Chandra Grahan 2025: 24 तास बाकी! गणेश विसर्जन होताच चंद्रग्रहणाचं मोठं सावट? 12 राशींवरील परिणाम, गरोदर महिलांनी काय काळजी घ्यावी? A टू Z माहिती वाचा
Chandra Grahan 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल? दोष टाळण्यासाठी उत्तम उपाय जाणून घ्या

Chandra Grahan 2025: आज अनंत चतुर्दशीचा खास दिवस आहे, या दिवशी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी 2025 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण शनीच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत होणार आहे. भारतासह जगाच्या सर्व भागात दिसणारे हे ग्रहण ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे ठरणार आहे.
2025 चे चंद्रग्रहण किती वाजता सुरू होईल? कधी संपेल?
चंद्रग्रहण रविवार, 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9:58 वाजता सुरू होईल आणि सोमवार, 8 सप्टेंबर रोजी पहाटे 2:25 वाजता संपेल. पूर्ण चंद्रग्रहणाचा (ब्लड मून फेज) वेळ रात्री 11:00 ते 12:22 पर्यंत असेल. या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे 4 तास 27 मिनिटे असेल. या काळात, पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्र हा लाल-केशरी दिसेल.
भारतात चंद्रग्रहण कुठे दिसेल?
भारतात, आकाश निरभ्र असल्यास हे ग्रहण जवळजवळ सर्वत्र दिसेल. काही खास शहरांबद्दल बोलायचे झाले तर, 7 सप्टेंबरचे चंद्रग्रहण मुंबई, पुणे, दिल्ली, लखनौ, चंदीगड, जयपूर, पटना, रांची, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, कोची, अहमदाबाद, कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर आणि मध्य भारतातील भोपाळ, नागपूर, रायपूर येथे सहज पाहता येईल. भारताव्यतिरिक्त, ते ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी आणि अंटार्क्टिकाच्या काही भागातून देखील दिसेल.
चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी कधी राहील?
- 7 सप्टेंबरचे चंद्रग्रहण भारतात पूर्णपणे दिसेल, म्हणून त्याचा सुतक कालावधी लागू असेल.
- सुतक सुरू होते: 7 सप्टेंबर दुपारी 12:57 वाजता
- सुतक संपते: 8 सप्टेंबर दुपारी 2:25 वाजता (ग्रहण संपते तेव्हा)
- सुतक दरम्यान, पूजा, स्वयंपाक आणि शुभ कार्य टाळले जातात.
हे चंद्रग्रहण मोठे बदल घडवून आणणार?
जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्रग्रहण होते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास, 7 सप्टेंबर 2025 रोजी होणारे हे चंद्रग्रहण राजकारण, जागतिक अर्थव्यवस्था आणि सामाजिक चळवळीत मोठे बदल घडवून आणू शकते. कारण त्याच वेळी शनि वक्री होईल आणि मंगळ-शनि संसप्तक योग देखील तयार होईल. चंद्रग्रहणाचा तुमच्यावर कसा परिणाम होईल? 12 राशींवरील परिणाम आणि उपाय जाणून घेऊया.
12 राशींवर चंद्रग्रहणाचा परिणाम
ज्योतिषींच्या मते, ग्रहण ही भीतीची संधी नाही तर आत्मशुद्धीची संधी आहे. अशात, जर आपण ग्रहणकाळात जप, दान आणि आपल्या पूर्वजांचे स्मरण केले तर आपल्याला ग्रहणाच्या दुष्परिणामांपासून मुक्तता मिळते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते. ग्रहणकाळातील दोष टाळण्यासाठी कोणत्या राशीने कोणता उपाय करावा हे जाणून घेऊया.
मेष
प्रभाव: मानसिक ताण, कामाच्या ठिकाणी चढ-उतार. आरोग्यावर परिणाम.
उपाय: ग्रहणानंतर हनुमान चालीसा पाठ करा. तांब्याच्या भांड्यात पाणी अर्पण करा.
वृषभ
प्रभाव: वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कौटुंबिक वाद आणि गोंधळ.
उपाय: पांढरे कपडे आणि दूध दान करा. शुक्र मंत्राचा जप करा.
मिथुन
प्रभाव: नोकरी-व्यवसायात अनिश्चितता. मुलांची चिंता.
उपाय: हिरवे कपडे घाला, हरभरा आणि पैसा दान करा. बुधाला पाणी अर्पण करा.
कर्क
प्रभाव: आरोग्यावर परिणाम होईल. मानसिक अस्थिरता शक्य आहे.
उपाय: ग्रहणानंतर गंगाजळाने स्नान करा. तांदूळ आणि दूध दान करा.
सिंह
प्रभाव: वैवाहिक जीवनात आणि भागीदारीत मतभेद.
उपाय: ग्रहणानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करा. "ओम घृणी सूर्याय नम:" सूर्य मंत्राचा जप करा.
कन्या
प्रभाव: कामात अडथळे, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.
उपाय: दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. हिरव्या भाज्या आणि हरभरे दान करा.
तूळ
प्रभाव: प्रेमसंबंध आणि मुलांमध्ये अडथळे.
उपाय: देवी लक्ष्मीची पूजा करा. मुलींना खीर आणि कपडे दान करा.
वृश्चिक
प्रभाव: कुटुंबातील मतभेद आणि जमीन आणि मालमत्तेशी संबंधित तणाव.
पाय: ग्रहणानंतर, पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. लाल कपडे आणि मसूर दान करा.
धनु
प्रभाव: शिक्षण आणि प्रवासात अडथळे. भावांशी मतभेद.
उपाय: विष्णू सहस्रनामाचे पठण करा. पिवळ्या वस्तू आणि हळद दान करा.
मकर
प्रभाव: पैशाचे नुकसान आणि मानसिक अस्वस्थता.
उपाय: शनिदेवाच्या मंदिरात दिवा लावा. तीळ आणि तेल दान करा.
कुंभ
प्रभाव: हे ग्रहण तुमच्या राशीत आहे. जीवनात अचानक बदल, निर्णयांमध्ये गोंधळ.
उपाय: ग्रहणानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप करा. तीळ, तेल आणि उडीद दान करा.
मीन
परिणाम: मानसिक शांतीचा अभाव, झोपेची समस्या.
उपाय: पूर्वजांना तर्पण अर्पण करा. तुळशीवर दिवा लावा.
ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
- ग्रहणकाळात घरातच राहा.
- तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू वापरू नका.
- मंत्रांचा जप करा किंवा रामाचे नाव घ्या.
- ग्रहण संपल्यानंतर स्नान करा आणि स्वतःला शुद्ध करा.
ग्रहणाचा देश आणि जगावर असा परिणाम होण्याची शक्यता
- नैसर्गिक आपत्ती: भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी सारख्या घटना.
- राजकारण: भारतात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यातील संघर्ष तीव्र होईल.
- जागतिक राजकारण: युरोप आणि आशियातील देशांमध्ये आर्थिक अस्थिरता.
- भारत: विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात मोठे यश मिळेल.
हेही वाचा :
Ganesh Visarjan 2025: अनंत चतुर्दशीपासून 'या' 5 राशींनी निर्धास्त व्हा! बाप्पा जाता जाता प्रिय राशींवर करणार मोठी कृपा, टेन्शन मिटणार
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















