Chanakya Niti : लग्नाआधी 'या' 5 गोष्टींनी तुमच्या जोडीदाराला पारखून घ्या, अन्यथा लग्नानंतर पश्चातापाची वेळ येणार नाही
Chanakya Niti : आयुष्यभराचा जोडीदार निवडताना आचार्य चाणक्यांनी काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्यास सांगितले आहे, जेणेकरून लग्नानंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.
Chanakya Niti : आचार्य चाणक्यांनी (Chanakya) आयुष्याचा जोडीदार निवडण्यापूर्वी काही गोष्टींबाबत चाचणी घेण्याचे सांगितले आहे. लग्नापूर्वी जोडीदाराबद्दल या गोष्टी जाणून घेतल्यास वैवाहिक जीवन (Married Life) सुखी होते. असं चाणक्यनितीत (Chanakya Niti) म्हटलं आहे. जाणून घ्या कोणत्या गोष्टी आहेत त्या?
आचार्य चाणक्यांची धोरणे
यशस्वी जीवनासाठी आचार्य चाणक्यांनी प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार केला आहे. ज्याच्यामुळे यश सहज शक्य आहे. आचार्य चाणक्यांची धोरणे नीट पाळली तर माणूस हरलेली पैजही जिंकू शकतो.
वरयेत् कुलजां प्राज्ञो विरूपामपि कन्यकाम्। रूपशीलां न नीचस्य विवाह: सदृशे कुले।। - या श्लोकात चाणक्यांनी जोडीदाराची धर्म, संयम, संस्कार, समाधान, क्रोध आणि गोड वाणी या गुणांवर परीक्षा घेण्यास सांगितले आहे. जेणेकरून लग्नानंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.
धर्म
लग्नापूर्वी तुमच्या जोडीदाराविषयी ही गोष्ट जाणून घेणे आवश्यक आहे की, तो किंवा ती धर्माला, कर्माला महत्त्व देतो की नाही? कारण धार्मिक व्यक्ती कधीही आपली मर्यादा विसरत नाही आणि कुटुंबासाठी एकनिष्ठ राहते.
संयम
चाणक्य म्हणतात की, ज्या व्यक्तीमध्ये संयमाची भावना असते, तो कुटुंबाला प्रत्येक कठीण प्रसंगातून वाचवतो. संकटाच्या वेळी खंबीरपणे कुटुंबाची ढाल बनते. लग्नापूर्वी जोडीदाराच्या संयमाची नक्कीच परीक्षा घ्या.
राग
लग्नाआधी जोडीदाराच्या रागाची परीक्षा घ्यावी. रागामुळे नात्यात दुरावा येतो. रागावलेला माणूस योग्य आणि चुकीचा फरक विसरतो. रागावलेला माणूस आयुष्याच्या जोडीदारावर शब्दांचे बाण सोडतो, तो बरोबर असला तरीही. ज्यामुळे जोडीदाराच्या मनाला दुखापत होऊ शकते.
गोड बोलणे
अति बोलण्याने माणसाचे नाते बिघडू शकते. पती-पत्नीच्या गोड बोलण्यानेच वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो. जोडीदाराच्या कठोर बोलण्याने वैवाहिक जीवनात अंतर वाढते.
संस्कार
जोडीदार निवडताना बाह्य सौंदर्याऐवजी त्याच्या गुणांचा विचार करा, कारण सुसंस्कृत व्यक्ती लग्नानंतर पती किंवा पत्नीच्या खांद्याला खांदा लावून उभी असते. सुसंस्कृत असल्याने अनेक पिढ्यांचा उद्धार होतो.
वैवाहिक जीवनात आनंद मिळवायचा असेल तर...
प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंद मिळवायचा असेल तर मानसिक शांती आणि आदराची भावना खूप महत्त्वाची आहे. चाणक्य नीतीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवनात एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. ती एक गोष्ट या नात्यांमध्ये आली तर आनंदी नातीही धुळीला मिळतात. जर वेळीच हे दोष दूर केले नाहीत तर व्यक्तीचे नाते तुटण्याची शक्यता असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या