Dahi Handi 2024 Wishes : दहीहंडीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; आठवा श्रीकृष्णाचं लोभस रुप, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
Dahi Handi 2024 Wishes In Marathi : कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून गोपाळकाल्याचा उत्सव साजरा केला जातो. देशभरात दहीहंडीची धूम पाहायला मिळते, या दिवशी तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला दहीहंडीचे खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता
Dahi Handi Wishes In Marathi : श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडी हा सण साजरा करतात. श्रीकृष्णाला बालपणी दही, लोणी या पदार्थांची आवड होती. माता यशोदा घरातील दही, लोण्याची हंडी घरात उंच ठिकाणी दोरीला बांधून ठेवायची. तरीही श्रीकृष्ण कसरती करुन त्या हंडीपर्यंत पोहोचायचा आणि गुपचूप सारं लोणी फस्त करायचा. या घटनेची आठवण म्हणून गोकुळाष्टमीच्या (Krishna Janmashtami 2024) दुसर्या दिवशी दहीहंडी (Dahi Handi 2024) फोडण्याची प्रथा पडली.
महाराष्ट्रात दहीहंडी एकदम थाटामाटात साजरी केली जाते. यंदा दहीहंडी 27 ऑगस्टला आली आहे. या दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र परिवाराला शुभेच्छा देतो. या दिवशी तुम्हीही तुमच्या प्रियजनांना दहीहंडीचे हे खास शुभेच्छा संदेश (Dahi Handi Wishes In Marathi) पाठवू शकता आणि सणाचा आनंद वाढवू शकता.
दहीहंडी शुभेच्छा संदेश (Dahi Handi Wishes In Marathi)
एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा
सोबतीने ध्येय गाठण्याची शिकवण देणाऱ्या
दहीहंडी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
विसरून सारे मतभेद,
लोभ अहंकार दूर सोडा..
सर्वधर्म समभाव मनात जागवून,
आपुलकीची दहीहंडी फोडा..
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा,
यशोदेच्या तान्ह्या बाळा
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
दह्यात साखर, साखरेत भात
दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावून उंच थर,
जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण,
दहीहंडीच्या शुभेच्छा!
खिडकीतल्या ताई-अक्का पुढं वाकू नका,
दोन पैसे देतो मला भिजवून टाका
दहीहंडीच्या शुभेच्छा!
दह्याची हंडी पाण्याची फवार,
लोणी चोरायला आले कृष्णराज
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा
हंडीवर आमचा डोळा…
ह्या दुधाचा काला..
हे नाद करायचा नाही औंदा
आला दहा थरांचा गोविंदा…
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
कृष्णा त्याचं नाव आहे,
गोकुळ ज्याचं गाव आहे,
अशा कृष्णाला आमचा प्रणाम आहे,
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
लोण्यासाठी भांडणारा आणि गोपिकांना छेडणारा
सगळ्यांचा रक्षणकर्ता आणि सर्वांचा प्रिय असा कान्हा
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!
चंदनाचा सुवास,फुलांचा वर्षाव,
दह्याची हंडी आणि पावसाची बरसात,
लोणी चोरायला आला माखनलाल,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
हातात घेऊनी बासरी आला कृष्ण
थरावर थर रचून झाले मित्र सज्ज
मटकी फोडू, खाऊ लोणी
गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
फुलांचा हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!
जल्लोषात आणि आनंदात
चैतन्याची फोडा हंडी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
हेही वाचा: