मंजूर झाले आहे. मात्र, प्रतिनिधी गृहाच्या (House) सुट्ट्यांमुळे सप्टेंबर महिन्यापूर्वी याचे कायद्यात रूपांतर होण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला आहे.

युक्रेनकडून निर्णयाचे स्वागत 

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीही रशियावर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी या निर्बंधांचे स्वागत केले आहे. हे विधेयक 1996 च्या इराण निर्बंध कायद्याचा (Iran Sanctions Act) कालावधी 2031 पर्यंत वाढवते, ज्यामुळे इराणसोबत व्यापार करणाऱ्या कंपन्यांवरही अमेरिकेला कारवाई करता येईल. जर अमेरिकेच्या राष्ट्रीय हितासाठी आवश्यक वाटले, तर राष्ट्राध्यक्ष हे निर्बंध शिथिल किंवा माफ (Waive) करू शकतात, अशी तरतूदही या विधेयकात आहे. 

भारतासाठी काय परिणाम होणार?

युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात मिळणाऱ्या कच्च्या तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. त्यामुळे हा कायदा झाल्यास भारताच्या ऊर्जा आयातीवर आणि अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. रशियाकडून कच्चे तेल (Crude Oil) आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश आहे. या विधेयकानुसार, अशा देशांवर 100 टक्के अतिरिक्त आयात शुल्क (Tariff) लादले जाऊ शकते, ज्यामुळे भारतासाठी इंधन आयात अत्यंत महाग होईल. हा कायदा लागू झाल्यास, रशियाच्या ऊर्जा महसुलावर निर्बंध येईल आणि भारताला मिळणारा हा आर्थिक फायदा धोक्यात येईल.

इराणसोबतच्या व्यापारावर निर्बंध

हे विधेयक इराण निर्बंध कायद्याचा कालावधी 2031 पर्यंत वाढवते. यामुळे इराणशी व्यापार करणाऱ्या भारतीय कंपन्यांवर अमेरिकेकडून 'दुय्यम निर्बंध' (Secondary Sanctions) लादले जाण्याची भीती आहे.  भारताच्या एकूण ऊर्जा गरजेपैकी मोठा हिस्सा आयातीवर अवलंबून आहे. जर रशियन तेलावर 100  टक्के शुल्क लागले, तर देशांतर्गत इंधनाचे दर गगनाला भिडू शकतात, ज्याचा थेट परिणाम वाहतूक खर्च आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर (महागाई) होऊ शकतो रशियाकडून ऊर्जा मिळवणे कठीण होईल, ज्यामुळे भारताला इतर महागड्या पर्यायांचा शोध घ्यावा लागेल. मात्र, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना विशेष परिस्थितीत हे निर्बंध शिथिल किंवा माफ करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, जे भारतासाठी एक आशेचा किरण ठरू शकतात. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Advertisement

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget