(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology : यंदाची दहीहंडी 3 राशींसाठी ठरणार खास; 27 ऑगस्टपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Dahi Handi 2024 Astrology : यंदाचा दहीहंडी सण काही राशींसाठी विशेष ठरणार आहे. या काळात अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्याचा परिणाम 3 राशींवर पडणार आहे. या राशींचं नशीब सोन्यासारखं उजळेल.
Dahi Handi 2024 Lucky Zodiacs : दहीहंडीचा सण कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यंदा हा सण 27 ऑगस्टला मंगळवारी साजरा होत आहे. यंदा दहीहंडीला (Dahi Handi 2024) अत्यंत शुभ योग तयार झाले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, 27 ऑगस्टपासून अनेक ग्रहांच्या चाली देखील बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. या काळात काही राशींना सुखाचे दिवस येतील आणि श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने या राशी राजासारखं जीवन जगतील. 27 ऑगस्टपासून कोणत्या राशींचा (Zodiac Signs) सुवर्णकाळ सुरू होणार? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
दहीहंडीच्या दिवशी तयार झालेल्या शुभ योगामुळे तुम्हाला आर्थिक बाबतीत प्रचंड लाभ होईल. जमीन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या कामासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. न्यायालयीन खटल्यांमध्येही निर्णय तुमच्या बाजूने येण्याचे संकेत आहेत. तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात अनेक बदलांना सामोरं जावं लागेल, जे तुमच्या आयुष्यात यश मिळवून देईल. जर तुम्ही खूप दिवसांपासून परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ असू शकतो. वेळेचा सदुपयोग करा.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळ संक्रमणाचा प्रभाव वरदानापेक्षा कमी नाही. तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतील. नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. सामाजिक जबाबदाऱ्या वाढतील. मोठ्या भावांसोबत मतभेद वाढू देऊ नका. जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही यावेळी हा धोका पत्करू शकता. तुमच्या यशाची शक्यता लक्षणीय वाढली आहे.
वृश्चिक रास (Scorpio)
दहीहंडीला होत असलेलं मंगळाचं संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांना उत्तम यश मिळवून देईल. जर तुम्हाला काही मोठं काम सुरू करायचं असेल तर त्या दृष्टीने ग्रहांचे परिणाम अनुकूल असतील. न्यायालयीन प्रकरणातील निर्णय तुमच्या बाजूने जाण्याचे संकेत आहेत. परदेशी नागरिकत्वासाठी केलेले प्रयत्नही यशस्वी होतील. मित्र आणि नातेवाईकांकडूनही तुम्हाला चांगली बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या आणि बाहेरचं खाणं टाळा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: