Chaturgrahi Yog 2024 : 10, 20 नाही तर तब्बल 50 वर्षांनंतर बनतोय चतुर्ग्रही योग! 'या' राशींना मिळणार चौफेर लाभ, धन-संपत्तीत होणार प्रचंड वाढ
Chaturgrahi Yog 2024 : मे महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. यामध्ये नुकतंच गुरु ग्रहाने वृषभ राशीत संक्रमण केलं.
![Chaturgrahi Yog 2024 : 10, 20 नाही तर तब्बल 50 वर्षांनंतर बनतोय चतुर्ग्रही योग! 'या' राशींना मिळणार चौफेर लाभ, धन-संपत्तीत होणार प्रचंड वाढ Chaturgrahi Yog 2024 in taurus horoscope will give money and good success life in these zodiac signs marathi news Chaturgrahi Yog 2024 : 10, 20 नाही तर तब्बल 50 वर्षांनंतर बनतोय चतुर्ग्रही योग! 'या' राशींना मिळणार चौफेर लाभ, धन-संपत्तीत होणार प्रचंड वाढ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/03/39b6e43e666b208393868565c8e20a0c1714706081963358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chaturgrahi Yog 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर एका राशीतून (Horoscope) दुसऱ्या राशीत परिवर्तन करतात. त्यानुसार मे महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. यामध्ये नुकतंच गुरु ग्रहाने वृषभ राशीत (Taurus Horoscope) संक्रमण केलं. यानंतर सूर्य ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यानंतर 19 मे रोजी शुक्र ग्रहाचं वृषभ राशीत संक्रमण होईल. त्यामुळे चतुर्ग्रही योग (Chaturgrahi Yog) निर्माण होणार आहे.
इतकंच नाही तर हे ग्रहांचं संक्रमण अनेक राजयोग देखील निर्माण करणार आहेत. जसे की, गुरु-शुक्राच्या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग होईल. सूर्य आणि बुध ग्रहाच्या युतीने बुधादित्य राजयोग तर शुक्र-सूर्याच्या युतीने शुक्र आदित्य योगसुद्धा बनणार आहे. हे सर्व राजयोग 4 राशींसाठी फार शुभ ठरणार आहेत.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीतच चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. या राशीत गुरु, शुक्र, बुध आणि सूर्य ग्रह विराजमान होणार आहेत. त्यामुळे या राशींना याचा चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरी, करिअरमध्ये चांगला नफा मिळेल. तुमची पगारवाढ होईल. तसेच, नोकरीच्या शोधात जे आहेत त्यांना नवीन नोकरीची संधी मिळेल. अनेक वर्षांपासून तुमचं प्रमोशन थांबलं असेल तर तुम्हाला ते देखील मिळू शकतं. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांना देखील हा राजयोग फार चांगले परिणाम देणार आहे. तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. चांगलं यश संपादन होईल. परदेशी जाण्याचं तुमचं स्वप्न देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. संतान प्राप्तीचा देखील चांगला योग आहे. वैवाहिक सुख मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी हा काळ चांगला ठरणार आहे. तुम्हाला पदोपदी चांगली बातमी ऐकायला मिळेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचे संबंध चांगले असतील. तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. तर, या काळात तुम्ही सावधगिरीने काम केलं तर तुम्हाला करिअरमध्ये देखील चांगले परिणाम दिसतील. सासरच्या मंडळींकडून तुम्हाला धनलाभ होऊ शकतो.या दरम्यान धार्मिक यात्रेला जाण्याचा देखील योग बनतोय. वडिलोत्पार्जित संपत्तीतही तुमचा मोलाचा वाटा तुम्हाला मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ अनेक अर्थाने खास ठरणार आहे. तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. पगारात वाढदेखील मिळेल. अनेक दिवसांपासून तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळेल. तुम्ही दूरच्या प्रवासाला जाऊ शकता. जे तरूण अविवाहित आहेत त्यांना लवकरच लग्नाच्या संदर्भात चांगली बातमी मिळू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Dev : तब्बल 30 वर्षांनंतर कुंभ राशीत होणार शनीची वक्री चाल; 'या' 3 राशी ठरतील लकी, नशीब सोन्यासारखं उजळणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)