Chandra Grahan 2025 : चंद्रग्रहणावर 'ग्रहण योग'चा संयोग; 'या' 3 राशींना सर्वात जास्त धोका, आत्तापासूनच राहा अलर्ट, काऊंटडाऊन सुरु
Chandra Grahan 2025 : वैदिक शास्त्रानुसार, चंद्रग्रहण शनिच्या कुंभ राशीत तसेच, गुरु ग्रहाच्या नक्षत्रात म्हणजेच पूर्वाभाद्रपद नक्षत्रात लागणार आहे. या काळात चंद्र कुंभ राशीत विराजमान असतील.

Chandra Grahan 2025 : वैदिक शास्त्रानुसार आज 7 सप्टेंबर 2025 चा दिवस आहे. त्यानुसार आज चंद्रग्रहण (Chandra Grahan) लागणार आहे. तसेच, आजपासून पितृपक्षाला देखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी महत्त्वाचा आहे. तसेच, भारतीय वेळेनुसार, चंद्रग्रहणाचा कालावधी रात्री 9 वाजून 58 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, रात्री 1 वाजून 26 मिनिटांनी हे चंद्रग्रहण संपणार आहे. विशेष म्हणजे, वर्षातील हे शेवटचं चंद्रग्रहण भारतात देखील दिसणार आहे.
वैदिक शास्त्रानुसार, चंद्रग्रहण शनिच्या कुंभ राशीत तसेच, गुरु ग्रहाच्या नक्षत्रात म्हणजेच पूर्वाभाद्रपद नक्षत्रात लागणार आहे. या काळात चंद्र कुंभ राशीत विराजमान असतील. या ठिकाणी राहू ग्रह आधीपासूनच स्थित आहे. त्यामुळेच, कुंभ राशीत ग्रहणाबरोबरच ग्रहण योगदेखील निर्माण होणार आहे. याचा प्रभाव काही राशींवर नकारात्मक होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
चंद्रग्रहणाच्या काळात वृषभ राशीच्या लोकांची व्यवसायात समस्या निर्माण होऊ शकते. तसेच, तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसेच, तुमच्या मनात सतत काहीतरी नवीन गोष्ट करण्याचा विचार सुरु असेल. मात्र, तुम्हाला शक्य होणार नाही. या काळात कोणत्याच धार्मिक यात्रेला जाऊ नका.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्ही व्यवसायात नवीन योजनांचा लाभ घेऊ शकणार नाहीत. तसेच, तुमच्या कामकाजात देखील बदल झालेला दिसेल. त्यामुळे या काळात कोणताही हलगर्जीपणा करु नका. तसेच, कोणाबरोबरही पैशांचे व्यवहार करु नका. तसेच, कोणतीच रिस्क घेऊ नका. या काळात गरजू व्यक्तीला दान करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीत हा ग्रहणाचा महासंयोग जुळून येणार आहे. त्यामुळे या काळात कोणताच हलगर्जीपणा करु नका. तुमच्या समस्या वाढू शकतात. तसेच, कुटुंबियांच्या आरोग्याबाबत तुम्ही थोडे चिंतेत असाल. तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही तणावात असाल. या काळात तुम्हाला व्यवसायाशी संबंधित देखील काही समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच, या काळात कोणावरही डोळे बंद करुन विश्वास ठेवू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















