Chanakya Niti :लग्नासाठी जोडीदार शोधताय? चाणक्य म्हणतात, मुलीमध्ये हे गुण असेल तर लगेच लग्न करा वेळ घालवू नका!
Chanakya Niti For Wife: विवाह हा जीवनाचा एक भाग आहे, ज्याचा आनंद स्त्री-पुरुषासह त्यांच्या कुटुंबाला देखील होतो. बहुतेक लोक लग्नाबद्दल संभ्रमात असतात. पण आचार्य चाणक्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्या जर तुम्ही लग्न करणाऱ्या व्यक्तीमध्ये असतील तर लगेच होकार कळवा.
Chanakya Niti For Wife: चाणक्य नीतिचा (Chanakya Niti) वापर आजही अनेकजण करतात. वैयक्तिक आयुष्यात यश मिळवण्यासाठी या चाणक्य नीतिला अवलंब अनेकजण करतात. विवाह हा जीवनाचा एक भाग आहे, ज्याचा आनंद स्त्री-पुरुषासह त्यांच्या कुटुंबाला देखील होतो. बहुतेक लोक लग्नाबद्दल संभ्रमात असतात की, त्यांचा जोडीदार कसा असेल, त्याच्या सवयी काय असतील, कुटुंबातील सदस्यांची निवड कशी असेल आणि त्याच वेळी अशा बर्याच गोष्टी आहेत.चाणक्य नीतीमध्ये देखील सांगितले आहे की, योग्य व्यक्तीसोबत विवाह करावा. निवड चुकली तर आपले जीवन दु:ख आणि अडचणींनी भरुन जाते. परंतु कसे ओळखावे आपण ज्या मुलीशी विवाह करणर आहोत तीचा स्वभाव कसा, ती आपल्या घरात अॅडजस्ट होईल का हे आपण जाणून घेऊ शकत नाही. पण आचार्य चाणक्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्या जर तुम्ही लग्न करणाऱ्या व्यक्तीमध्ये असतील तर लगेच होकार कळवा.
जोडीदारामध्ये कोणते गुण असावे?
- एखादी मुलगी नोकरी आणि व्यवसाय करत नसेल पण तिला समाजाची घरादाराची जाण असेल तर लगेच विवाह करावा. कारण अशा मुली जागृक असतात आणि आपल्या घरादाराचा मानसन्मान वाढवतात
- जी मुलगी लहान -मोठ्यांचा मान सन्मान देत असेल अशा मुलीशी विवाह करावा.
- जी मुलगी रुढी आणि परंपराचे पालन करते अशी मुलगी विवाहासाठी श्रेष्ठ असते. अशी पत्नी आपल्या पतीचे सौभाग्य वाढवते. घरात पुजाविधी करून देवी देवतांना प्रसन्न करुन घरात सुख समृद्धी आणते
- ज्या मुलीमध्ये बचत करण्यची सवय असते ती मुलगी विवाहासाठी अतिशय योग्य असते. अशी स्त्री कुटुंबाला आर्थिक मजबूती देते. अशा स्त्रीला देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते
- आचार्य चाणक्यांच्या मते ज्या स्त्रीचा आवाज गोड असेल, वाणी शुद्ध असेल अशी स्त्री विवाहासाठी योग्य असते.
- जी स्त्री सल्लागार असते. आपल्या वाईट काळात धीर देते. चांगला सल्ला देते अशा स्त्री विवाह करण्यासाठी चांगली आहे.
- जी स्त्री मर्यादेत राहून कुटुंबाचा मानसन्मान वाढवते ती स्त्री योग्य आहे.
- ज्या स्त्रीमध्ये मीपणा नसतो. स्वत:पेक्षा इतरांचा विचार करते ती विवाहासाठी योग्य आहे.
- जी मुलगी तुमच्या वाईट काळात खंबीरपणे तुमच्यासोबत उभी राहते ती स्त्री विवाहासाठी योग्य आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :