Power Of Silence : व्यर्थ बोलणे हेच माणसाच्या सर्व दु:खाचे कारण! गप्प राहण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या
Power Of Silence : बोलणे हे माणसाच्या सर्व दु:खाचे कारण आहे, कारण गरजेपेक्षा जास्त बोलणे हे दु:खाचे कारण आहे. म्हणूनच कमी बोला, अचूक बोला, गोड बोला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आवश्यक तेवढेच बोला.
Power Of Silence Importance in Life: धर्मांमध्ये 'मौन'ला (Silence) खूप महत्त्व दिले गेले आहे. यात म्हटलंय की, केवळ बोलण्यातच नाही तर गप्प राहण्यात म्हणजेच मौनातही शक्ती असते. शास्त्रज्ञांनी देखील हे मान्य केले आहे की, मौनाचा आरोग्याशी तितकाच संबंध आहे, तपस्वी झालेल्या सर्व संत आणि ऋषीमुनींनी शांत राहून आणि ध्यान करून जगाचे सखोल ज्ञान प्राप्त केले. जाणून घ्या याचे महत्त्व (Power Of Silence Importance)
बोलणे हे दु:खाचे कारण
बोलणे हे आपल्या आयुष्यात एक नाही तर अनेक दु:खाचे कारण आहे. कारण माणसाची समस्या अशी आहे की, आपण गप्प बसू शकत नाही. नेहमी काहीतरी, कोणाच्या मनाला लागेल असे बोलत असतो, तुमच्या या बोलण्यामुळे जीवनात अर्ध्याहून अधिक दुःखे निर्माण होतात. आपले बोलणे देखील कुटुंबात कलहाचे कारण आहे. शास्त्रज्ञांनी देखील हे मान्य केले आहे की, मौन राहिल्यामुळे मानसिक शांती मिळते. मौनामुळे विचारांमध्ये एकाग्रता येते आणि तुमच्यातील उर्जा वाढते.
आपण किती बोलतो याचा कधी विचार केला आहे का?
जेवढे भूक लागते तेवढे अन्न तुम्ही खातात, आवश्यक तेवढे काम करता, पण आपण किती बोलतो याचा कधी विचार केला आहे का? तुम्ही आवश्यक तेवढेच बोलता की, दिवसभर अनावश्यक बोलतात? कधीतरी एकटे बसून याचे आत्मचिंतन तसेच विचार करा, तुम्ही दिवसभरात किती बोललात, काय बोललात आणि मुख्य म्हणजे का बोललात? यापैकी किती गोष्टी आवश्यक होत्या आणि किती अनावश्यक होत्या? याचा देखील विचार करा
अशा नकारात्मक वातावरणातून बाहेर पडा
माणसाची प्रवृत्ती अशी असते की त्याला आपल्या मनात काय चालले आहे ते इतरांना सांगायचे असते आणि समोरची व्यक्तीही आपल्यासोबत तशाच पद्धतीने वागते. मात्र या गोष्टी जेव्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीशी संबंधित असतील तर त्या ऐकण्याचे आणि कथन करण्याचे काम अधिक आवडीने केले जाते. जेव्हा तुम्ही एकटे बसता तेव्हा या गोष्टींचा पुन्हा विचार कराल. अशा व्यर्थ गोष्टी ऐकण्या-सांगण्याचं वातावरण आयुष्यभर चालतं. अशा प्रकारे तुम्ही तुमचा वेळ, तुमचं आयुष्य, तुमची विचारसरणी, समज आणि ते मौल्यवान क्षण गमावून बसतात. जे जगता आणि उपभोगता आले असते. तेव्हा अशा नकारात्मक वातावरणातून बाहेर पडा.
मौनाची शक्ती काय आहे?
धर्मांमध्ये सांगितल्याप्रमाणे, जोपर्यंत आपण व्यर्थ बोलत राहिलो तोपर्यंत आपल्या मनात अशांतता राहील, पण ज्या दिवशी आपण मनातून शांत होऊ, तेव्हा तोंडातून जे निघेल ते चांगले आणि मोजकेच असेल. जगात असे काही दुष्कृत्ये आहेत, कुटुंबात संकटे आहेत, पती-पत्नीमध्ये वाद आहेत, ते सर्व व्यर्थ आणि विचार न करता बोलण्यामुळे आहेत. त्यामुळे व्यर्थ बोलणे म्हणजे उर्जेचा अपव्यय आहे.
म्हणूनच आवश्यक तेवढेच बोला...
म्हणूनच या पृथ्वीवरील सर्व ऋषी आणि संत एकांतवासात राहिले, कारण त्यांना फारसे बोलायचे नव्हते आणि फारसे ऐकावे लागत नव्हते. महावीरांना 12 वर्षे आणि महात्मा बुद्धांना 10 वर्षे मौन धारण करून ज्ञान प्राप्त झाले. महर्षी रमण आणि चाणक्य हे देखील मौनाचे उपासक होते. पण तुम्हाला या जगात राहूनही तुम्ही हे गुण घेऊ शकता. यासाठी, तुम्हाला तुमच्यातील उर्जा वाचवाव्या लागतील, ज्या तुम्ही निरर्थक शब्दात नष्ट करता. म्हणूनच आवश्यक तेवढेच बोला. आणि मुद्द्याचे बोला.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Weekly Horoscope 23 to 29 January 2023: 'या' राशींसाठी हा आठवडा खास! साप्ताहिक राशीभविष्य